राहुल द्विवेदी म्हणाले ‘ते’ केलेले काम कायम लक्षात राहील…

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महामारी शंभर वर्षांतून कधीतरी येते. अशा कठीण काळात मला जिल्ह्यात काम करत आले. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील, अशी भावना मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

द्विवेदी म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित होता. तो काही प्रमाणात मार्गी लावण्यात यश आले. गेल्यावर्षी काही तालुक्यांत गंभीर दुष्काळी परिस्थिती होती, तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

कुठलाही राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप माझ्या कामात झाला नाही. अनधिकृत काम करण्यास कोणी दबाव टाकला नाही. कोरोना महामारीत चांगले काम करता आले.

हा अनुभव माझ्या कायम आठवणीत राहील. रुग्णसंख्या वाढत असताना मी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट द्यायचो. रुग्णांना सुविधा मिळतात की नाही याची पाहणी करायचो, असे द्विवेदी यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved