पालकमंत्री म्हणतात, राम मंदिर बांधण्यासाठी परिस्थिती योग्य नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला.

यावेळी त्यांनी राम मंदिराबाबतही भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर जे वक्तव्य केले होते त्याबाबत समर्थन करत मंदिर बांधण्यासाठी वातावरण मंगलमय नाही असे म्हटले आहे.

राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांनी मान्य केला आहे. राममंदिर हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याला विरोध नाही. फक्त कोणत्या परिस्थितीत कोणतं कार्य केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे.

सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने परिस्थिती खराब झालेली आहे. वातावरण मंगलमय नाही. आपण एखादे देऊळ बांधतो तेव्हा वातावरण प्रसन्न पाहिजे, पण आज ती परिस्थिती नाही.

असे पालकमंत्री म्हणाले. तसेच ‘शरद पवार यांनी सोलापूर येथील दौऱ्यात राम मंदिराबाबत टिप्पणी केली होती. तुम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली असेलच. त्यात त्यांनी प्राधान्य कशाला द्यायचं यावर भाष्य केलं आहे.

त्यात काही वावगं नाही. कारण सध्याचे वातावरण हे मंगलमय नाही. सध्या रोज पन्नास हजार पेशंट सापडत आहेत. एखाद्या देवाचे मंदिर बांधणी करताना वातावरण चांगले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.’ असे समर्थनही त्यांनी केले आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment