‘या’ गावच्या तरुणाने केली आत्महत्या!

Published on -

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातल्या पळवे बुद्रुक येथील किरण विठ्ठल कळमकर (वय- २४) या तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत पाडुरंग आबाजी कळमकर (रा. पळवे बुद्रुक) यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की त्यांचा चुलत भाऊ किरण विठ्ठल कळमकर याने मंगळवारी दि. २१ सकाळी साडेसातच्या अगोदर शेतातील

विहरीजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सुपा पोलिसांनी तात्काळ पळवे येथे घटनास्थळी जाऊन

माहिती घेत पंचनामा करुन मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या आत्महत्येबाबत सुपा पोलिसांनी सी. आर.पी.सी.१७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe