आमदाराच्या प्रभागातच स्वच्छता मोहिमेचे वाजले बारा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक समाजिक संस्था, महापालिका प्रशासनास नगरकर सरर्सावले आहेत. त्यासाठी शहरात रात्रंदिवस घंटागाड्या फिरत असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. व कचरा पेटविण्यासही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातच कचरा धगधगत असून एक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्यात 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. याबाबत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे गुन्हे दाखल झाले असून 254 मुलींची सुटका करण्यात आली आहे. मात्र गुन्हे वाढत असल्याने पालकांनीही लक्ष देण्याची गरज अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामन्य कुटुंब असो किंवा उच्चशिक्षीत कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या अट्टाहासापायी … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी इतक्या कोटींची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ग्रामविकास हा जिल्हा विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामे वेळेत मार्गी लावून येत्या काही वर्षांत नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत क्रमांक एकवर असेल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सन 2020-21 साठी जिल्हा वार्षिक आराखड्यासाठी 571 कोटी 80 लाख रुपयांची मर्यादा राज्य … Read more

डॉ. शेळकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वैद्यकीय मशिनरीसाठीच्या बोगस कर्जप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नीलेश विश्वास शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला आहे.या प्रकरणाकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना, विनीत सरन व व्ही. रामासुब्रमन्यन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. येथील शहर सहकारी बँकेतून वैद्यकीय मशिनरीसाठी साडेसतरा कोटी रुपयांचे बोगस कर्ज … Read more

कचरा फेकणाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर शहर स्वच्छ झाल्याचे चित्र आहे. शहरातील ११० कंटेनर काढल्यानंतरही त्या जागेवर कचरा फेकणाऱ्यांकडून सुमारे ५० हजारांचा दंड मनपाने वसूल केला आहे. स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून पथकांची बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्यांवर करडी नजर आहे. थ्री स्टारच्या मानांकनासाठी आलेली चार सदस्यीय समितीही शहरात तळ ठोकून आहे. अहमदनगर … Read more

मनपाच्या आवाहनाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रतिसाद; परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : प्रोफेसर कॉलनी परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता सर्वेक्षणात व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे. प्रत्येक विक्रेत्याने स्वखर्चातून ‘डस्टबिन’ ठेवत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्यांचे आभार मानले. स्वच्छता सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरात विविध उपाययोजना राबवत स्वच्छतेसाठी सर्वांच्या … Read more

राम शिंदे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘कोणी बंगला व कार्यालयासाठी भांडत आहे. तर, काही मंत्री खात्यासाठी अडून बसले आहे. एका बंगल्याचे दोन-दोन दावेदार आहेत, अशा स्थितीत असलेले राज्यातील नवे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही’, असा दावा भाजपचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, प्रत्येक निर्णयाला विलंब होत आहे. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगरमध्ये

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी प्रथमच नगरमध्ये येत आहेत.नव्या महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ९ जानेवारीला नियुक्ती झाली आहे. त्यानंतर सोमवारी ते प्रथमच नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत. त्याच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले … Read more

मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये – राम शिंदे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : ‘ माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता . त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्न येत नाही. मी सर्वसामान्यांतून आलेलो आहे . जनतेने मला त्या वेळेला निवडून दिले होते. पक्षाचेही योगदान माझ्यासाठी खूप  आहे. त्यामुळे मला चॅलेंज विखे कुटुंबीयांनी करू नये’, असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. आमचा पराभव … Read more

पत्रकारांच्या मदतीसाठी सरसावली सामाजीक जन-आधार संघटना

अहमदनगर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका यांच्या वतीने जनाधार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे अँड सुनिल आठरे व पदाधिकार्चायांचा सम्मान करण्यात आला. पत्रकारांवरील वाढते हल्ले तसेच विरोधात बातमी केल्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणात वाढ झालेली असून अनेकदा पत्रकारांना आर्थिक पाठबळ नसल्याने पत्रकारांना न्याय मिळत नाही पत्रकार हा लोकशाहीचा चौथा … Read more

अहमदनगर शहराचा पारा घसरला ! जाणून घ्या तापमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहराचा पारा घसरला असून, शुक्रवारी नगर शहरात किमान ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान शुक्रवारी होते. गारठ्यामुळे नगर शहरातील व्यवहार संध्याकाळी थंडावले होते. कापडबाजारात शुकशुकाट होता. जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नगरमध्ये ७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले … Read more

अहमदनगर शहरात बिबट्या दिसल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काही महिन्यांपूर्वी बुरुडगाव परिसरात बिबट्या आढळला होता. आता केडगाव, शास्त्रीनगर, पांजरापोळ भागात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. वन विभागाने या परिसराची पाहणी केली, परंतु बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगावातील नाला, अजय गॅस गोडाऊन, पांजरापोळ, रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर; नागरिकांसाठी मोबाईल ॲप कार्यान्वित

अहमदनगर : शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने मनपाने अँड्राईड अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमधून Ahmednagar-SWM टाकून ॲप डाउनलोड करावे, … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. ओडीएफ++ … Read more

कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजीत तांबे ? रोहित पवारांनी दिले हे उत्तर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याबाबत म्हणाले….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ज्या विश्वासाने ग्रामविकास मंत्रिपदाची व नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास सार्थ करीत गटबाजीला थारा न देता जिल्ह्याचा विकास गतिमान केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. प्रलंबीत असलेले रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी ठाम ग्वाही देत शेतकरी, … Read more

अहमदनगर शहरात अनिल राठोड विरोधात सगळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप उमेदवाराला लाभदायी ठरणार आहे. दरम्यान भाजप पुन्हा आरती बुगे यांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते. महापालिकेच्या सहा नंबर … Read more

ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे 14 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असलेली कु. ऐश्वर्या रवींद्र वाघ हिने शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य सिद्ध करून तायकांदो व बॉक्सिंग या … Read more