अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आजपासून जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर – जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक दिनांक २३ व २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.   नाशिक विभागात श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय पथक येत असून ते काही ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.   या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- बसस्थानकासमोरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

अहमदनगर :- शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी ही संयुक्तपणे कारवाई केली. पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिटके यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली … Read more

नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल – आ.संग्राम जगताप

नगर: महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना रस्त्याने फिरणेही अवघड झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शहरातील नागरी प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी … Read more

हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या !

अहमदनगर :-  उद्योजक करीमशेठ हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणाला चार दिवस उलटले तरी पोलिस अद्याप मुख्य सूत्रधार अजहर मंजूर शेख याच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. पोलिसांना गुंगारा देणारा अजहर हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे . सोमवारी ( दि . १८ ) पहाटे नमाजसाठी जात असताना येथील प्रख्यात उद्योजक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर शहरातील या चौकात तरुणीवर पिकअप मध्ये बलात्कार !

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बलात्कार, विनयभंग सारख्या घटनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. अगदी प्रवास करणे महिला , तरुणींसाठी प्रचंड धोक्याचे झाले असून नगर शहरात पिकअप मध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी  कि, काल नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरात राहणारी एक २१ वर्षांची तरुणी पांढऱ्या रंगाच्या पिकअप … Read more

हुंडेकरी अपहरण प्रकरण : आरोपींकडून धक्कादायक खुलासे

अहमदनगर :- शहरातील उद्योजक,व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना परतूर (जालना) येथे अटक केली. दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुंडेकरी यांचे अपहरण २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आले होते. मात्र या कटाचा सुत्रधार शहरातील कुख्यात गुन्हेगार अजहर मंजूर शेख व त्याचा जोडीदार मात्र पोलिसांच्या सापळ्यातून पसार झाले. अजहर शेख याच्याविरुद्ध अनेक … Read more

या कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण !

अहमदनगर : येथील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१९) जालना जिल्ह्यातील परतूर येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, नगर येथील सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील शेखसह आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करणार्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अपहरण प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्या दोघांची चौकशी सुरू आहे.अपहरणानंतर काही तासांतच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुटका केली होती. परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते. हुंडेकरी मोटर्स … Read more

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- आज पहाटे अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं.  उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी … Read more

अहमदनगरमध्ये मराठा उद्योजकांचा उद्या मेळावा

अहमदनगर : संपुर्ण भारत देशातील मराठा व्यावसायिक व उद्योजकांना एकत्र आणत सुरु करण्यात आलेल्या मराठा उद्योजक लॉबीच्यावतीने उद्या मंगळवार दि.१९ रोजी शहरातील साई मुरली लॉन्स येथे मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती एम.यु.एल.चे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी राजेंद्र अवताडे, अशोक कुटे, किशोर मरकड, संदीप खरमाळे, उदय थोरात … Read more

…असे घडले हुंडेकरी यांचे अपहरण थरारनाट्य ….

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांचे आज भल्या पहाटे अज्ञात चार ते पाच जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे नगरसह जिल्ह्यात खळबळ उडाली.या अपहरणाचे थरारनाट्य एखाद्या चित्रपटासारखेच होते. नगर येथील ६४ वर्षाचे हाजी करीमभाई हुंडेकरी हे मोठे उद्योजक, व्यावसायिक असून हुंडेकरी लॉन्स, टाटा शोरुम तसेच सिमेंट, हॉटेल असे … Read more

अपहरण झालेले उद्योजक करीम हुंडेकरी यांची सुखरूप सुटका !

अहमदनगर :-  आज सकाळी पिस्तूलाच्या धाकाने अपहरण झालेले शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम हुंडेकरी यांना पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद-जालना रोडवरुन सुखरुपपणे ताब्यात घेतले असून उद्योजक हुंडेकरी यांना सव्वातीन वाजता नगरमध्ये आणण्यात आले आहे. शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. या घटनेुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी यांचे सिनेस्टाईल अपहरण

अहमदनगर :- नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज सकाळी राहत्या घराच्या जवळून अपहरण झाले.  चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, आज पहाटे करीम हुंडेकरी हे नमाज पठन करण्यासाठी घराबाहेर पडलेले असताना ते मशिदीत पोहोचण्यापूर्वीच चार … Read more

अहमदनगर मध्येही महाशिवआघाडी : आ. संग्राम जगताप व माजी आ.अनिल राठोड येणार एकत्र ?

अहमदनगर :- राज्य स्तरावर महाआघाडी समीकरण यशस्वी होत असून यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे नेते एकत्र काम करताना दिसणार आहेत. यामुळे नगर शहराच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप व माजी आ. राठोड यांच्या समन्वय करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यात यश येईल, असा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी रविवारी केला आहे. राज्यातील बदलत्या … Read more

‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ववत सुरू करण्याची मागणी 

अहमदनगर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे, तरी कक्षाचे कामकाज पूर्ववत सुरू करून गरीब रुग्णांना तातडीने मदत देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी फुले ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी … Read more

सरकार स्थापनेबाबत आमदार रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राज्यात स्थीर सरकार देण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल. त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. राज्यातील राजकीय घडामोडींत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, साहेब निर्णय घेतील तो निर्णय योग्यच असेल. लोकांना बदल हवा असलेले नवे सरकार राज्यात लवकरच स्थापन … Read more

प्रेमविवाह करणाऱ्या भावास मारहाण

नगर  – सोमनार धनराज लिमकर, वय २७, रा. श्रीऱाम गल्ली मिरजगाव याचा भाऊ संतोष धनराज लिमकर याने जयकुमार याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. त्याच्या रागातून सोमनाथ लिमक तरुणास जयकुमार बोरा, रा. मिरजगाव, ता. कर्जत व इतर १० जणांनी इनोव्हा गाडी मॅक्स पांढऱ्या रंगाची गाडी व एक इर्टिका गाडी नंबर सांगता येत नाही. या गाडीतून येवून बळजबरीने … Read more

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश येमुल यांचे निधन

अहमदनगर : राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक गणेश येमुल यांचे गुरुवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सुरक्षा टीममध्येे ते प्रतिनियुतीवर होते. त्यांच्या आयटी सेलचे कामही येमुल पहात होते. सायबर तज्ञ म्हणून येमुल यांचा लौकिक होता. गुरुवारी रात्री पुण्यात त्यांचे निधन झाले. शुक्रवारी नगरमध्ये 10 वाजता अमरधाम … Read more