महिलेशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुखची हकालपट्टी करा सातपुते यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-मनपातील महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची आस्थापना प्रमुख पदावरून हकालपट्टी करून मनपा बिल्डींग आवारातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, … Read more

अंडी व कोंबड्या खाण्यापासून धोका नाही : जिल्हाधिकारी डॉ.भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-बर्ड फ्लूबाबत गैरसमज व अफवा पसरल्याने नागरिकांनी अंडी व कोंबड्याचे मास खाण्याचे बंद केल्याने कुक्कटपालकांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना बर्ड फ्लू व मानवी आरोग्याबाबत प्रचार व प्रसार करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी अंडी व कोंबड्याचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ६०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ … Read more

७०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान २ हजार ५५३ केंद्र : साहित्यासह १२ हजार ७६५ कर्मचारी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार  ७८८ सदस्य पदांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियोजन केले आहे. तब्बल १२ हजार ७६५ कर्मचारी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्यासह २ हजार ५५३ मतदान केंद्रावर दाखल झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी … Read more

मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी उभे राहत असलेल्या आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत राज्य व केंद्राकडून विशेष बाब म्हणून साडेतीन लाख रुपये अनुदान … Read more

रंगीबेरंगी फुगे उडवून मुलांनी केली धमाल..

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-फुग्यांचे वेगवेगळे रंग बघून आणि खाऊ मिळाल्याने ही लहान मुले हरखून गेली होती. फुगे उडवताना त्यांची धम्माल चालली होती. भान विसरून ही मुले फुगे उडवत होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह यामुळे सगळे वातावरणच चैतन्यमय झाले होते. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने गरीब मुलांसोबत पतंगाऐवजी फुगे उडवून व … Read more

….आणि विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर शहराला स्मार्ट सिटी करण्याचे धडे

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- दिवस जिजाऊ जयंतीचा. विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे योगायोगाने अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या जयंती निमित्ताने एकत्र आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना विद्यार्थी काँग्रेसच्या युवा सहकाऱ्यांना आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा असल्याचे सांगितले आणि तेथेच जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्मार्ट … Read more

अर्बन बँकेविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नगर अर्बन बँकेच्या चाकण व सिन्नर या तोट्यात चाललेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय बँकेचे हित पाहूनच घेतला. मात्र, काही जण जाणूनबुजून सोशल मीडियामधून बँकेबद्दल अपप्रचार करत आहेत. सभासद, ठेवीदार व कर्जदारांनी अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केले. नवनीतभाई … Read more

मनपा अडचणीत ! थकबाकीदारांची यादीविना वसुली कशी होणार

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीत सूट दिली. त्यामुळे मागील दोन महिन्यांत वसुलीचा आकडा वाढला. दररोज १५ ते २० लाखांचा भरणा होत होता. मात्र, शास्तीच्या सवलतीची मुदत संपल्याने वसुली मोहीम थंडावली आहे. सध्या दररोज ४ ते ५ लाखांचा भरणा होत आहे. मात्र पुन्हा एकदा कर वसुलीसाठी महानगर … Read more

कोतवालीच्या निरीक्षकांच्या तक्रारीचा पाढा अधीक्षकांच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पक्ष आणि त्याच्या बद्दल अपशब्दचा वापर करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्या बद्दल प्रतिक अरविंद बारसे जिल्हाध्यक्षक वंचित बहुजन आघाडी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवदेनाद्वारे तक्रार केली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी कि १२ जानेवारी रोजी सायंकाळी … Read more

चायना मांजामुळे तरुण जखमी ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील चोरी छुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरूच आहे. दरम्यान पोलीस पथकासह वनविभागाच्या पथकाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. मात्र बंदी असलेल्या या घातक मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मकर संक्रांतच्या पूर्वसंध्येलाच नगरमध्ये एका युवकचा नायलॉन … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा आहे. त्यातून कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. अशा अनेक प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण केल्या जात नाही. तसेच शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे जिल्हा कर्मचारी यूनियनच्यावतीने अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी राहाता पंचायत समितीवर नुकतेच निदर्शन केले. यावेळी एकात्मिक … Read more

खड्डे समस्या सोडविण्यासाठी मनपा सरसावली; नागरिकांना दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-शहरातील काही भागात रस्त्याचे काम सुरू आहे. डांबरीकरण, पॅचिंगचे कामे केली जात आहेत. ही कामे सुरू असतानाच स्थानिक नागरिक डांबरीकरणारवर पाणी सोडतात. व्यवसाय करणारे देखील पाणी टाकून रस्ता साफ करतात. परंतु रस्त्यावर पाणी टाकणे हे योग्य नाही. पाण्यामुळे डांबर आणि खडी वेगवेगळे होता. मात्र आता रस्त्यावर पाणी सोडल्यास संबंधितांवर … Read more

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-राष्ट्रीय कार्यक्रम व इतर महत्वाच्या प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिकरित्या वापर केला जातो. मात्र, असे करताना राष्ट्रध्वजाची अवहेलना आणि अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याशिवाय, प्लास्टीकचे राष्ट्रध्वज विकण्यास आणि त्याच्या वापरावरही प्रतिबंध असून नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ४८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३० ने वाढ … Read more

नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार 290 डोस जिल्हा परिषदेत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा … Read more

महापालिकेला कार्यक्षम आयुक्तांची नेमणूक करावी

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- महापालिकेच्या स्थापनेपासुन महापालिकेला आत्तापर्यत कार्यक्षम आयुक्त न मिळाल्याने नगर शहराची वाताहात झाली आहे. नियोजनबद्ध विकासाचे व्हिजन असणारा सक्षम आयुक्त नगर शहराला मिळाले तर नगरचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही त्यासाठी कार्यक्षम आयुक्त नियुक्त करावा अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व … Read more

चायना मांजाने पतंग उडविल्यास गुन्हा दाखल होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शासनाने चायना मांजा विक्रीवर बंदी घातली आहे, धोकादायक अशा मांजाची कोणी विक्री केल्यास त्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. मात्र आता त्याचबरोबर आता पतंग उडविताना कोणाच्या हातात चायना मांजा दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चायना मांजा विक्रीला आळा बसावा यासाठी वनविभाग, पोलीस आणि महापालिकेची … Read more