Ahmednagar News : नगरमधील वाडिया पार्कसाठी १५ कोटींचा निधी ! ‘या’ अत्याधुनिक सुविधा उभ्या राहणार

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरच्या वाडिया पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून खेळाडूंसाठी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी वाडिया पार्क संकुलाची पाहणी करत निधी देण्याचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! तर शून्य टक्के व्याजदर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून, चालु वर्षों आज अखेर अल्पमुदत शेतीकर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव आहे. दि.३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरणा करुन ३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास … Read more

रस्त्यावर कचरा करणाऱ्यांची आता खैर नाही ; आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला हा इशारा

अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागामध्ये कचरा दिसणार नाही यासाठी काम करावे. घंटागाडीचे नियोजन करून वेळेवर कॉलिंगमध्ये जाण्यासाठी नियोजन करावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आहे. मनपाच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे … Read more

Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या … Read more

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी..

कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुणे महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात, पंधरा प्रवासी जखमी

अहमदनगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यातील वाहनचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी : गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपासमोर ट्रक (एम … Read more

निवडणुका डोळयासमोर ठेवून अपूर्ण कामाच्या उद्घाटनाचा फार्स ! बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्णच

Ahmednagar News

Ahmednagar News : बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या उद्घाटनाचा फार्स करण्यात आल्याचा आरोप निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी केला आहे. अहमदनगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावर निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी काम अपूर्ण असतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकार्पण सोहळा … Read more

Ahmednagar News : आधी दारू पाजली, अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्याने युवकाचा ठेचून खून

Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरातील खुनाचा उलगडा झाला असून हा खून अनैसर्गिक कृत्य करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. आधी दारू पाजली, परंतु नंतर अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. संदीप कमलाकर शेळके ऊर्फ बाळू (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांचा एमआयडीसी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नागापूर परिसरात तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आग्रा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत. विशाल चिंतामण जगताप (वय २२, रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी), साहिल शेरखान पठाण (वय २०, रा. लेडोंळी मळा, नागापूर) अशी अटक … Read more

भाजप नेत्यांनी स्पष्टच सांगितलं ! खा. सुजय विखेंमुळे अनेक विकास कामे…

Ahmednagar News

Ahmednagar News : रेल्वे स्टेशन रोड, गायके मळा ते लिंक रोडला जोडणाऱ्या व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. काही वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी होणाऱ्या अडचणीपासून सुटकेचा निश्वास सोडला असून, या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडला जाणार … Read more

नगरमध्ये मराठा समाजाचा रास्तारोको…! नगर-मनमाड, भिंगार, केडगावसह शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठ्यांचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी व राज्यभरातील मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व सगेसोयरेचा कायदा करावा. अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शनिवारी नगर शहर परिसरातील नगर मनमाड रोड, शेंडी बायपास, भिंगार, केडगाव या चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन … Read more

केडगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..! हल्ल्यात तिघे जखमी; जुन्नरच्या टिमला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : केडगावच्या अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि. २४) बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल. धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याने दोघांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याल्य जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास यश आले. बिबट्या पकडल्याने केडगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडल. बिबट्याची दहशत कशी असते, याची प्रचिती केडगावकरांना शनिवारी जाणवली. … Read more

बीटीआर गेटसमोर अपघात; युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर रोडवरील बीटीआर गेटसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल घुसळे हे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.२४) पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घुसळे हा नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवाशी होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल घुसळे याच्या … Read more

एमआयडीसीच्या वीज प्रश्नाबाबत बैठक घेवून पाठपुरावा करणार : मंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : औद्योगिक वसाहतीच्या वीज प्रश्नाच्या संदर्भात वीज वितरण कंपनी आणि औद्योगिक विकास मंडळाच्या आधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक घेवून उद्योजकांना दिलासा देण्याचा निश्चित प्रयत्न करु. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरील सर्व प्रश्नांच्या बाबतीतही पाठपुरावा करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील आणि … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये चाललंय काय ? आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुन्हाडीने हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडताना समोर आल्या आहेत. मारहाण, खून आदी प्रकरणे देखील वाढीस लागली आहेत. मारहाणीच्या घटना ताजा असतानाच आता आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुन्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही हल्ला करण्याची घटना बुधवारी (दि. २१) रात्री … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भीषण अपघात ! हळदीवरून निघालेल्या तरुणास ट्रकने चिरडले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील काही घटना ताजा असतानाच आता आज पुन्हा एक अपघात झाला असून २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. राहुल मोहन घुसाळे (रा. नागरदेवळे, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या सिटी लॉनमधून नगरच्या दिशेने मोटारसायकलवर येत असलेल्या २९ वर्षीय युवकाच्या मोटारसायकलला महापालिकेच्या पुढे असलेल्या बीटीआर गेटसमोर पाठीमागून भरधाव वेगात … Read more

केडगावमध्ये भर वस्तीत बिबट्याचा हैदोस, दोघांवर हल्ले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील येथील केडगाव परिसरात आज शनिवारी सकाळपासून बिबट्याने धुडगूस घातला आहे. सुमारे तीन तासांपासून त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत. राधेशाम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे केडगावसह … Read more

एमआयडीसी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून

Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरात एका ४४ वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून निघृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली आहे. सह्याद्री चौकातील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या आवारात सदर मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटविली असून त्याचे नाव बाळू उर्फ संदीप कमलाकर शेळके (वय ४४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे आहे. मयत शेळके … Read more