Ahmednagar News : नगरमधील वाडिया पार्कसाठी १५ कोटींचा निधी ! ‘या’ अत्याधुनिक सुविधा उभ्या राहणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरच्या वाडिया पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून खेळाडूंसाठी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी वाडिया पार्क संकुलाची पाहणी करत निधी देण्याचे सांगितले होते. त्यावेळी वाडिया पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार मंत्री बनसोडे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

बैठकीस आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते. वाडिया पार्कच्या बळकटीकरणासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शासनाला ५२ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यातील पहिल्या टप्यातील निधी मंजूर झाला असून, उर्वरित निधीस मान्यता

मिळालेली आहे. या निधीतून वाडिया पार्कची दुरुस्ती करणे, यासह विविध सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

वाडिया पार्कमध्ये या सुविधा देणार

– मैदानावर लॉन तयार करण्यात येणार आहे.

– किक्रेट खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन टर्फ विकेट

– मैदानावर फ्लड लाईटची सुविधा

– ४०० मीटरची सिंथेटिक धावपट्टी

– कुस्तीपटूंसाठी मातीचा हौद

– बॉक्सिंग व बॅडमिंटन हॉल

– रायफल शूटिंगसाठीचे मैदान

– दोन सिंथेटिक टेनिस कोर्टची निर्मिती

– कबड्डी, खो-खो व बास्केट बॉलचे मैदान तयार करून त्यावर डोम कव्हर बसविणार

– वाडिया पार्कच्या संपूर्ण प्रेक्षक बैठक व्यवस्थेला रोप कव्हर

– खेळाचे समालोचन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारणार