Akole News : काजवा महोत्सवावर पावसाचं संकट ! निसर्गाचा चमत्कार यंदा फसला

Akole News : अकोले तालुक्यात मान्सूनपूर्व आणि अवकाळ्या पावसामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, यंदा पर्यटकांना भंडारदरा परिसरात काजव्यांचे नेत्रदीपक दर्शन अजूनही घडलेले नाही. यामुळे हजारो पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. काजवे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई अभयारण्य परिसरात हजारो काजवे … Read more

अकोल्याच्या महिलेला साईबाबा पावले अन् दृष्टीहीन महिलेला मिळाली नवी दृष्टी साईसंस्थानच्या आयबँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकताच सुरू झालेल्या अत्याधुनिक आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. त्या नेत्रदानाच्या माध्यमातून काल संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सौदामिनी निघुते व त्यांच्या … Read more

पद्मश्री राहीबाईं पोपरे यांची नवी चळवळ, गावरान बियाण्यांनी शेतीत होणार परिवर्तन!

अकोले- तालुक्यातील पोपेरवाडी, कोभाळणे गावात राहणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाईंनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना भरडधान्य आणि भाजीपाल्यासाठी गावरान, देशी बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि बियाणे सोडून गावरान वाणांच्या लागवडीचं आवाहन केलं आहे आणि यासाठी … Read more

अकोल्यात वर्षभरात १३ बिबट्यांचा मृत्यू ! बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अकोलेकरांची झोप उडाली

अकोले तालुका हा मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षासाठी कायमच चर्चेत राहिला आहे. गेल्या काही वर्षांत या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. मागील वर्षभरात विविध कारणांमुळे तब्बल १३ बिबट्यांचा मृत्यू झाला, तर बिबट्यांच्या हल्ल्यात २३ जण जखमी झाले आहेत. सध्या शेतात पिके नसल्याने आणि लपण्यासाठी जागा मिळत नसल्याने बिबटे जंगलातच जास्त वावरत आहेत. या … Read more

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आरोपीस अटक !

अकोले, २० मार्च २०२५: महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंबड (ता. अकोले) येथील गवनेर सरोदे यास अकोले पोलिसांनी बुधवारी पहाटे पुण्यात अटक केली. अकोले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नरेंद्र रामभाऊ भोर (रा. आंबड) यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गवनेर सरोदे विरोधात विविध कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा … Read more

अकोलेच्या नऊ गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना जोरात तब्बल १६३ शेततळी पूर्ण; आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही केले कौतुक

अहिल्यानगर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना याद्वारे पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवले जात आहेत. मागील दोन वर्षांत तालुक्यातील नऊ गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत आणखी काही जलसंधारणाची कामे पूर्ण करून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उन्नतीसाठी नक्कीच लाभ होईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे … Read more

अकोले आगारचा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : उडत्या छताची बस प्रवाश्यांसहित धावते घाटातून

११ मार्च २०२५ भंडारदरा : अकोले आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, कसाऱ्याला धोकादायक अवस्थेतील बसेस पाठवल्या जात असल्याचे समोर आले आहे. तारेने आणि दोरीने बांधलेल्या तसेच उडत्या छताच्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात असून, यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आगार हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस. … Read more

अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

१० मार्च २०२५ अकोले : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये ५६ गुन्हे दखल झाले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ८५ वर पोहोचली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७९ गावे येतात. पोलिस ठाण्याच्या … Read more

परिसरात पसरली दुर्गंधी ; घरात डोकावून पाहिल्यावर दिसला ‘हा’ मृत प्राणी !

२८ फेब्रुवारी २०२५ अकोले : बंद घरात माणूस मृतावस्थेत आढळल्याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील पण, चक्क बिबट्या देखील बंद घरात मृतावस्थेत आढळला असल्याची बातमी तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकली असेल.बंद घराच्या परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर ही बाब लोकांच्या निदर्शनास आली.अकोले शहराजवळ नवीन नवलेवाडी येथे दुबळकुंडी रोडवर मध्य वस्तीत हा प्रकार घडला. या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यालगत एका … Read more

पंचायत समितीतच दिव्यांगास केली शिवीगाळ आणि मारहाण ; गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : शासकीय कामानिमित्त अकोले पंचायत समिती कार्यालयात आलेल्या एका दिव्यांग नागरिकाला अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी विकास चौरे, कक्ष अधिकारी कैलास येलमामे आणि एक महिला ग्रामसेवक यांच्यासह काही कर्मचाऱ्यांविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

मावस दिरानेच केला भावजयीचा खून ! ‘या’ ठिकाणची घटना ; आरोपीस अटक

२२ फेब्रुवारी २०२५ अकोले : मावस दिराने दारूच्या नशेत भावजयीचा खून केला.ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री दहाच्या नंतर उंचखडक बुद्रुक शिवारात घडली.शुक्रवारी पहाटे खून झाल्याचे उघड होताच अकोले पोलिसांनी आरोपी राजू शंकर कातोरे (वय ५४) यास ताब्यात घेतले.जिजाबाई शिवराम खोडके (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. उंचखडक बुद्रूक शिवारात भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील … Read more

माजी मंत्री पिचडांमुळे अकोल्यात पाण्याची उपलब्धता

८ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मितीमध्ये माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही, तालुक्यात पाण्याची उपलब्धता देखील माजी मंत्री पिचड यांचे मुळेच झाली,असे मनोगत विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत स्व. पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याने … Read more

प्रेम विवाहातून तरुणाचे अपहरण !

७ जानेवारी २०२५ अकोले : प्रेम विवाहाच्या कारणातून एका तरूणाचे तरुणीच्या नातेवाईकांनी अपहरण केले. मात्र मित्राने तत्परता दाखवत ११२ ला फोन केल्याने पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अपहृताला मारहाण करतांना पोलीसांनी आरोपीना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या व्हिडिओ … Read more

अतिक्रमणावर हातोडा ; सर्वसामान्यांची शिकार करत उपजीविका सोडली वाऱ्यावर परंतु बड्या माश्यांना अभय !

१ जानेवारी २०२५ अकोले : कोल्हार-घोटी राज्य मार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात अकोले नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाई सुरू केली आहे.तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली, मात्र पक्क्या बांधकामांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.या मोहिमेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणांविरुद्ध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन दिल्यानंतर ही प्रक्रिया … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून महायुती धर्म मोडीत! भाजप नेते वैभव पिचड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

vaibhav pichad

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून राजकीय पक्षांच्या माध्यमातून देखील उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत व अद्याप काही याद्या जाहीर व्हायच्या बाकी आहेत. परंतु याद्या जाहीर झाल्यानंतर त्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे आवाहन प्रत्येक पक्षापुढे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती … Read more