तणनाशकाच्या फवारणीने तणाऐवजी जळाले पाच एकर सोयाबीन, वडाळा महादेव येथील घटना

soyabin

सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शेतातील तणाऐवजी सोयाबीनचे पाच एकर पीक जळाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे संबंधित तणनाशक निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा महादेव येथील सुनील भास्कर कसार यांनी भोकर येथील कृषी सेवा केंद्रातून एका … Read more

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आंदोलन तीव्र करणार – स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती

shrirampoor

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी येथील स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.८) सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोनाई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहमदनगर … Read more

पाणी टंचाईची समस्या उद्भवू लागण्याने, भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून गावतळे भरून देण्याची मागणी

shrirampoor

भंडारदरा धरणातून सध्या सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून तालुक्यातील गावतळे भरून द्यावीत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक व जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू होऊन देखील अद्याप श्रीरामपूर तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. अनेक गावात पिण्याच्या पाणी योजनेचे तलाव … Read more

घरकुल योजनेतील लाभधारकाला घरकुलासोबत जागाही उपलब्ध करून द्याव्यात – आ. लहू कानडे

gharkul yojana

राज्यातील गोरगरीब, भूमिहीन व गरजू लोकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनेतून घरकुले व घरकुले बांधण्याबाबतच्या त्रासदायक अडचणी आ. लहू कानडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहे. तसेच शासनाने लाभधारकाला घरकुलासोबत त्यासाठी जागाही उपलब्ध करून द्याव्यात. शासकीय जमिनीवर घरकुले बांधून राहिलेल्या लोकांची घरे न पडता ती नियमानुकूल करण्यात यावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी राज्यपालांच्या … Read more

संगमनेरातील बंद असलेल्या खाणी सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करू – राधाकृष्ण विखे पाटील

radhakrushn vikhe

संगमनेर तालुक्यातील मुदत संपलेले खाणपट्टे तसेच क्रशर व्यावसायिकांनी शासनाच्या अटी व शर्थीची पुर्तता करुन दिल्यास बंद असलेले व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत महसूल प्रशासन निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील खाणपट्टे चालक तसेच क्रशर व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेवून … Read more

चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला !

bhandardara

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला असून भंडारदरा धरणामध्ये पाण्याची नवीन आवक होत आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा १७.७३ टक्के पर्यंत पोहोचला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरली असून बऱ्याच ठिकाणी भात … Read more

अहमदनगरमधील ‘या’ गावात गावठी दारू पिल्याने मृत्यू? संतप्त महिलांचा ‘राडा’, दारूअड्डे उद्ध्वस्त

daru

Ahmednagar Breaking : नशायुक्त गोळ्यांचा वापर करून बनविलेल्या गावठी दारुच्या सेवनामुळे एकाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरुन संतप्त महिलांनी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील अवैध दारूअड्डे उद्ध्वस्त केले. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास अंत्यविधी न करण्याचा निर्णय महिलांनी घेतला होता. पोलिसांच्या आश्वासनानंतर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की उक्कलगाव येथील ज्ञानेश्वर … Read more

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर ! शिर्डीत सुरू झाली मोर्चेबांधणी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : 18 व्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी राहिल्याचे आपण पाहिले. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याअगोदरपासूनचं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. पारनेर चे माजी आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडी कडून आणि भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील महायुतीकडून निवडणुकीच्या आखाड्यात होते. ही निवडणूक शरद पवार … Read more

निलेश लंकेंकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे पहिल्यांदाच मोठे भाष्य ! म्हणतात की….

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेअर झाला. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. यामुळे निलेश लंके हे एक जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. खरंतर नगर दक्षिणची निवडणूक ही मोठी अटीतटीची झाली. या निवडणुकीत अवघ्या काही हजारांच्या मताधिक्याने निलेश लंके … Read more

माझ्या पराभवामागे साई बाबांचा ‘हा’ उद्देश असावा, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगरची लोकसभा निवडणूक ही एक हाय प्रोफाईल निवडणूक होती. महसूल मंत्री सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात ही काटेदार लढाई झाली. यात सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव झाला. निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांचा पराभव करून जायंट किलर बनलेत. खरंतर लोकसभेचा निकाल कधीचं … Read more

Ahmednagar News : माहेरी जात असलेल्या महिलेचा मृत्यू तर पती जखमी ; या तालुक्यातील घटना

Shrigonda Accident

Ahmednagar News : सासुरवाडीला निघालेल्या दाम्पत्याच्या मोटरसायकलला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात पत्नीचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली. नंदूबाई तुळशीदास जाधव असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तर तुळशीदास भीमराव जाधव असे जखमी झालेल्या पतीचे नाव … Read more

सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की कारण एकच शिर्डीत मोदींची नव्हे, तर मतदारांची गॅरंटी !

मतदार संघाचा विकास, रखडलेले पाटपाण्याचे प्रश्न, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या कांदा व इतर मालाला योग्य भाव नाही, शाश्वत रोजगार हा सगळा करिश्मा थेट मतदारांपर्यंत पोहोचविण्यात स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या नेत्यांना आलेले अपयश यामुळे भरवशाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. त्यामुळे मोदींसह कोणाचीही गॅरंटी चालली नाही. गॅरंटी … Read more

Vidhansabha Election : विधानसभेच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरेंचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर चौथ्यांदा भगवा फडकावला. आता विधानसभेसाठी जोमाने तयारीला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे संगमनेर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, लोकसभा समन्वयक जगदीश … Read more

आ. राम शिंदे यांची नाराजी ! कर्जत-जामखेड मतदारसंघातुन विखेंच्या पराभवाची सुरवात…

डॉ. सुजय विखे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच आ. राम शिंदे यांची नाराजीही विखे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. विखे यांनी राम शिंदे यांची नाराजी अखेरच्या टण्यात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्यांना मतदारसंघात पुरेसे मतदान मिळू शकले नाही. २०१९ च्या निवडणुकीत जामखेडमधून विखेंना १८,५०० एवढे लिड मिळाले होते. मतदारसंघातील जनतेला सापत्न वागणूक … Read more

Ahmednagar Politics : एका निकालाने भाजप सह विखेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग ! आजोबांनंतर नातवाचा झाला पराभव…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर नीलेश लंके यांनी बाजी मारली. सकाळपासून आघाडीवर असलेले सुजय विखे दुपारनंतर मागे पडल्याने नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयश्री साजरी केली. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे, या निवडणूक राज्यभरात भाजपसह मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. त्यात लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. नगर जिल्ह्याचा … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार !

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये २३ उमेदवारांचे डिपॉझिट जस होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मतांपेक्षा कोणत्याही उमेदवाराला १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्यासाठी २,२०,०५३ मतांची आवश्यकता होती. यानुसार उमाशंकर यादव, आरती हालदार, कलीराम बहिरु, डॉ. फैलाश जाधय, रवींद्र कोठारी, दत्तात्रय वाघमोडे, दिलीप खेडकर, भागवत गायकवाड, … Read more

निलेश लंके यांच्या विजयामुळे जनशक्तीचा विजय ! विखे फॅक्टरचा फुगा फुटला

जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. या निवडणुकीतून जनशक्तीचा विजय झाला असून, विखे फॅक्टरचा फुगा फुटल्याची भावना कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अॅड सुभाष लांडे यांनी व्यक्त केली. दोन्ही नवनिर्वाचित खासदारांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी अभिनंदन केले. कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला राज्यभर सक्रिय पाठिंबा दिला … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेला लोखंडेंना पाठींबा देणाऱ्या मुरकुटेंची वाकचौरेंबरोबर रंगली मैफिल,राजकीय गणित काय? पहा..

murkute wackchaure

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यामध्ये अनेक पक्ष एकत्र आले. वरच्या लेव्हलला जरी हे एकत्र आले तरी स्थानिक लेव्हलला मात्र नेत्यांच्या अडचणी वाढल्या. अनेक ठिकाणी एकमेकांचे वर्षानुवर्षे राजकीय शत्रू असणाऱ्यांना एकमेकांचे काम करावे लागले. तसेच अनेक ठिकाणी वरचेवर एकत्रितपनाचा आव आणला गेला परंतु एकमेकांची कामे किती केली याबाबत शंका निर्माण झाली. परंतु … Read more