Ahmednagar News : माहेरी जात असलेल्या महिलेचा मृत्यू तर पती जखमी ; या तालुक्यातील घटना

Pragati
Published:
Shrigonda Accident

Ahmednagar News : सासुरवाडीला निघालेल्या दाम्पत्याच्या मोटरसायकलला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात पत्नीचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली. नंदूबाई तुळशीदास जाधव असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तर तुळशीदास भीमराव जाधव असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील नंदूबाई तुळशीदास जाधव व तुळशीदास भीमराव जाधव हे
दाम्पत्य जेऊर कुंभारी व सोनेवाडी येथे आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी निघाले होते.

नंदूबाई जाधव यांचे सोनेवाडी हे माहेर होते. हे दोघे कोपरगावच्या दिशेने येत असताना येसगाव शिवारातील पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने (आर.जे ०९ जी.डी ५५२५) चोराची धडक दिली. त्यामध्ये नंदूचाई जाधव गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर तुळशीदास जाधव हे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सदरचा ट्रक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

दरम्यान याप्रकरणी जाधव यांचे नातेवाईक साहेबराव जावळे (रा. सोनेवाडी) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जखमी तुळशीदास जाधव यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

तर मयत नंदूबाई जाधव यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अनकवाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान माहेरी जात असलेल्या महिलेवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe