जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने न होता राजकीय इव्हेंट झाला

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- गेली अनेक दिवस बंद असलेली व्यापाऱ्यांची दुकाने नुकतीच काही दिवसांपूर्वी खुली करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र राहाता शहरात जनतेवर सक्ती नको ज्या व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी ती खुली ठेवावीत आणि ज्या व्यापार्‍यांना बंद ठेवायची आहे त्यांनी बंद पाळावा, असे … Read more

चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून कपड्यांची केली चोरी

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले एका टेलरच्या दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरटयांनी या टेलरच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमधील कपडे चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान नवनाथ निवृत्ती सोनवणे (वय-३८) यांच्या दुकानातील कपड्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात … Read more

‘त्या’ लोकनियुक्त सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव अखेर फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथा विश्‍वनाथ घुले यांचे विरुद्ध 14 पैकी 11 सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. तो अविश्वास प्रस्ताव अखेर फेटाळला गेला आहे. माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथा घुले यांच्यावर अकरा सदस्यांनी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे सरपंच घुले यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव … Read more

शासकीय आदेशाविनाच प्रशासनाकडून बळजबरीने दुकाने बंद करण्याची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाची परिस्थिती सुधारतात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून लॉकडाऊन शिथिल केलेले आहे. त्याचे सुद्धा संगमनेर मधील छोटे दुकानदार, व्यापारी, हातगाडीवाले, भाजीपाला, फळे, हॉटेल, सलुन, स्टेशनरी व इतर लहान मोठ्या आस्थापनावले नियमांचे पालन करत आहेत. असे असतांना अचानक व्यापारी संघटनेचे काही पदाधिकारी व प्रशासन यांच्यातील बैठकीनुसार दुकाने सकाळी 7 ते 5 … Read more

महसूलमंत्री म्हणाले… लॉकडाऊन शिथिलतेनंतर होणारी गर्दी चिंताजनक

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या शिथीलते नंतर होणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. करोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तालुका … Read more

कोपरगावात बांधाच्या वादावरून नवरा – बायकोला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे बांधावरील झाडाझुडपांच्या वादावरून पती पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपत गंगाधर गागरे, गंगाधर चांगदेव गागरे, माया गणपत गागरे, कांताबाई गंगाधर गागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

किरकोळ वादातून दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथे चौघांनी किरकोळ कारणावरून दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, खंडेरायवाडी येथे आदेश भाऊसाहेब चाचन हा तरुण गुरुवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये असताना, नीलेश अशोक तळेकर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आदेश याच्या शेतात घेवून … Read more

दुकानांत घुसून भंगारवाल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यातच विनयभंगाच्या घटना देखील घडत आहे. असाच एक प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. यामुळे परिसरातील महिला वर्गामध्ये भीती निर्माण झाली आहे. घडली घटना अशी कि, श्रीरामपूर शहरातील रामनगर परिसरातील एका व्यक्तीने एका टपरीमध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात … Read more

‘तो’ नियम सर्व लोकप्रतिनिधींनाही लावा- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जे जिल्हा परिषद कर्मचारी स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करणार नाहीत,अशांच्या वेतनातून 30% रक्कम कपात करून ती संबंधितांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करावी असा ठराव अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आला आहे. हा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे,पण हाच नियम सर्वच शासकिय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही लावणे गरजेचे आहे असे नगराध्यक्ष वहाडणे यांनी आपले … Read more

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी संगमनेरात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या अनुषंगाने दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलेदेखील कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने संगमनेरमध्ये बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. नगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात अठरा वर्षांखालील १८ … Read more

माझ्या प्रयत्नानेच ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात : आमदार लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- गरीब जनतेला कोरोनात मोफत उपचार मिळावेत म्हणून आपल्या निधीमधून ३० लाख रुपये ग्रामीण रुग्णालयासाठी दिले आणि ३० बेड असणारे हे रुग्णालय ५० बेडचे केले. शिवाय सर्वच्या सर्व बेडस्ना ऑक्सिजन सुविधाही निर्माण करून दिली. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर असे करून १०० खाटापर्यंतचे उपजिल्हा … Read more

आदिकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- माजी खासदार गोविंदराव आदिक आज हयात असते, तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल दिसला असता. कारण गोविंदराव आदिक यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देऊनच समाजकारण केले. त्यांनी नेहमी तळागाळातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते … Read more

चार महिलांसह दारू विक्री करणाऱ्या दोन तरुणांवर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शिर्डीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत शिर्डीत वाढत असलेली गुन्हेगारी व अवैद्य व्यवसायाविषयी नाराजी व्यक्त करून गुन्हेगारी व अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत शिर्डीत काल सायंकाळी पोलिसांनी शेळके कॉर्नर समोर दिवसा ढवळया व रात्री भर चौकात बंद दुकानांसमोर बसून काही महिला अश्लील हावभाव … Read more

‘या’ ठिकाणचा आठवडे बाजार बंदच राहणार !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-  सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांची होणारी गर्दी लक्ष्यात घेता अद्याप आठवडे बाजार सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील आठवडे बाजार बंदच ठेवलेले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार देखील बंदच राहणार आहे. तेरी व्यापारी व शेतकर्‍यांनी आजच्या दिवशी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कडक निर्बंध हटविल्यानंतर आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 769 रुग्ण वाढले आहेत.  जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे –  ahmdnagar corona update अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सर्वाधिक विषारी सर्प कोब्राला पकडण्यात सर्पमित्राला आले यश

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे राहणारे दैवत ग्रामीण सह. पतसंस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे यांच्या घरासमोर निघालेल्या 5 फुटी कोब्रा नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश आले. दरम्यान शिंदे यांनी तात्काळ संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले. मोरे यांनी ताबडतोब श्रीरामपूर येथील सर्पमित्र अमोल राळेगणकर व राहुरीचे सर्पमित्र कृष्णा … Read more

उसाच्या शेताजवळ आढळून आलेल्या त्या व्यक्तीचा घरगुती कारणातून खुन

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेतीजवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळी … Read more

विमा कंपन्यांकडून शेतक‍ऱ्यांची निराशा

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- नैसर्गिक आपत्तीमध्ये होणा‍ऱ्या नुकसानीला काही अंशी का होईना संरक्षण मिळावे म्हणून अनेक शेतक‍ऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, मका अशा विविध पिकांचा हवामान आधारित विमा उतरविला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु, झालेल्या नुकसानापासून दिलासा मिळण्यासाठी विमा कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. डाळिंब उत्पादक आजही विम्याच्या प्रतिक्षेत आहेत. विमा … Read more