कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी संगमनेरात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या अनुषंगाने दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलेदेखील कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने संगमनेरमध्ये बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

नगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात अठरा वर्षांखालील १८ हजार ६६४ रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गाची तिसरी लाट लवकरच येत असल्याची धोक्याची सूचना देण्यात आली असून यामध्ये लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली आहे.

या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर अमोल निकम यांनी टास्क फोर्सची स्थापना केली. स्थापन करण्यात आलेला हा टास्क फोर्स तिसऱ्या लाटेचा सामना करेल. तहसीलदार निकम यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तालुक्यातील बालरोगतज्ञ,

डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणामध्ये सहभागी कर्मचारी आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लहान मुलांवर कोरोना उपचार, आयसीयू व्यवस्था, तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंदर्भात हा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हास्तरावर, तहसीलदार निकम यांनी तालुकास्तरावर १० बालरोग तज्ञांच्या या टास्क फोर्सची नियुक्ती केली. संगमनेरमध्ये महिला डॉक्टरकडे या टास्कफोर्सचे नेतृत्व देण्यात आले आहे.