‘ह्या’ मोठ्या गावात कोरोनाचा शिरकाव,तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा गावात कोरोनाने शिरकाव केल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून 3 दिवस … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ५४ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 189 वर जावून पोहोचला !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 189 वर जावून पोहोचला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांबरोबर प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल पुन्हा नव्याने 19 जणांचे अहवाल … Read more

साईबाबा मंदिरातील जल, साईनगरीची माती राम मंदिरासाठी रवाना

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अयोध्येतील राममंदिरचा वाद खूप काळ सुरु होता. शेवटी न्यायालयाने हा वाद निकाली काढून अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद थांबवला. आता राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काशी येथील ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पंतप्रधान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज बंद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज १३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४१८ झाली आहे. आज मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२, अकोले ८, राहुरी ५ ,शेवगाव १, कर्जत १ यथील रुग्णांचा यात समावेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ चार पोलीस निलंबित !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील सासर्‍याकडून जावयाचा खून, प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य आरोपी सचिन काळे व बुंदी भोसले यांनी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता बुंदी भोसले याने पोलिसांची नजर चुकवून पोबारा केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंढरीनाथ घोरपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मन्सूर अहमद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल … Read more

बिबट्याचा संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून कौठा, चांदे, हिवरा, देडगाव परिसरात फिरणारा बिबट्याने रविवारी रात्री कौठा येथील बोरकर यांच्या वस्तीवरील शेळी फस्त केली. नेवासे तालुक्यातील चांदे,कौठा,देडगाव व परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांचा शेतीकामावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी देडगावला एक बिबट्या जेरबंद केला होता. त्यानंतर पुन्हा बिबट्याचा वावर या परिसरात आढळला … Read more

बाजार भरवल्याप्रकरणी माजी सभापती सह ‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करुन पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमा करून जनावरांचा बाजार भरवल्याप्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नानासाहेब पवार, टाकळीभानच्या सरपंच रूपाली धुमाळ, पवार (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर २ ते ३ नावे माहीत नसलेल्या व्यक्तींवर श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती त्वरित करा

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-साईबाबा काॅर्नरवरील मोठ्या खड्ड्यासमाेर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अनेक ठिकाणी या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेकदा निवेदने दिली. मात्र, काम होत नाही. एकीकडे टोल वसुली चालू आहे. टोल कंपनी आपल्या अधिपत्याखाली काम करते. आपण त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे भरून काढा. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला खपवून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला!

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राहता तालुक्‍यातल्या प्रवरानगर परिसरात घोरगे वस्ती भागात राहणारी तरुणी रामेश्वरी शिवाजी गायकवाड, {वय १९} ही दि. २२ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिची आई मीना यांच्याशी घरगुती किरकोळ कारणावरुन शाब्दिक भांडण झाल्याने घरात कोणाला काहीही न सांगता निघून निघून गेली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. … Read more

कोरोना ब्रेकिंग : २४ तासात जिल्ह्यात नव्या ३१६ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३१६ नवे रूग्ण नोंदले गेले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

वारंवार सांगूनही अधिकारी ऐकेनात मग नगराध्यक्षांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-राहात्यामधील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली. नागराध्यक्षांनीही खड्डे बुजविण्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वत: हातात फावडे व घमेले घेऊन वाळू, … Read more

‘ती’ व्हिडीओ ‘त्या’ नेत्यासाठी ठरतीये डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकत असतांना अचानक आग लागून पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने पेट घेतल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची खातर जमा न करता कुकाणा येथील नामांकित नेत्याच्या नावासह ही घटना त्यांच्या पंपावर घडली असे शेअर करण्यात आले. त्यामुळे झाले असे की, … Read more

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ एकवटल्या ‘एवढ्या’ संघटना ; दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- एका किर्तनात बोलताना इंदोरीकरांनी मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्या वक्तव्यानंतर विविध संघटना विरोधात तर काही समर्थनार्थ उभ्या ठाकल्या.  या वक्तव्यावर अंधश्रद्धा निमूर्लन समितीने तक्रार केली. आरोग्य विभागानेही याची चौकशी केली. परंतु या विरीधात खूप साऱ्या संघटना इंदोरीकर महारांच्या भेटी घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले. त्यांना अद्यापर्यंत … Read more

माजीमंत्री राधाकृष्ण विखेंनी ‘असे’ काही केले कि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राज्‍य सरकाचे स्‍टेअरींग कोणाच्‍या हातात याची चर्चा जोरदार सुरु असतानाच इकडे शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे आणि आश्‍वी जिल्‍हा परिषद गटामध्‍ये आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शास‍कीय योजनेतील लाभार्थ्‍यांना रिक्षांचे वितरण करुन लक्ष वेधून घेतले आहे.  जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्‍यांना मिळावा यासाठी शिर्डी … Read more

‘ह्या’ तालुक्यात 13 कोरोना रुग्णांची भर ; शंभरीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले  तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  तालुक्यात एकाच दिवसात तेरा रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.  ह्या १३ रुग्णामध्ये एकट्या माणिकओझर या आदिवासी खेड्यातील  नऊ रुग्ण आहेत.  गोडेवाडी (केळी) … Read more

‘निळवंडे’संदर्भात ‘ह्या’ मंत्र्याचे मोठे वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- उत्तरेतील अकोले, संगमनेर या मोठ्या तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामात बरेच अडथळे आले आहेत. परंतु याच्यावर मार्ग काढत त्याचे काम प्रगतीपथावर राहिले. आता नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, निळवंडे कालव्यांची कामे बंद पडू देणार नाही. त्यासाठी तातडीने … Read more