श्रीरामपूरात सराईत चोरटा जेरबंद

श्रीरामपूर : विविध ठिकाणाहून चोरी केलेले ४४ हजाराचे चार मोबाईल जप्त करून सराईत चोरट्याला येथील शहर पोलिसंनी नुकतेच जेरबंद केले आहे. सदर आरोपींवर यापुर्वी देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो सराईत चोरटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी नवनाथ माणिक जाधव (रा. गोंधवणी रोड) हे … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीरामपूरः एका ५६ वर्षीय नराधमाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान एका गावातील परिसरातील मंदिराच्या बाजुला झाडाजवळ हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय दगडु गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक … Read more

ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन करणार का : आ. हेमंत ओगले यांचा जिल्हा नियोजनाच्या बैठकीत उद्धिन सवाल !

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या ४० ते ५० वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे नावाखाली त्यांचे संसार उघड्यावर आणले. ज्या तत्परतेने अतिक्रमण कारवाई केली तेवढ्याच तत्पर्तने पुनर्वसन करणार का ? असा उद्धिन सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आ. ओगले … Read more

महावितरणकडून ‘मुळा-प्रवरा’चे भाडे बंद ; इन्फ्रास्ट्रक्चर वापरापोटी २०१० पासून दरमहा मिळत होते ५ कोटी रुपयांचे भाडे, आता फुकट वापरणार

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : महावितरण कंपनीकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला इनफ्रास्ट्रक्चर वापरापोटी मिळणारे दरमहा ५ कोटी रुपयांचे भाडे बंद झाले आहे. २०१० ते जानेवारी २०२५ अशी सुमारे १५ वर्षे हे भाडे संस्थेला मिळत होते.मुळा प्रवरा वीज संस्थेने महावितरण कंपनीचे वीजबिल देणे थकविल्याप्रकरणी वीज नियमक आयोगाने संस्थेला बीज परवाना नाकारला होता. त्यानंतर २०१० पासून संस्थेचे काम … Read more

पश्चिमेकडील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राज्य शासनाला नोटीस ; खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी, पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार

१ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : श्रीरामपूर गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून, याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले यांनी मुंबई उच्ब न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गतवर्षी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. याप्रकरणी न्या. मंगेश पाटील व न्या. प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे तुटीच्या … Read more

खंडपीठाने राज्य सरकारला बजावली नोटीस

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गतवर्षी केलेल्या जनहित याचिकेची नुकतीच सुनावणी होऊन न्यायाधीश मंगेश पाटील व न्यायाधीश प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.त्यामुळे तुटीच्या गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी … Read more

‘या’ कारणामुळे लोकांचे चेहरे झाले सुन्न ! आता आम्ही भविष्यात व्यवसाय कसा करायचा ?

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : तीन दिवसांपासून शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू आहे.मंगळवारी बेलापूर रोडपासून सुरू झालेली ही मोहीम बुधवारी गोंधवणी रोडवर राबविल्यानंतर काल गुरूवारी छत्रपती शिवाजी चौकातून नेवासा रोडवर राबविली.अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे संपूर्ण बाजारपेठ विस्कळीत झाली आहे.पालिका व पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे मुख्य बाजारपेठेमध्ये विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल … Read more

‘मुळा-प्रवरा’ निवडणुकीचा चेंडू जिल्हा उपनिबंधकाच्या दालनात

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागल्याने मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या सभासदांनीही आता त्यात उडी घेतली आहे. संस्थेची निवडणूक घेण्यासंदर्भात एकूण अहवाल संस्थेचे प्रशासक रावसाहेब खेडकर यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान, पुरी हे दुसऱ्या तातडीच्या कामासाठी मुंबईला रवाना झाल्यामुळे यासंदर्भातला फैसला होऊ शकला नाही. संस्थेची निवडणूक घेण्यासाठी … Read more

‘मुळा-प्रवरा’ ची तातडीने निवडणूक घ्या ; भोसले यांची मागणी !

२२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : येथील मुळा प्रवरा वीज संस्थेने निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संस्थेच्या निवडणूकीचे सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे.दरम्यान,मुळा प्रवरा सहकारी संस्थेची निवडणूक शासनाने तातडीने घ्यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१५-१६ ते सन २०२०-२१ पर्यंत … Read more

Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले

श्रीरामपूर: शहरातील वॉर्ड नं. २ मधील घासगल्ली भागात काल (शुक्रवारी) सायंकाळी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला करत चाकूने वार केले, ज्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. याशिवाय, एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. वादाचं कारण काय ? घटनेची सुरुवात राहाता तालुक्यातील एका … Read more

‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले

श्रीरामपूर : एमआयडीसी मधील प्रश्नाबाबत आपण गंभीर असून मोठे उद्योग श्रीरामपूरात कसे येतील, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. येथील एमआयडीसीतील कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत नुकतेच उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार ओगले म्हणाले की, २२० केव्हीचे उच्च दाब वीज स्टेशनचे काम लवकरच चालू होणार असून यासाठी आपण महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव … Read more

आमदारांकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; सोयाबीन नेणाऱ्या वाहनावर ३५ हजारांचा दंड केल्याने अधिकाऱ्याचा सत्कार करीत गांधीगीरी

८ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या प्रोड्यूसर कंपनीच्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नावाखाली सोयाबीनची गाडी पकडून ३५ हजार रुपयांचा दंड केला.ही बातमी कानावर येताच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरटीओ कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर घरले. जी तत्परता शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना दाखवली, त्याबद्दल उपस्थितांनी गांधीगिरी करीत … Read more

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात … Read more

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : आ. ओगले

२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ओगले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांना स्पर्श करीत त्यामध्ये दूध दरवाढ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, तसेच सोयाबीन व … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

श्रीरामपूरच्या तरुणाची कौतुकास्पद कामगिरी! बनवले महिला सुरक्षेसाठी ॲप; लवकरच मंजुरी मिळून संपूर्ण देशात होणार अंमलबजावणी

mobile app

Ahilyanagar News:- महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर झाल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करणे हे खूप महत्त्वाचे असून सरकारच्या माध्यमातून देखील त्या पद्धतीने पावले उचलण्यात येत आहेत. दररोज महाराष्ट्र मध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून दिवसेंदिवस हा प्रश्न … Read more