Ahilyanagar News:- महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर झाल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करणे हे खूप महत्त्वाचे असून सरकारच्या माध्यमातून देखील त्या पद्धतीने पावले उचलण्यात येत आहेत.
दररोज महाराष्ट्र मध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून दिवसेंदिवस हा प्रश्न उग्र स्वरूप धारण करत आहे. या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर आपण बघितले तर महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने मात्र कौतुकास्पद कामगिरी केली असून या अभियंत्याने चक्क महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल असे डब्ल्यू-सेफली नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे.
श्रीरामपूरच्या तरुणाने बनवले महिला सुरक्षेसाठी ॲप
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी येथील रहिवाशी असलेला व अहिल्यानगर येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारा नरेंद्र संजय कांबळे या अभियंत्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरेल असे डब्ल्यू सेफली हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे.
विशेष म्हणजे हे एप्लीकेशन आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने देखील स्वीकारले असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या ॲप्लिकेशनला मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या एप्लीकेशन वर अशा पद्धतीने केले काम
नरेंद्र हे गेल्या वर्षभरापासून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्यासंदर्भात काम करत होते. या ॲपमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली आहे व यामध्ये सिम कार्ड किंवा रिचार्ज नसला तरी देखील हे मोबाईल ॲप्लिकेशन काम करणार आहे व ही याची खासियत आहे.
या ॲप्लिकेशनची रचना व कार्यक्षमता कठीण काळात देखील महिलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. नरेंद्र याने दोन महिन्यांपूर्वी सदर मोबाईल ॲप्लिकेशन प्रोजेक्ट भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयामध्ये प्रेझेंट केला होता
व हा प्रोजेक्ट मंत्रालयात मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला सदर मंत्रालयाची मंजुरी मिळून लवकरच देशात त्याची अंमलबजावणी होणार आहे.सध्या नरेंद्र हा अहिल्यानगर येथील राजीव गांधी महाविद्यालयात बीई कंप्यूटर इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असून त्याने शिक्षणासोबतच मिळवलेले हे उत्तुंग यश खूपच कौतुकास्पद असून त्यामुळे त्याचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.