Ahmednagar News : सोशल मीडिया पोस्टवर पोलिसांची करडी नजर

Ahmednagar News

Ahmednagar News : विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे; परंतु याचा काही तरुण दुरुपयोग करीत आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींवर आक्षेपार्ह मजकूर, तलवार घेऊन फोटो टाकतात, तसेच जातीय तेढ निर्माण करतात. अशांवर स्थानिक पोलिसांसह सायबर पोलिसांची विशेष नजर आहे. त्यामुळे शांतता भंग होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकसभा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनो जरा जपून… प्रचार केला तर पडेल महागात !

Ahmednagar News

Ahmednagar News : निवडणूक म्हटली, की अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो, मात्र हा उत्साह एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांत संचारला; तर मात्र मोठा घोळ होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यास परवानगी नाही. उलट असे करताना कुणी कर्मचारी आढळला, तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचारापासून थोडे नाही तर कोसो मैल दूर राहाणे त्यांच्या … Read more

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील वडाळा महादेव येथील मच्छिंद्र विठ्ठल गांगुर्डे (वय ३८) यांनी राहात्या घरापासून काही अंतरावर गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गांगुर्डे रात्री २ वाजता घराबाहेर पडले व परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सकाळी मुलगा विशाल हा ५ वाजता उठला व वडिलांची शोधाशोध करत असताना त्याला समोरील झाडाला वडिलांचा मृतदेह लटकत … Read more

या मोकाट कुत्र्यांचे करायचे काय ? बंदोबस्तासाठी सरकारी स्तरावर प्रयत्नांची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कुठल्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्रे नाहीत, यावरून ही समस्या किती मोठी आहे, हे लक्षात येते. त्यामुळे या समस्येच्या विरोधात केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून राहिले, तर काहीही होणार नाही. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दर वर्षी … Read more

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाबरोबर विजेची मागणी वाढली !

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाल्यामुळे सकाळपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी तर उन्हाची दाहकता जास्तच राहात आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. परिणामी पंखे, कुलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. अजूनही यात वाढच होणार आहे. मागणी व पुरवठा कमीअधिक झाल्याने अगामी काळात महावितरणकडून ग्रामीण शहरी भागात लोडशेडिंग वाढण्याची चिन्हे आहेत. यंदा उन्हाळा कडक … Read more

शितपेयांच्या दुकानांमध्ये होतेय खुलेआम भेसळ

Ahmednagar News

Ahmednagar News : महिन्याभरापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. तेव्हापासून लोकांचा कल थंड पेयांकडे वायू लागला आहे. याचा गैरफायदा काही जणांनी घ्यायला सुरुवात केली असून अनेक शितपेयांना दुकानांमध्ये खुलेआम भेसळ केली जात असून वापरण्यात येणारा बर्फही अशुद्ध पाण्यापासून बनविण्यात येत आहे. बाकडे प्रशासन सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उन्हाचे … Read more

Ahmednagar News : श्रीरामपूरात रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील रेल्वे स्टेशन येथे गुरुवार दि. २८ मार्च रोजी रात्री रेल्वे गाडीतून उतरत असताना रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्र. २ वर साईनगर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आली असता तिच्यातून उतरताना अंदाजे ६० वर्ष वय असलेला … Read more

दुचाकी चोरीतील आरोपीस अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : दुचाकी चोरीतील आरोपीस तात्काळ अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. येथील श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नुकतीच ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी रामभरत शामबिहारी यादव यांची लाल रंगाची यूनिकॉर्न दुचाकी राहत्या घरुन चोरी केली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

श्रीरामपूरच्या ‘त्या’ पतसंस्थेत ८० कोटीच्या ठेवीचे पैसे परत मिळेना ! ठेवीदारांनी घेतली आ. कानडेंची भेट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील एका पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळत नसल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार लहू कानडे यांची नुकतीच भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सदर पतसंस्थेत सुमारे ८० कोटी पेक्षा अधिक रक्कम ठेवीच्या रूपात अडकल्याचे यावेळी ठेवीदारांनी आ. कानडे यांना सांगितले. सदर पतसंस्थेत २५ हून अधिक ठेवीदारांनी वीस हजार ते अकरा लाख रुपये, अशा … Read more

पोल्ट्री व्यवसायाला ऊन व महागाईचा फटका ! पशुखाद्यासह औषधांचे भाव वाढले

Maharashtra News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंद्यांपैकी एक असलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता वाढते ऊन, पाणी टंचाई व महागाईमुळे संकटात सापडला आहे. सध्या तापमानाची तीव्रता वाढत आहे. ब्रॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. महिनाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन सुरू असल्याने अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका … Read more

श्रीरामपूर च्या रिमांड होम मधील विद्यार्थी बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये राहून क.जे. सोमय्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला सागर अशोक चिलप या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड होणे हि बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर … Read more

Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे … Read more

Shrirampur : १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय !

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नी चार तालुक्यातील विविध संघटनांनी शेतकरी संघटनेस पाठींबा दिला आहे. पुढील १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले. दि. १२ मार्चपासून येथील तहसील कार्यालयात अकारी पडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणात काल सोमवारी (दि. १८) काळे बोलत … Read more

शेती महामंडळाची सुमारे १० हेक्टर जमीन पालिकेला, आदिकांच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील नगरपरिषदेस शेती महामंडळाची १० हेक्टर ६० गुंठे क्षेत्र विना मोबदला देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे शहरातील सांडपाणी प्रकल्प व गरिबांसाठी लागणाऱ्या घरकुलाच्या जागेसह सरकारी कार्यालय व कर्मचारी निवासस्थान यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी प्रसिद्धी … Read more

शिर्डीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी तीनही निवडणुकांत बौद्ध समाजाला उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर, अकोले येथील कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरविण्याचा इशारा दिला आहे. मागील निवडणुकीवरही कार्यकर्त्यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. यावेळी मात्र आमचं ठरलंय, असा चंग बांधण्यात आला आहे. महाआघाडीने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत बौद्ध … Read more

Ahmednagar Crime : पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळवले

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तालुक्यातील एका परिसरात राहणारी मुलगी इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी गेली असता, तिला पळवून नेण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी नेवासा तालुक्यातील एका ठिकाणी शिक्षण घेत होती. दहावीचे पेपर असल्याने ती श्रीरामपूर येथून सकाळी नेवासा येथे जाण्यासाठी बसने गेली असता, तिला कोणीतरी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा उपचाराअभावी झाला मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नेवासा मार्गालगत एका शेतात मंगळवारी सकाळी मृत बिबट्या आढळून आला. मात्र बिबट्या आजारी होता तसेच तो उपचाराविना मृत पावला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही उपचारात दिरंगाई झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. श्रीरामपूर-नेवासा मार्गालगत शेतकरी प्रशांत वाघ यांच्या शेताजवळ हा बिबट्या सापडला. माजी सरपंच सचिन पवार, दादासाहेब झिंज आदींनी वनविभाग, तलाठी … Read more

Shrirampur News : आकारी पडीत जमिनी शेतकऱ्यांना देण्याबाबत सरकार सकारात्मक – राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील आकारी पडीत जमिनी देण्याच्या मागणीसाठी आकारी पडीत संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.  यावेळी महसूलमंत्री विखे पाटील यांनी आकारी पडीत शिष्टमंडळाला राज्य सरकार आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याबाबत सकारात्मक असून लवकरच जमिनी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी सभापती … Read more