विवाहितेवर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी!

कर्जत :माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जत तालुक्यात घडली . एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली . या प्रकरणी महेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवस्ती, कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अत्याचारानंतर जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही … Read more

पारनेर मध्ये “सैराट”, मुलीसह जावयाला पेटवलं

पारनेर : आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ‘सैराट’ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ही घटना निघोज येथे घडली. निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग … Read more

आ. शिवाजी कर्डिले यांच्या पुत्राविरुद्ध शिवसेना आक्रमक

नगर : भारतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु आहे. तथापि, नगर शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय अनाधिकृत फलक लावण्यात आले आहेत. असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भारतात लोकसभा निवडणूक २०१९ मुळे आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू आहे. तथापि,  आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे … Read more

बूट फेक प्रकरणी अनिल राठोड व नगरसेवकांच्या जामिनावर उद्या सुनावणी

नगर: महापालिकेतील शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नगरसेवक अशोक बडे व मदन आढाव यांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. बोल्हेगाव उपनगरातील रस्त्याचे काम बंद … Read more

शरद पवारांचा दुसरे नातू विधानसभेच्या आखाड्यात !

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठं राजकीय वलय त्यांना आहे. … Read more

पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

निघोज : पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली. पती-पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात असून गंभीर जखमी आहेत.  निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे … Read more

‘त्या’ने अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन आत्महत्या केले प्रवृत्त

शेवगाव : अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अरुण शहादेव ढाकणे (हसनापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीची आई राधाबाई तुकाराम ढाकणे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मी घरकाम करत असताना मुलगी तेजस्विनी फोनवर बोलताना दिसली. त्यावेळी तू कोणाशी बोलत आहे, मोबाइल कुणाचा आहे … Read more

पिण्यास पाणी न दिल्याने मुलीचा विनयभंग

राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते. यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने … Read more

सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरुन मृत्यु

राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व … Read more

श्रीगोंद्यात तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत विनयभंग

श्रीगोंदे :- तालुक्यातील टाकळी लोणार गावातील १५-१६ गावगुंडांनी मद्याच्या नशेत शिवीगाळ व अरेआवी करत तमाशातील पुरुष व महिला कलावंतांशी असभ्य वर्तन व झटापट केली. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ एप्रिलला टाकळी लोणार येथील म्हसोबा यात्रेनिमित्त … Read more

कॉंग्रेसला मोठा धक्का,विखे पाटील कॉंग्रेस सोडणार ?

शिर्डी : राज्याचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे.  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या पक्षावर जाहीर टीका करताना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय असे वक्तव्य केले. दरम्यान स्वताच्याच पक्षावर टीका करताना उद्या सकाळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, … Read more

ट्रकचालकाची चाकूचा धाक दाखवून लुट

अहमदनगर :- कल्याण रोड चौकातून एमआयडीसी बायपासने जात असलेल्या ट्रकचालकास दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी ट्रकचालक किसन महादेव देसाई (रा. साबलखेड, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नालेगाव शिवारातील रेल्वे ब्रिजजवळ ट्रक आला असता पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ट्रक थांबवून ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून … Read more

लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात ‘ड्राय डे’ !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात श्रीरामपूर तालुका परमीट रुम अँड वाईन शॉप ओनर्स सोशल असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. त्यावर पुन्हा झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेऊन संबंधितांच्या … Read more

खा . दिलीप गांधी समर्थकांची भूमिका गुलदस्त्यात

अहमदनगर :- तिनदा लोकसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे खा. दिलीप गांधी यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात आले. पक्षाकडून अन्याय होऊनही खा. गांधी यांनी पक्षनिष्ठा राखत डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराची कमान सांभाळण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर खा. दिलीप गांधी यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. कंठ दाटून … Read more

किंगमेकर असणारे आ. शिवाजीराव कर्डिले द्विधा मन:स्थितीत !

राहुरी – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये वेळोवेळी मीच किंगमेकर म्हणणारे आ. शिवाजीराव कर्डिले हे द्विधा मन:स्थितीत दिसून आले आहे. एकीकडे जावई संग्राम जगताप तर दुसरीकडे आपल्या पक्षाने दिलेले डॉ. सुजय विखे या उमेदवारांपैकी आ. कर्डिले कोणाला मदत करणार हे कोडे मतमोजणीनंतरच उघड होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील … Read more

खा.दिलीप गांधी म्हणतात पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी १ लाख कोटींचा निधी आणला !

अहमदनगर :- नगर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात १ लाख कोटींचा निधी आणला, असा दावा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. गांधी म्हणाले, भाजपचा खासदार म्हणूनच मी निवडूण आलो.केवळ जैन समाजाचा नाही, तरसर्व समाज, संघटना व जनतेने मला पाठबळ दिले.यापुर्वीही मी हे स्पष्ट केलेले आहे. मात्र … Read more

श्रीगोद्यात ट्रकच्या धडकेत एक ठार

श्रीगोंदा :- दोन मालमोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता मढेवडगाव येथे घडली. नगर-दौंड रस्त्यावर बसस्थानकाशेजारी गव्हाचे पोते भरलेली मालमोटार (आरजे ०९ जीडी १६१९) उभी होती. गाडीला रिफ्लेक्टर नसल्याने पाठीमागून आलेल्या बटाटा भरलेल्या मालमोटाराची (आरजे ११ जीए ६१७०) तिला जोरदार धडक बसली. या अपघातात क्लीनर रामलखन प्रीतमसिंह … Read more

झाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू

राहुरी :- वाळलेल्या झाडाची फांदी चालत्या दुचाकीवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी धामोरी राहुरी स्टेशन रस्त्यावर ही घटना घडली. शकुंतला धोंडिराम उगले (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होत्या. अचानक त्याच्या दुचाकीवर वाळलेल्या झाडाची फांदी पडली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रंगनाथ उगले याच्या … Read more