Ahmednagar Breaking : शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, गोळी कट्ट्यात अडकली.. भर चौकात थरार!

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पारनेर शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या हॉटेल दिग्विजय समोर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या दरम्यान नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु कट्ट्यात ही गोळी फसल्याने फक्त आवाज झाला. पुढील गोळी झाडण्याच्या आधीच तेथील एकाने पिस्तूल हिसकवल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. घटनेची … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले बिगर पैसेवाल्याने पैसेवाल्यांना घाम फोडलाय !

Ahmednagar News

Ahmednagar News : जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात, असा सवाल करतानाच बिगर पैसेवाल्यामुळे पैसेवाल्याला घाम फुटलाय. पैसेवाले फार आहेत. पैसेवाल्यांना घाबरत नाहीत, बिगर पैसेवाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित स्नेहमेळाव्यात आ. नीलेश लंके … Read more

Ahmednagar News : दोन महिने उलटले तरी गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई नाहीच, शेतकरी आक्रमक

पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील काही गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. महसूल विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत ही मदत न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सिद्वेवरवाडी, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, … Read more

लाखोंच्या विकासकामांना सुरवात.., आ. नीलेश लंके म्हणतात विकासकामांत राजकारण केल्याने गावांचा विकास थांबतो..

MLA Nilesh Lanke

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वासुंदे गावाचे व माझे वेगळे नाते आहे. वासुंदे गावासाठी अद्याप पर्यंत वेगवेगळ्या निधीतून जवळपास १२ ते १३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु विकास कामे व राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून विकास कामात राजकारण आणता कामा नये. विकास कामात राजकारण आल्यास गावचा विकास खुंटतो अशी खंत आमदार नीलेश लंके … Read more

जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या आमिषाला बळी पडू नये – आ.निलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नये, असे आवाहन आमदार डॉ, निलेश लंके यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर करण्यात आलेल्या २१ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ निघोज येथे आ निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी आ. लंके पुढे म्हणाले … Read more

पारनेर तालुक्यातील ‘ह्या’ रस्त्यांसाठी २५ कोटी मंजूर – आ. निलेश लंके

राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील ३६ गावांमधील १०५ किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली. विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत … Read more

डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर, मी १७०० कोटींची कामे केली – आ.नीलेश लंके

आजपर्यंत पारनेरमधील जनतेसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे दिली. निघोजसाठी सर्वाधिक ७० कोटी ११ लाखांची विकासकामे दिली. डाळ साखर वाटप करण्यापेक्षा जनतेसाठी विकासकामे नक्कीच फायदेशीर असतात अशी टिप्पणी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत आ.नीलेश लंके यांनी केली. मंगळवार (दि.३०) सायंकाळी सात वाजता निघोज परिसरातील २० कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके … Read more

Pikvima : बाजरी, मूग व कांदा उत्पादकांना विम्याचा लाभ द्या

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२०२४ च्या खरीप हंगामामधील सोयाबीन व मका, या पिकांना ज्या प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अग्रीम रक्कम देण्यात आली, त्याचप्रमाणे बाजरी, मूग व कांदा, पीकउत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील बाजरी, मूग व कांदा, या … Read more

Ahmednagar Breaking: अहमदनगरमध्ये भीषण अपघात, कंटेनरने दुचाकीला चिरडले ! आई वडील बहीण भावाचा मृत्यू

Ahmednagar Breaking : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी (दि. २८) कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्वजण पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील रहिवासी आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी … Read more

Ahmednagar Loksabha News : कार्यकर्ते म्हणाले निवडणूक लढवा ! पण आमदार निलेश लंके यांच्या मनात चाललंय तरी काय ?

Ahmednagar Loksabha News : नगर दक्षिण मधील जनतेच्या मनातील खासदार हे आमदार निलेश लंके किंवा राणीताई लंके हेच आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपण लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांच्यासमोर धरला. परंतु याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे किंवा भाष्य करणे टाळले. प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मतभेद झाले तरी मनभेद करू नका … Read more

Ahmednagar News : झोपलेला असल्याने मित्रांनी तरुणास कारमध्येच ठेवले, बसने उडवले..

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात काल (बुधवार) भीषण अपघत झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार झाले होते. यात टाकळीमानुर (ता.पाथर्डी) येथील एका तरुणाचा समावेश होता. सचिन कांतीलाल मंडलेचा असे या तरुणाचे नाव होते. मृत सचिन यांचा शिरूर कासार (जि.बीड) येथे इलेक्ट्रिक दुकान व कृषी अवजारे विक्रीचा मोठा व्यवसाय होता. मृत सचिन हे आपल्या … Read more

जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ शिदा गावोगावी … Read more

पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे. मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं … Read more

Ahmednagar News : पारनेर तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवारी पारनेर तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर पारनेर तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने जनजीव ठप्प झाले होते तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात गहू व ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढणीत आसतात, आशात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर … Read more

Ahmednagar News : अबब ! पाच एकरावरील तूर चोरली, हार्वेस्टर लावून कापून नेली  

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध चोरीच्या घटना घडताना दिसतात. पैसे, ऐवज आदींसह शेतीमाल चोरण्याच्याही घटना घडताना दिसतात. आता मात्र थक्क करणारी घटना समोर आली आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल पाच एकरावरील तूर चोरून नेण्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद येथे ही घटना घडली. पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद येथील गट नंबर ११३१/५ … Read more

Ahmednagar News : वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजलं, पत्नीसह गळफास घेतला, सहा वर्षाच्या चिमुरड्यास पाण्यात फेकले…क्षणात सगळं संपलं

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक भयावह घटना समोर आली आहे. वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजलं. त्यानंतर पत्नीसह स्वतः गळफास घेतला. यात नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलाचा अंत झाला. याघटनेने एक हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपल. गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे, दुर्वेश रोकडे अशी मृतांची नावे आहेत. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील … Read more

Ahmadnagar Loksabha : उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार !

Ahmadnagar Loksabha

Ahmadnagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठीची इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेस आज श्रीक्षेत्र मोहटा देवीची महापूजा करून प्रारंभ करण्यात आला. नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जाऊन शिवप्रेमींशी संवाद साधणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे, याचा … Read more

Ahmednagar Breaking : मोदी सरकाराचा विकसित भारत संकल्प रथ गावात येताच शेतकऱ्यांचा ‘राडा’, रथ पेटवून देण्याचा इशारा देत हकालपट्टी

केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आलेला विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ शेतकऱ्यांनी गावातून परतवून लावला. ही घटना रविवारी (३१ डिसेंबर) पोखरी येथे घडली.कांद्यासह महागाईच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले होते. केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. हा रथ पोखरी येथे आला असता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद कोणी … Read more