Ahmednagar Loksabha News : कार्यकर्ते म्हणाले निवडणूक लढवा ! पण आमदार निलेश लंके यांच्या मनात चाललंय तरी काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Loksabha News : नगर दक्षिण मधील जनतेच्या मनातील खासदार हे आमदार निलेश लंके किंवा राणीताई लंके हेच आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपण लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांच्यासमोर धरला. परंतु याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे किंवा भाष्य करणे टाळले.

प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मतभेद झाले तरी मनभेद करू नका संघटितपणे लोकसेवा करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दिला.

निलेश लंके प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन सालाबाद प्रमाणे देहू येथे निलेश लंके प्रतिष्ठान कुटुंबातील स्नेह मेळावा म्हणून पार पाडला .सदर मेळाव्यास नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासह पारनेर मतदार संघातीलही हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवत कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्याचे आयोजन माऊली चौधरी यांच्यासह देहूच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते.सहा वर्षांपूर्वी ठराविक विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देहू येथे पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा संकल्प करण्यात आला होता.

त्याचबरोबर निलेश लंके प्रतिष्ठानचे सुद्धा स्थापना करण्यात आली. दरम्यान येथे घेण्यात आलेला संकल्प सिद्धीस पूर्ण करत आ पारनेरचे मैदान आमदार निलेश लंके यांनी जिंकले. नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार व्हावा या उद्देशाने पक्षाकडून जोरदार प्रयत्न गेल्या काही टर्मला करण्यात आले.

हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्याच्या अनुषंगाने प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या आमदार निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना या मैदानात उतरवण्याचे पक्षश्रेष्ठीच्या मनात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

देहू येथे शनिवारी झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत आपण उतरण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. निलेश निलेश लंके किंवा राणीताईंना दिल्लीत पाठवण्याच्या सुरात अनेकांनी सूर मिसळवला.

ज्याप्रमाणे 2019 ला जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली. त्यानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लंके कुटुंबीयांपैकी जो उमेदवार असेल तो खासदार झाल्याशिवाय राहणार नाही कारण संपूर्ण जनतेची तीच इच्छा आहे अशा प्रकारचा मतप्रवाह उस्फूर्तपणे वाहिला.