पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Published on -

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे.

मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं डोळ्यासमोर उद्धवस्त झाली होती. हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसारनोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची १६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहिती आ.नीलेश लंके यांनी दिली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्यासाठी आ. लंके यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. आ. लंके यांच्या या लक्षवेधीची सरकारने दखल घेत हे अनुदान मंजुर केले आहे.

नोहेंबर महिन्यात दोन दिवस झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. रविवार दि.२६ नोहेंबर रोजी गारपीट झाल्यानंतर आ. लंके यांनी सोमवारी सकाळीच मोठया प्रमाणावर गारपीट झालेल्या पानोली, वडूले, सांगवी सुर्या, गांजीभोयरे या गावांना भेटी देत शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.

नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. लंके यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही संपर्क करून लंके यांनी गारपीटीने झालेल्या नुकसानीबाबत सतत पाठपुरावा केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!