Ahmednagar News : झोपलेला असल्याने मित्रांनी तरुणास कारमध्येच ठेवले, बसने उडवले..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात काल (बुधवार) भीषण अपघत झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार झाले होते. यात टाकळीमानुर (ता.पाथर्डी) येथील एका तरुणाचा समावेश होता. सचिन कांतीलाल मंडलेचा असे या तरुणाचे नाव होते.

मृत सचिन यांचा शिरूर कासार (जि.बीड) येथे इलेक्ट्रिक दुकान व कृषी अवजारे विक्रीचा मोठा व्यवसाय होता. मृत सचिन हे आपल्या मित्रांसह कल्याणहून बुधवारी रात्री नगरकडे येत होते. ते स्वतः गाडी चालवत होते. परंतु गाडी चालवताना झोप येत असल्याने मंडलेचा यांनी मित्राला गाडी चालवण्यास सांगितले व ते स्वतः मागील सीटवर झोपी गेले.

भाळवणी शिवारात आल्यानंतर तेथे अपघातग्रस्त ट्रॅक्टर क्रेनच्या साह्याने बाजूला हटवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून त्यांचे दोन मित्र गाडीतून उतरून अपघात पाहण्यासाठी गेले. त्यांनी मंडलेचा यांना ते झोपलेले असल्याने त्यांना गाडीतच ठेवले.

काही वेळातच कल्याणहून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या बसने कारसह ट्रॅक्टरसह ९ जणांना चिरडले. त्यात कारमध्ये झोपलेल्या मंडलेचा यांचा मृत्यू झाला. दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले. सचिन मंडलेचा यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.