‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातील तालुकास्तरीय विजेत्या शाळांची बक्षिसे का दिली नाहीत ? : तनपुरे

prasad tanapure

शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा निर्माण होऊन शाळांमध्ये त्या अनुषंगाने निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानातील तालुकास्तरीय विजेत्या शाळांची घोषणा होऊन चार पाच महिने झाले, तरी अजूनही त्याची बक्षीसे का देण्यात आली नाही? असा प्रश्न डॉ बाबुराव बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद … Read more

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर- मनमाड राज्य महामार्गावर कोल्हार खुर्द परिसरात वेश्या व्यवसायावर छापा !

veshya

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर- मनमाड राज्य महामार्गावर कोल्हार खुर्द परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी दि. २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले, तसेच दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील हॉटेल न्यू प्रसादजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये … Read more

स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राहुरीतील प्रशासकीय कार्यालयांना विरोध, कर्डिले यांची आ. तनपुरेंवर टीका !

kardile

राहुरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासकीय इमारतींचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमच्या प्रयत्नाने झाला. हे विद्यमान लोकप्रतिनिधींचे अपयश असून ते झाकण्यासाठी आता प्रशासकीय कार्यालये शहराच्या बाहेर जाऊ नये, अशी स्टंटबाजी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे करत असल्याची टीका जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री … Read more

राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण !

apaharan

राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी परिसरात १७ वर्षे ६ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तीच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. ही घटना दि. २७ जुलै २०२४ रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, या घटनेतील १७ वर्षे ६ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी परिसरात तीच्या कुटुंबासह राहत होती. … Read more

राहुरीतील शासकीय कार्यालये शहराचे बाहेर नेण्याचा तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाचा निषेध : आ. तनपुरे

tanpure

शहरात असलेली शासकीय कार्यालये शहराचे बाहेर नेण्याचा तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाचा आपण निषेध करतो. वास्तविक हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी महणून मला व व्यापारी वर्गाला विश्वासात न घेता केलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालये व ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्याचा विषय आपण अनेकदा विधानसभेत … Read more

अहमदनगर जिल्ह्याची जलदायिनी असलेलया मुळातील पाणीसाठ्याचा लोखंडी दरवाज्याला स्पर्श !

mula dharan

येथील मुळा धरणातील पाणीसाठा १४ हजार ६२६ दशलक्ष घनफूट झाला असून धरणातील पाण्याने लोखंडी दरवाज्याला स्पर्श केला आहे. त्यामुळे मुळा लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. तर धरणात कोतुळ येथून ६२६० क्यूसेसने आवक सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. अहिल्यानगर जिल्ह्याची जलदायिनी असलेले २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात का ल … Read more

विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहील नाही, महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी !

vikhe patil

लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम सुरु करा. येणा-या काळात विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला तुम्‍हाला तेवढ्याच ताकदीने उत्‍तर देण्‍याचे काम करायचे आहे. विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहीलेले नाही. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचे मोठे काम आपल्‍याकडे आहे. पुढील साठ दिवसात प्रत्‍येक गावापर्यंत योजना … Read more

मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण !

mula dharan

अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचल्याने राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी ६ वाजता कोतूळ येथील पाण्याची आवक मंदावली असली तरी मुळा धरणात १२ हजार ९८० दशलक्ष घनफुट झाला असून धरण ५० टक्के झाले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड प्रमाणात तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढला. … Read more

चोरट्याने परत आणून ठेवलेले चार तोळ्याचे सोन्याचे गंठण राहुरी पोलिसांकडून मूळ मालकाला परत !

chori

राहुरी तालुक्यातील कणगर येथे भर दिवसा अज्ञात भामट्याने गाढे यांच्या घरात घुसून घरातील रोख रक्कमेसह सात तोळे सोन्याचे दागीने पळवून नेल्याची घटना दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. तपासादरम्यान पोलिस पथकाला मिळून आलेले सोन्याचे गंठण गाढे यांना परत करण्यात आले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की स्वाती अशोक गाढे (वय ३५ वर्षे) या … Read more

प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याच्या खून प्रकरणातील आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी !

karagruh

राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील चार आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील प्रतिथयश वकील आढाव दाम्पत्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७५/२०२४ नुसार दाखल आहे. या प्रकरणाचा खटला सध्या सुरू आहे. यातील आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत … Read more

राहुरीच्या आठवडे बाजारातील अवैध वसुली थांबणार, ठेकेदार व अधिकाऱ्यावर होणार कारवाई !

rahuri bajar

राहुरी शहर येथील आठवडे बाजारात ठेकेदाराने शेतकऱ्यांकडून पालिकेने ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली असल्यास ती त्यांना तातडीने परत द्यावी व संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून ठेका रद्द करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार हा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील आठवडे … Read more

राहुरीत दरोड्याच्या तयारीतील पाच जण अटकेत, दोन आरोपी पसार, राहुरी पोलिसांची कारवाई !

police caught thief

राहुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सशस्त्र आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या पैकी पाच आरोपींना वाहन व हत्यारांसह अटक केल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले. राहुरी पोलीस स्टेशनच्या गस्त करणाऱ्या पथकास माहिती मिळाली की, गुहा परिसरामध्ये काही संशयीत लोक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची मालवाहतूक गाडी व मोटरसायकलने येऊन दरोड्याच्या तयारीने टेहळणी करत आहे. … Read more

राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी एकजण अटकेत !

apaharan

राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले, की दि. १२ जून रोजी राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत प्रवीण भोसले याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल … Read more

राहुरीच्या पूर्व भागात पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी आनंदित !

sheti

सोमवारी दुपारी राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, त्याचप्रमाणे ऊस, मका, कांदा, सहित घासासारख्या चारा पिकांना देखील जीवदान मिळाले आहे. या भागातील शेतकरी, कष्टकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर सोमवारी दुपारी सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्याची पुढील आठ ते पंधरा दिवस पिकांना पाणी देण्याची चिंता यामुळे मिटली आहे. … Read more

स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी लाभार्थी भगिनींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे पाप भाजपवाल्यांनी करू नये !

rashtravadi

राहुरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांची यंत्रणा महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी झटून काम करीत आहे. या गोष्टीचा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांना पोटशूळ उठला आहे. यापेक्षा भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी सरकारने या अर्थ संकल्पात मतदारसंघाला एक रुपयाचाही निधी का दिला नाही, असा जाब शासनाला विचारायला पाहिजे होता. मात्र त्यांनी हे काम न करता … Read more

ज्यांनी आधी नवे ठेवली आता तेच लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत – कर्डीले !

kardile

राज्यातील गोरगरीब, गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील गोरगरीब गरजू पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेला राज्यभरातून सर्व महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेला आधी नावे ठेवणारे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आता या योजनेचे श्रेय … Read more

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोन रोड रोमिओंवर गुन्हा दाखल !

chedchad

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका कॉलेज तरुणीने दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना एका महिन्याचा कालावधी का लागला … Read more

माजी खा. तनपुरे यांचे महसूलमंत्र्यांना पत्र, राहुरीतील प्रशासकीय कार्यालये शहराबाहेर नेण्याचा घाट घालू नये !

prasad tanapure

राहुरी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती शहराच्या बाहेर बिजगुणन प्रक्षेत्रावर बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते तालुक्यातून येणाऱ्या जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे असून ते बाहेर हलवू नये, अन्यथा या निर्णयविरुद्ध जनआंदोलन होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय प्रतिष्ठेचा न करता याचा फेरविचार व्हावा, असे पत्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिले आहे. माजी … Read more