जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी घेतला आरोग्य विभागाच्या योजनांचा तपशीलवार आढावा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यावर भर द्यावा. रुग्णांच्या सोईसाठी आणि त्यांच्यावरील उपचारासाठी आवश्यक असणार्‍या बाबींची पूर्तता करण्यावर भर द्यावा. त्यासाठीचा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच इतर आरोग्य … Read more

जिल्ह्यातील विशेष पुन:रिक्षण कार्यक्रम अंमलबजावणीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी व्यक्त केले समाधान

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याशी चर्चा केली. अधिकाधिक नवमतदार नोंदणी, मतदान केंद्रांचे बळकटीकरण तसेच दुबार मतदार वगळणी करण्याबाबत या विशेष मोहिमेत भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हास्तरावर विशेष पुनरिक्षण … Read more

कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला पाच हजारांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा … Read more

जिल्ह्यातील 37 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे व कंसात नेमणूकीचे ठिकाण- राजेंद्र मोरे (संगमनेर शहर), पोपट कटारे (शनिशिंगणापूर), संजय सदलापुरकर, नितीन कवडे, रमेश कुलांगे, पांडूरंग शिंदे, ज्ञानदेव ठाणगे (नगर), … Read more

गतिमान काम करा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ‘महाआवास अभियान – ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांनी गावनिहाय विविध प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन येत्या आठ दिवसात परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. या अभियानाची जिल्ह्यात योग्य प्रकारे … Read more

चोरट्यांच्या भीतीनं नागरिकांची झोप उडाली; पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. नवीन पोलीस अधीक्षक येऊनही नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई शहरातील ताराकपूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ नोव्हेंबर २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके याना गोपनिय माहीती मिळाली कि, शिरपूर जि.धुळे येथून दोन इसम अहमदनगर येथे … Read more

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी २ डिसेंबरला

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कीर्तनातून पीसीपीएनडीफ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता ०२ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी इंदोरीकर यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या कायम,आजही वाढले ‘इतके’ रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३८ ने वाढ झाली. … Read more

बायकोला मोबाईल मागितला म्हणून डोक्यात पाटा घालून डोके फोडले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नवऱ्याने बायकोकडं तिचा मोबाईल मागितला असता त्याचा राग आल्याने बायकोने नवऱ्याच्या डोक्यात मसाला वाटण्याचा पाटा मारून डोके फोडले. तर मुलीलाही लाथाबुक्याने मारून तोंड दाबून बेशुद्ध पाडले. या खळबळजनक प्रकरणी नवऱ्याच्या फिर्यादीवरून बायकोवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिदास गंगाधर जाधव, वय ३५ रा. वेल्हाळे गावठाण, ता. संगमनेर … Read more

अतिक्रमण धारकांवर महसूल विभागाचा आशीर्वाद

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत असणार्‍या महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर काही इसमानी अवैधपणे अतिक्रमणं केले आहे. हि बाब महसूल विभागाच्या लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत वनविभागाचे … Read more

बायपास रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून टेम्पो चालकाला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. सद्यस्थिती महिन्यात हे प्रकार अधिक वाढीस लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. नुकतेच नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे आयशर टेम्पो उभा … Read more

वाळू तस्करांनी तलाठी व महसूल कर्मचाऱ्याला बदडले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करांकडून अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. तसेच त्यांच्यावर कारवाईसाठी गेलेली अधिकारी कर्मचाऱ्यांवर आजवर अनेकदा जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील घारगाव शिवारात नाशिक पुणे महामार्गावर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असलेले डंपर संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी महसूल विभागाचा एक दिवसीय संप

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाला साथ म्हणून नेवासा येथे देखील एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. आज 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नेवासा येथील महसूल कर्मचार्‍यांनी … Read more

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगाव येथील एक महिला घरासमोर असताना तिलाच गुलाब शेख नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली … Read more

वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक; महावितरण कार्यालयात तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती.अनेकांची कामं,उद्योग ठप्प होते.त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे. यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत. वीजबिल माफ करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या मनसेने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यानी आज महावितरण कंपनींच्या कार्यालयावर … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी भेंड्यामध्ये रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगारविरोधी चार श्रम संहिता रद्द करा,किमान वेतन दरमहा रु. 21 हजार करावे, असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा , पेन्शन,एस.आय , प्रॉव्हिडंट फंड इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात… आदी प्रलंबित मागण्यांसाठी नेवासा तालुका किसान सभा व हमाल पंचायतीच्या वतीने तालुक्यातील भेंडा … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी, कामगारांचा मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात मोर्चा धडकला. … Read more