शेवगाव व पाथर्डी दोन्ही तालुक्यात कधीही भेदभाव न करता समान निधी दिला : आ. राजळे

monika rajale

गेली १० वर्षापासून आमदार असताना मी कधीही भेदभाव न करता शेवगाव व पाथर्डी या दोन्ही ही तालुक्यात विकासाची समान कामे करण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला असून, मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल, तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी, दहिगाव शे, बोधेगावसह सोनविहीर ते कांबी या … Read more

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात ग्रामसडक योजनेअंतर्गत ५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर – आ. राजळे !

monika rajale

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक २ मधून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील ३९ कि.मी. सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ५४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात प्रथमच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना एवढा मोठा निधी मिळाला आहे. याबाबत माहिती देताना … Read more

तिसगावमधील ८३ अतिक्रमणधारक वगळता उर्वरित अतिक्रमणांवर २२ जुलैला पडणार हातोडा ?

tisgav

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील ४०१ अतिक्रमणधारकांपैकी ८३ लोकांचे अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयास अहमदनगरच्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे तर उर्वरित ३१८ लोकांचे २२ जुलैला अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती समजली आहे. तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील गायरान क्षेत्रामध्ये लोकांनी अतिक्रमण केले म्हणून हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी … Read more

राहात्यात १६० कोटींचा पीक विमा मंजूर, ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ !

pik vima

महायुती सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपयांचा पीक विमा मंजुर झाला असून, यापैकी ४०.८५ कोटी रुपये अग्रीम रक्कमेच्या माध्यमातून यापुर्वीच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पुर्णपणे मिळावी यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. … Read more

राहुरीच्या आठवडे बाजारातील अवैध वसुली थांबणार, ठेकेदार व अधिकाऱ्यावर होणार कारवाई !

rahuri bajar

राहुरी शहर येथील आठवडे बाजारात ठेकेदाराने शेतकऱ्यांकडून पालिकेने ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली असल्यास ती त्यांना तातडीने परत द्यावी व संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून ठेका रद्द करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार हा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील आठवडे … Read more

कर्मचाऱ्याकडून सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ, मारहाण अन जीवे मारण्याची धमकी ; नगरमधील घटना

Ahmednagar News : आधीच महावितरणकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अनेकदा कामास विलंब होतो परिणामी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. न सांगता वारंवार – गैरहजर का राहतो, कामावर दारू पिऊन का येतो अशी विचारणा केल्याचा राग येवून महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची तसेच जातीयवादी संघटनेकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी … Read more

इंडियन ट्रेडमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची अडीच लाखांची फसवणूक ; नगरमधील घटना

Ahmednagar News : नगर शहरात तसेच ग्रामीण भागात शेअर मार्केटिंग करणाऱ्यांची संख्या कमी नाही. यात मागील काही दिवसांपासून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात शेवगाव तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र सध्या ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी येथील परिस्थीती झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील तिघा मित्रांची तब्बल … Read more

राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत खा. नीलेश लंके मतदान करणार ! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Ahmednagar News : राज्य कब्बडी संघटनेच्या निवडणुकीत खासदार नीलेश लंके तसेच सच्चिदानंद भोसले यांना मतदान करण्याचा अधिकार  मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.       राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीसाठी अंतिम यादीतील बदल अहवाल वेळेत न दिल्याचे कारण देत मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठविण्यात आलेले अवैध ठरविल्याच्या निर्णयाविरोधात खा. नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांनी मुंबई … Read more

दूध दराबाबत ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ahmednagar News : शेती उत्‍पादीत मालाप्रमाणेच दूध उत्‍पादक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने दूधाला आधारभूत किंमत ठरवून देण्‍याबाबतचा कायदा तातडीने करावा अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्‍याकडे दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना मंत्री विखे पाटील यांनी दूग्‍ध व्‍यवसाया संदर्भात सविस्‍तर पत्र दिले असून, … Read more

महत्वाची बातमी : गुरुपौर्णिमेनिमित्त पोलीस अधीक्षकांनी शिर्डी येथील वाहतुकीत केले ‘हे’ मोठे बदल

Ahmednagar News : आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेत गुरुपौर्णिमेला विशेष स्थान आहे. हा सण गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण ते आपल्याला ज्ञान, शिक्षण आणि जीवन जगण्याची कला शिकवतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करतात … Read more

वाळूतस्करांनी नाला बुजवला,राखीव वनातील मोठी वृक्षसंपदा तोडली ; अन केला तब्बल सात हजार ब्रासपेक्षा अधिक वाळूचा उपसा

Ahmednagar News : जिल्ह्यातील सर्वच नदीकाठच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. या वाळू उपशामुळे परिसरातील शांतता धोक्यात येत आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे असा वाळूउपसा रोखण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र तरी देखील वाळूतस्कर वाळूची वाहतुक करतात. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून … Read more

मायलेकाच्या दुचाकीला ट्रकची धडक ; आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर

Ahmednagar News : दिवसेंदिवस अपघातांच्या घटनात वाढ होत आहे. रोज जिल्ह्यात अपघात झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. मात्र या अपघातात अनेक निरपराध नागरिक आपला जीव गमावतात. नुकतेच मोटारसायकलवर आई आणि मुलगा जात होते. दरम्यान समोर गतीरोधक असल्याने त्या मुलाने मोटारसायकलचा वेग कमी केला. मात्र पाठीमागून वेगात आलेल्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आईचा … Read more

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ahmednagar News : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार कु. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे. या तपासणीतून असे उघड झाले आहे की तिने परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल … Read more

जलजीवन मिशनची कासवगती : १ हजार ४५० कोटी रुपये खर्च अन दोन वर्षांत अवघ्या पाच पाणीयोजनांची कामे पूर्ण …!

Ahmednagar News : केंद्र व राज्य शासनाने गाजावाजा करत जलजीवन मिशन ही योजना सुरु केली. मात्र जिल्ह्यात ही योजना अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे या योजनेला सुरुवात होऊन दोन वर्षे उलटली असून या दोन वर्षात या योजनांची ११२ पाणीयोजनांपैकी अवघ्या पाच पाणीयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ६७ पाणीयोजनांची कामे ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे … Read more

आधी मुलीचे फोटो काढले मग व्हायरल करून बदनामीची धमकी; समजून सांगणाऱ्यास दगड व लाकडी दांडक्याने … !

Ahmednagar News : सध्या तंत्रज्ञाच्या साहाय्याने अनेकांनी मोठी प्रगती केली आहे. तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानाच दुरुपयोग करत अनेकांची फसवणूक करण्याच्या घटना देखील घडत आहेत. आज प्रत्येकाकडे मोबाइल फोन आहे. परंतु काहीजण त्याचा दुरूपयोग करत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यात अनेकदा नकळत खासगी फोटो, व्हिडिओ काढले जातात व नंतर संबंधितास पैशांची मागणी केली जाते. जर पैसे … Read more

ट्रकने अंत्यविधीवरून येणाऱ्या गावकऱ्यांना चिरडलं ! पाच ठार, कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात

apghat

Ahmednagar News : कल्याण नगर महामार्गावर एक भीषण घटना घडल्याचे वृत्त आले आहे. अंत्यविधीवरुन परतत असणाऱ्या नागरिकांना ट्रकने चिरडले आहे. यात पाच गावकरी ठार झाले आहेत. गावातील व्यक्तीचा अंत्यविधी कार्यक्रम उरकून येत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून रास्ता रोकोची भूमिका नागरिकांनी घेतली असल्याची माहिती समजली आहे. अधिक माहिती अशी : … Read more

नगर-सोलापूर महामार्ग.. ९ दरोडेखोर अन ‘तो’ व्यावसायिक.. भरदिवसा थरार..

gun

Ahmednagar News : नगर-सोलापूर महामार्गालगतचे गाव.. ९ दरोडेखोरांची टोळी.. भर दुपारी चार ची वेळ… ‘तो’ व्यावसायिक व त्याचा मित्र.. अन रंगला लुटीचा थरार.. ही घटना घडली मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ४च्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील वाटेफळ (ता.नगर) शिवारात. रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला ९ दरोडेखोरांच्या टोळीने मारहाण करत त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ.. बंदुकीच्या फैरी.. अन घबराट..अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

thieves

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. अनेक ठिकाणी धाडसी चोऱ्यांचे प्रकारही घडले आहेत. आता थेट बंदुकीच्या फैरी झाडून चोरट्यांना पळवून लावावे लागले असल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथे. भावडी येथे सुभाष भोस यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. गावापासून काही अंतरावर वास्तव्यास असल्याने भोस यांनी सुरक्षेच्या … Read more