खासदार लंके स्पष्ट बोलले : सरकारच्या ‘या लाडक्या’ योजना म्हणजे निवडणुकीसाठी वापरलेले गाजर; मात्र अशा योजना नव्हे तर ‘हे’ आहे आपले व्हिजन ..!

Ahmednagar News : सरकारच्या नवनवीन योजनांचे आम्ही स्वागत करतो परंतु या लाडक्या योजना म्हणजे निवडणुकीसाठी वापरलेले गाजर असून, सरकारने नवनवीन योजना आणण्याऐवजी, आहे त्याच योजना जर व्यवस्थित राबवल्या तर नवीन योजनांची गरज पडणार नाही, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी बन्नोमां दर्गा या ठिकाणी बोधेगावसह परिसरातील लोकनेते … Read more

खा. नीलेश लंके यांचा एस.टी. प्रवास अन् प्रवाशांना सुखद धक्का ! नगर ते तिसगांव प्रवासात जाणून घेतल्या समस्या

nilesh lanke

नगर : खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी नगर ते तिसगांव या मार्गावर एसटीने प्रवास करीत बसमधील प्रवाशांना आश्‍चर्याचा धक्का दिला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. नीलेश लंके यांच्यासारखाच खासदार हवा अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी यावेळी दिल्या. पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार खा. लंके हे तिसगांव येथे जाणार होते. स्वतंत्र वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी एसटी ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. … Read more

अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या सोबत घडला धक्कादायक प्रकार, अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्का देणारी बातमी आली आहे. नगर – वडगाव गुप्ता परिसरात असलेल्या शेतजमिनीत प्लॉट पाडून परस्पर सुमारे ३३ जणांना खरेदीखत करून देत विक्री करून एकाने राष्ट्रवादीचे अॅड. प्रताप ढाकणे यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रेणिक धरमचंद खाबिया (रा. सावेडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व टीडीओमध्ये तू तू मै मै, व्हिडिओ व्हायरल !

lalage

पारनेर : प्रतिनिधी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला. अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापले व दोघांमध्ये तू तू, मै मै झाली. तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो, असे सांगत लाळगे यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री … Read more

शिर्डीत आलेले ‘ते’ दोघे दहशतवादी नाहीच ! आले होते ‘हे’ मोठे ‘कांड’ करायला

shirdi

Ahmednagar News  :  शिर्डीत विना नंबरच्या कार ने येऊन शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये उतरलेले ते दोघे संशयित तरूण पोलिसांच्या हाती लागल्याचे विश्वसनीय वृत्त असून पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघे तरूण कोणी दहशतवादी नसून ते दोघे शिर्डीत चोरीचे सोने विकायला आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत, दोघांना ताब्यात घेवून त्यांची दु‌पारी चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती … Read more

काय सांगता ! अहमदनगर मनपाची ‘ती’ ४७ हजार चौरस फूट जागा अवघ्या नाममात्र दरात देण्यास परवानगी,पहा सविस्तर…

mahanagarpalika

Ahmednagar News : शहरातील सावेडी येथे महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी व ग्रंथालय उभारण्यासाठी महापालिकेची ४७ हजार चौरस फूट जागा नाममात्र दरात भाडेकराराने उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. याबाबत नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी महापालिका आयुक्तांना तसे पत्र दिले आहे. माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात ‘झिका’सह स्वाइन फ्लूचेही रुग्ण ! सावधान..

zika

Ahmednagar News : सध्या विविध व्हायरल आजारांचे थैमान सुरु आहे. त्यातच आता झिका व्हायरसचे देखील रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिका सह स्वाईनफ्लूचे देखील रुग्ण आढळले आहेत. संगमनेर शहरात झिका विषाणूचे दोन रुग्ण व तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागांमध्ये आरोग्य विभागामार्फत … Read more

विद्याधर अण्णांनी शेतीत आणले वेगळेपण! पारंपारिक पिकांचा सोडला नाद आणि रेशीम शेतीतून मिळवत आहेत वर्षाला 10 लाख, वाचा नियोजन

success story

पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांच्या ऐवजी आता विविध प्रकारची फळपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन, औषधी वनस्पतींची लागवड तसेच रेशीम शेती व त्यासोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि पशुपालनासारख्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यात केलेली प्रगती यामुळे शेती क्षेत्राचे स्वरूप पालटले आहेत व त्यामुळे शेतकरी देखील आर्थिक समृद्धीच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसून येत … Read more

व्हायरल इंफेक्शनचा ताप लवकर उतरेना ! नगर शहरासह ग्रामीण भागात प्रचंड रुग्ण, ओपीडी फुल्ल

tap

Ahmednagar News : विषम वातावरण व साचलेल्या पाण्यात झालेल्या डासांमुळे सध्या नगर शहरसह ग्रामीण भागात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डॉक्टरांचे क्लिनिक फुल्ल झाले आहेत. तर या व्हायरल इंफेक्शनचा ताप लवकर उतरतं नसल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून शहरात घरोघरी सर्दी, खोकला आणि तापीचे रुग्ण आढळून येत … Read more

नगरमध्ये चाललंय काय? चारीत्र्याच्या संशयातून मुलासह बायकोवर सपासप वार, १९ वर्षाच्या मुलाचा ३० वर्षाच्या विवाहितेवर बळजबरी अत्याचार

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसतायेत. जिल्ह्यातील दोन घटना समोर आल्या असून एका घटनेत पतीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून पत्नीसह मुलावर केला वार केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका १९ वर्षाच्या युवकाने ३० वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून आरोपी पतीने पत्नीला … Read more

अहमदनगर पुणे महामार्गालगत राळेगण सिद्धी फाट्यावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी !

accident

अहमदनगर पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. १९) पहाटे राळेगणसिद्धी फाट्याजवळ चारचाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवारी (दि.१९) माझे भाऊ मयत गणेश गुणवंत पवार (रा. ता. सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) व वाहनचालक जखमी राहुल लिंबाजी राठोड … Read more

वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर, सुपा परिसरात रुग्णसंख्येत वाढ !

helth

कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अशी लक्षणे असणारे रुग्ण घरोघरी दिसू लागते आहेत. या वातावरणीय बदलामुळे सुपा येथे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने वातावरणीय बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून, त्यातून अनेकजण इन्फेक्शन ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी … Read more

नगर शहराजवळील ‘या’ गावात दोन गटांत तुफान हाणामाऱ्या

hanamari

Ahmednagar News : नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. दगड, धारदार हत्यार व लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऋषीकेश संतोष डोळस (वय २३ रा. अरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमीत महेश माळवे, आदेश सुधीर कांबळे, … Read more

मोबाईलच्या आहारी गेल्याने युवा पिढीचे भवितव्य धोक्यात, पालक चिंतेत !

mobile adiction

सध्या शहरी व ग्रामीण भागात एकीकडे मजूर मिळत नसतानाच दुसरीकडे अनेक तरुण कोणतेही काम न करता दिवसभर मोबाईलवर व्यस्त राहत असल्याचे चित्र दिसत असून, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवा वर्ग दिवसभर मोबाईलमध्ये गुंतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुशिक्षित तरुणांना आपले गाव, कुटुंब, नातेवाईक सोडून नाईलाजाने नोकरीसाठी पुणे, मुंबई व इतर महानगरात जावे लागते, … Read more

श्रीरामपूर येथे घरफोडी करणाऱ्या दोन आरोपी मुद्देमालासह अटक, एक फरार !

atak

श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण नगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई श्रीरामपूर पोलिसांनी केली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की २२ जून रोजी नगरपरिषदेच्या निवृत्त कर्मचारी लता गोविंद शिंदे (रा. लक्ष्मीनारायण नगर, गोंधवणी रोड, वार्ड नं. १, ता. श्रीरामपूर) … Read more

‘लाडकी बहीण’ साठी पैसे मागितले तर थेट फौजदारी दाखल होणार ! कलेक्टरांनी दिले ‘हे’ आदेश

salimath

Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना सहकार्य करण्याच्या तसेच अर्ज भरण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मागणी न करण्याच्या सूचना अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तथापि, अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास व त्यात तथ्य आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यंत्रणेला दिले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबाबत … Read more

जनतेच्या मनातले सरकार निवडून द्या तरच महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल : खा. शरद पवार

sharad pawar

लोकसभेला जनतेने राज्यातील ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिले. तुम्ही जिल्ह्यातील दोन्ही खासदार मताधिक्याने विजयी करून देशाला दाखवून दिले, की आता इथे थांबायचे नाही. ७० दिवसांनी विधानसभा निवडणूक आहे. मला जनेतेने ५६ वेळा निवडून दिले आहे. आता एकच मागायचे आहे, महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल. कष्टकरी, शेतकरी, माता बहिणीचा विचार करणारे सरकार आणायचे आहे. त्यामुळे जनतेच्या … Read more

अहमदनगरमध्ये हिट अँड रण ! एक जागीच ठार, एक गंभीर

heat and run

Ahmednagar News : नगर पुणे महामार्गावरील राळेगण सिद्धी फाट्याजवळ चार चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत डॉ. गोपाळ गुणवंत पवार (रा. जरडी ता. सोयागाव, जि. छत्रपती संभाजी नगर) यांनी सुपा पोलिस … Read more