दहा वर्षांच्या मुलीचा झोका खेळताना मृत्यू

श्रीरामपूर | राहाता तालुक्यातील नांदूर येथील आकांक्षा सोनल आवारे (वय १०) या बालिकेचा झोका खेळताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झोका खेळताना बेशुद्ध पडल्याने आकांक्षाला साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/02/08/ahmednagar-breaking-corona-virus-suspected-patient-admits-to-hospital/

व्यापाऱ्याचा खून करणारी टोळी गजाआड

संगमनेरातील व्यापाऱ्याचा खून करणारी व सराफाकडील तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लांबवणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संगमनेर येथे ५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने गुन्ह्यातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींना अटक केली. गणेश राजेंद्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार खतरनाक आरोपी जेल तोडून पसार

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून चार खुणाच्या गुन्ह्यातील जेल तोडून पसार झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले चार खुणी आरोपी अक्षय रामदास राऊत, … Read more

माजी आमदार विजय औटी यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी!

 पारनेर : मला जिल्हा परिषदेत समिती मिळाल्याचे सर्व श्रेय माजी आ.औटी यांना आहे. या समितीत काम करताना अगदी थोडा कालावधी आहे, परंतु पारनेर तालुक्याला बांधकाम समितीची संधी पहिल्यांदाच मिळाली म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितच जास्त आहे. त्या पूर्ण करताना मी कोठेही कमी पडणार नाही याची खात्री आहे. असे मत जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती … Read more

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव 9 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ३०० – ५००, वांगी ५०० – १५००, फ्लावर ८००- १०००, कोबी २०० – ४००, काकडी ४०० – ८००, गवार ७००० – ९०००, घोसाळे १५०० – २०००, दोडका २००० – ३०००, कारले १००० – २५००, भेंडी २५०० – ३०००, वाल १००० – १५००, घेवडा … Read more

नगर-औरंगाबाद रोडवरील अपघातात महिलेचा मृत्यू 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनचालकाने जोराची धडक दिल्याने तान्हुबाई रघुनाथ कोकाटे (रा.देसवंडी, ता.राहुरी) या जखमी होवून मृत्यूमुखी पावल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला. नवनाथ मच्छिंद्र म्हस्के (वय ३५, रा.धनगरवाडी) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात … Read more

स्वच्छतेचे वळण लावण्यासाठी तब्बल सोळा हजार रुपयांचा दंड वसूल !

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी होत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरेसा जनजागर करीत कृतिशील मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, काही नाठाळांना स्वच्छतेचे वळण लागण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करीत शहरातील तीनही बसस्थानकात रापमंच्या नियंत्रकांनी दंडात्मक कारवाया केल्या. तब्बल सोळा … Read more

श्रेय घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांची केवीलवाणी धडपड

कोपरगाव : विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या कार्यकाळात भरघोस निधी मंजूर करुन आणत झालेली आहेत. अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर झालेला होता. जो निवडणुक प्रक्रियेनंतर विकासकामांसाठी जाणार होता. मात्र ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांची केवीलवाणी धडपड सुरू असल्याचा घणाघाती आरोप कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे … Read more

पाणी उपसा करणाऱ्या त्या शेतकऱ्यांवर कारवाई

नेवासा : नेवासा तालुक्यात जायकवाडी धरणाच्या पाणी फुगवट्यातून प्रवरा संगम, म्हाळापुर परिसरातून विना परवाना पाणी उपसा करणाऱ्या ६ मोटार पंप व १७ स्टार्टरची जप्ती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जलाशय फुगवटा नेवासा शाखा, महसूल, महावितरण कंपनी व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत दि. ७ रोजी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई ३० सप्टेंबरपर्यंत … Read more

‘त्या’ बिबट्याचा धुमाकूळ सुरुच नागरिकांत पसरली दहशत

श्रीरामपूर :- तालुक्यातील गळनिंब व उक्कलगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. मारकड वस्तीशेजारील भागात ठिकठिकाणी सात नवीन पिंजरे लावण्यात आले असून वन विभागाची टीमही याठिकाणी ठाण मांडून आहे; मात्र बिबट्या या सर्वांना हुलकावणी देत आहे. त्यामुळे परिसरता दहशत पसरली आहे. बिबट्याने चिमुकलीला ठार केल्यानंतर गळनिंब परिसरातील लोक दहशतीखाली आहेत. लोकांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात सात पिंजरे … Read more

बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला  !

श्रीरामपूर :- तालुक्यात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी बेमोसमी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. काल श्रीरामपूर शहरासह लगतच्या टिळकनगर, दत्तनगर तसेच तालुक्यातील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला-गोवर्धन, निमगाव खैरी परिसरात सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ झिमझिम पाऊस झाला.  तसेच गोंडेगाव, खानापूर, माळवाडगाव, भामाठाण, मातुलठाण, पढेगाव, बेलापूर, मातापूर, भोकर, खोकर, … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी व नागरीकांची उडाली धांदल

संगमनेर :- तालुक्यातील आश्वीसह परिसराला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरीकांची चागलीच धांदल उडाली.  गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. शनिवारी सकाळी थंडी वाजत होती, तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आश्वीसह परिसराला … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहरात 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार !

नगर शहरातील कल्याण रोडवरील लोंढे मळा परिसरात समोसे विक्री करणार्‍या 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर नराधमाने चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या छाती व पोटाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.जखमी अल्पवयीन मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील केडगाव देवी मंदिर रोडवर शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावानेच केला दगडाने ठेचुन सख्या भावाचा खून…कारण वाचून बसेल तुम्हाला धक्का !

अहमदनगर जिल्ह्यात भावानेच सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत.    बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून सख्या भावानेच नातेवाईकांच्या मदतीने भावाचा दगडाने ठेचुन व चाकू कुऱ्हाड अशा हत्यारांनी भोसकुन खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे शुक्रवारी घडली. … Read more

डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू

संगमनेर :- कोल्हार-घोटी महामार्गावरील समनापूर चौफुलीवर खड्ड्यांमुळे ॲक्टिवावर बसलेली महिला खाली पडली. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. कवठे कमळेश्वर येथे राहणाऱ्या कमल लहू राजभोज (५०) नवीन ॲक्टिवावरून नातेवाईकासमवेत संगमनेर येथे बाजारासाठी जात होत्या. कोल्हार-घोटी महामार्गावर समनापूर चौफुली येथे खड्ड्यात दुचाकी आदळून त्या खाली पडल्या. पाठीमागून … Read more

सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीगोंदे फॅक्टरी येथील सावकारांच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने बुधवारी विषप्राशन केले. त्याचा शनिवारी मृत्यू झाला.  दत्ता गणपत सुतार (वय ३५) हा तरुण शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करत होता. काही सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते. अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते फेडता येत नव्हते. सावकार दारात येऊन त्याला मारहाणीची धमकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील तीस वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अजित बाबुराव दुधाळ (कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटलजवळ, श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, आपण घरी एकटी असताना आरोपी आला. लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला … Read more

राहुल ठाणगे लिखित ‘हृदयसंवाद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

अहमदनगर: कवी हा समाजाचा एक भाग आहे त्याने निरीक्षणातून समाजाच्या व्यथा जगासमोर मांडाव्यात असं मत दिग्दर्शक शशिकांत नजान यांनी व्यक्त केलं. नवोदित कवी राहुल ठाणगे लिखित हृदयसंवाद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळयात ते बोलत होते. प्रेमकविता लिहिणारा कवी काय आणि सामाजिक कविता लिहिणारा कवी काय तो आपल्या काव्यातून व्यक्त होत असतो . मुक्या भावनांना शब्दांतून वाट … Read more