साईबाबांच्या अपहरणाचा प्रयत्न होतोय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा … Read more

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून विटंबना केल्याप्रकरणी भाजपच्या १३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. प्रतिबंधात्मक आदेश भंगप्रकरणी पोलिसांनी सुधाकर गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगराजसिंग परदेशी, कल्पेश … Read more

तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत अशी परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत देशासाठी तीन युद्धांत सहभाग घेतलेल्या पतीचे अंत्यसंस्कार जैन समाजातील 72 वर्षीय छायाबाई गांधी यांनी करत वेगळे धाडस … Read more

अहमदनगर शहरात अनिल राठोड विरोधात सगळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप उमेदवाराला लाभदायी ठरणार आहे. दरम्यान भाजप पुन्हा आरती बुगे यांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते. महापालिकेच्या सहा नंबर … Read more

ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे 14 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असलेली कु. ऐश्वर्या रवींद्र वाघ हिने शैक्षणिक गुणवत्तेवर बरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य सिद्ध करून तायकांदो व बॉक्सिंग या … Read more

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी : आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुपा : महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून, सुसंस्कृत व रुढी परंपरेचे पालन करणारे राज़्य आहे, असे प्रतिापदन आ. नीलेश लंके यांनी केले. पारनेर तालुक्यातील रायतळे येथील सद्गुरू शांतानंद महाराज ट्रस्टतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळात आ. लंके बोलत होते. या वेळी आ. लंके, धर्मादाय उपायुक्त हिराताई शेळके यांच्या हस्ते … Read more

विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सुडके मळा परिसरात एका विद्यार्थ्यांस विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुभम सुनील जाधव या विद्याथ्र्यास सोनू सुडके, प्रवीण नेटके (दोघे रा. सुडके मळा) यांनी विनाकारण शिवीगाळ करत … Read more

तरुणी व तिच्या वडिलांना झाली दगडाने मारहाण कारण समजल्यास तुम्हाला धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संक्रांतीच्या वाणाचे मडके घरासमोर का फोडले असे विचारले असता राग येऊन तरुणीस व तिच्या वडिलांना दगडाने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू याबाबत सविस्तर … Read more

नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस झाली ही शिक्षा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा 16 Jan 2020 कोपरगाव : नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी १५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू ही घटना … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार … Read more

पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्याला पकडले आणि सोडूनही देण्यात आले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन दिवसांपूर्वी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेलेली प्रवाशी रिक्षा राहुरीत सापडली; मात्र रिक्षा ताब्यात घेत चोरासही पकडले. मात्र काहीवेळानंतर चोरासही सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे तक्रार नसतानाही पोलिसांनी तपास लावल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. रविवारी भर दुपारी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली एका पोलिसाची एक रिक्षाच अचानक गायब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी , घालावे लागले तब्बल ३२ टाके !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय १८) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या हनुवटीखालील भाग मांजामुळे कापला गेला आहे. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  जखमी शेख यांना ३२ टाके घालावे लागले. डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल … Read more

शॉर्टसर्किटने लागली पोल्ट्री फिड मिलला आग; सव्वा कोटीचे नुकसान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- तालुक्यातील चिंचोलीगुरव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने पोल्ट्री फिड मिलला आग लागून मशिनरी, साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला. या आगीत अंदाजे सव्वा कोटी रुपयाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. मंगळवारी (दि. १४) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चिंचोलीगुरव शिवारातील गट क्र. २४५ मध्ये तुकाराम सखाहरी सोनवणे यांच्या मालकीच्या शेतात … Read more

आमदार निलेश लंके म्हणतात या ठिकाणी राजकारण आणू नका !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / निघोज: पारनेर -नगर मतदारसंघातील प्रत्येक गावाने गावातील स्थानिक राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र आल्यास राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. मात्र, यासाठी गावातील गटातटाचे राज़कारण बाज़ूला ठेवून विकास कामांसाठी एकत्र यावे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे … Read more

सर्वांना विश्वासात घेतल्यास कामाला गती : आ. राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : सत्तेत राहून काम करणे सोपे असते. राज्यात व जिल्हा परिषदेत वेगळ्या विचारांचे सत्ताधारी पदाधिकारी आहेत. आता खरी कसोटी विकास निधी खेचून आणण्यासाठी लागणार आहे. सभापती, उपसभापती यांना सुरळीत कामकाजाकरिता ज्येष्ठ, अनुभवी, अशा भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ते सात सावकार पोलिसांच्या रडारवर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : नगर जिल्हा बँकेच्या येथील दोन शाखांमधील सोने तारण घोटाळा प्रकरणात गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेल्या दोघा सराफांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने दि. १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दोघांनी दिलेल्या जबाबामुळे आता सात खासगी सावकारांची चौकशी होणार आहे. पोलिसांनी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या शहर शाखेतील गोल्ड व्हॅल्युअर … Read more

कोपरगावला मिळणारे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे – माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : कोपरगावला मिळणारे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे व शेतीला ५ आवर्तने देण्यात यावीत. या आग्रही मागणीसह पालखेडचे पाणी कोपरगावच्या टेलपर्यंतच्या भागात मिळावे. तसेच कालवा समितीच्या बैठका शेतकऱ्यांसमवेत लाभक्षेत्रातच घेण्यात याव्यात, अशा मागण्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केल्या. जलसंपदा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि. १४) रोजी … Read more

शिवभोजन योजना : नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरजवंतांना सवलतीच्या दरात शिवभोजन योजना सुरु केली आहे. नगर जिल्ह्याने या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आघाडी घेतली असून, राज्यातील पहिली शिवभोजन केंद्रे नगरमध्येच सोमवारी मंजूर झाली आहेत. या शिवभोजन केंद्र चालकांचा प्रदीर्घ प्रशिक्षण वर्ग काल मंगळवार रोजी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्या सूचनेनुसार पुरवठा विभागात संपन्न … Read more