खा. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित केला हा प्रश्न  

अहमदनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ चे रखडलेले चौपदरीकरण व लष्करी आस्थापनेचे भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्रात रस्ते विकास मंत्रालय व रक्षा मंत्रालय यांच्या कडे केली. नगर-करमाळा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ च्या चौपदरीकरणाविषयी मुद्दा खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित करून … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा पेटणार

अहमदनगर :- जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. सध्या … Read more

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

संगमनेर : संगमनेर-कोपरगाव रस्त्यावरील रांजणगाव देशमुख (ता. कोपरगाव) शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन युवक ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. योगेश माधव जोंधळे (२९, कौठेकमळेश्वर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी रांजणगाव देशमुख-भागवतवाडी शिवारात ही घटना घडली. जोंधळे व शुभम संजय पवार (रांजणगाव देशमुख) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५ बीझेड १६९७) तळेगाव … Read more

उड्डाण पुलाच्या जागेसाठी भूसंपादन करण्यास संरक्षण मंत्र्याचा हिरवा कंदील!

अहमदनगर : शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला असून, येत्या दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्याना दिले असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण … Read more

युवक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता; आत्महत्या केल्याचे उघड

राहुरी: राहुरी तालुक्यातील वांबोरी व वरवंडी येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघा तरूणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी मध्यरात्री या घटना घडल्या. वांबोरी येथील प्रमोद गोरक्षनाथ भोसले (वय २३, राहणार ससे गांधले वस्ती) हा महाविद्यालयीन युवक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. बुधवारी सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा … Read more

बाथरूमला जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपीचे पलायन

श्रीरामपूर : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता, त्याने बाथरूमला जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. या घटनेने रूग्णालय परिससरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान रूग्णालयाच्या भिंतीवरून उडी मारून तो पसार झाला. मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्यादरम्यान ही घटना घडली. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास … Read more

अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

कोपरगाव : कोपरगाव येथील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले की, आपली मुलगी ब्युटी पार्लरच्या क्लासला गेली असता परत घरी आलीच नाही. शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. म्हणून कोणा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीला पळवून नेले … Read more

अल्पवयीन तरुणीला भरदिवसा पळविले

पारनेर :- तालुक्यातील हंगा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील, १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा आरोपी अजित राजेंद्र आल्हाट, रा. हंगा याने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी अजित आल्हाट याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ साळवे हे आरोपीचा व … Read more

एकाच दिवशी दोन जणांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. वांबोरी येथील घटना नाजुक प्रकरणातुन घडली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ … Read more

घरात घुसून महिलेचा विनयभंग

अकोले :- तालुक्यातील गंथला घाट परिसरात डोंगरगाव भागात एक २५ वर्षाची तरुणी घरात एकटी असताना आरोपी गोविंद गंगाधर मधे, रा. मुधवळे, ता. अकोले, कचरू संतु गारले, रा. घोडसरवाडी, ता. अकोले हे दोघे तरुणीच्या घरात घुसले व तिला धरुन पाणी मागत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. तू जर आम्हाला विरोध केला तर तुला … Read more

श्रीगोंद्यात कोंबड्यांवरून बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण येथील शेतकरी महिला लवंगाबाई विश्वनाथ घोगरे यांच्या शेताजवळ राहणाऱ्या आरोपीच्या कोंबड्यांनी घाण केली तसेच मेथीच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत लवंगाबाई घोगरे यांनी कोंबड्यावाल्या आरोपींना तुमच्या कोंबड्या आवरा त्यांनी नुकसान केले. याचा जाब विचारल्याने त्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन हात फॅक्चर करण्यात आला. लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा डेंग्यूने मृत्यू

अहमदनगर : कोठी येथील सुजाता मकासरे (वय ४५) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य आजाराने त्या काही दिवसापासून आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वारंवार मागणी करुन देखील कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या … Read more

आत्मा मालिक ध्यानपिठ हे अध्यात्मिक उर्जा केंद्र – आमदार डॉ. किरण लहामटे

कोपरगाव : आत्मा मालिक ध्यानपिठ हे अध्यात्मिक उर्जा केंद्र आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच याची प्रचिती येते, असे गौरवोद्गार अकोला विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी काढले. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळेतील मुलांच्या विभागीय क्रिडा स्पर्धा व विज्ञान, गणित, कलादालन प्रदर्शनाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प.पु. … Read more

प्रवरा नदी बनली गटार गंगा

संगमनेर : संगमनेर येथील प्रवरा नदी ही अक्षरश: गटार गंगा बनली आहे. नदी पात्रातील सांडपाणी हे आजूबाजुच्या शेतकऱ्यांच्या विहीरींना उतरत असल्याने त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर यावर नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाय योजना करणे गरजेचे आहे. या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणावर वास येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संगमनेर : संगमनेर येथील प्रवरा नदी … Read more

तीन तोळ्यांचे गंठण लांबवले

अहमदनगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले. नगर-कल्याण रस्त्यावरील माधवनगर बोर्डाजवळ ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कविता सुनील बाचकर (वय ३२, रा. माधवनगर, नगर-कल्याण रोड) या नगर-कल्याण रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून एकजण आला. त्याने बाचकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून … Read more

घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास

अहमदनगर : नवनागापूरातील गजानन कॉलनीत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २८ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल चंद्रकांत वसंत मोरे (वय-२८ रा. … Read more

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक एक ठार

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात मधुबन पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला पाठिमागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. भानुदान सोपान केदार (वय-३५, रा.गाढवलोळी, अकलापूर, ता.संगमनेर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घारगाव … Read more

यकृताला मार लागलेल्या तरुणीचा मृत्यू

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील देवकौठे शिवारात दुचाकीवरून पडल्याने यकृताला मार लागलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी सात वाजता मृत्यू झाला. ऋतुजा मच्छद्रिं आरोटे (वय १८, रा. देवकौठे) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या घटनेने देवकौठे गावावर शोककळा पसरली. देवकौठे ते चिंचोलीगुरव रस्त्यावरून रविवारी साडेचारच्या सुमारास ऋतुजा आरोटे ही भावाला दुचाकीवरून घरी घेऊन जात होती. दरम्यान, … Read more