भररस्त्यात सराफाची गाडी अडवून सोने-चांदीचा तीन लाखांचा ऐवज पंपास

तिसगाव –  दुकान बंद करून मोटरसायकलवरून घराकडे निघालेल्या सराफास मोटारसायकलवर आलेल्या पाच चोरट्यांनी अडवून ३ लाखांचा मुद्देमाल लुटला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिसगाव येथील दूध संघाजवळ घडली.  सोने-चांदीचे व्यापारी भरत चिंतामणी गुरुवारी आठवडे बाजार आटोपून सायंकाळी मोटरसायकलने पत्नीसोबत घराकडे निघाले होते. वृद्धेश्वर दूध संघाजवळ पाठीमागून दोन पल्सरवरून आलेल्या ५ जणांनी मोटारसायकल आडवी घालून … Read more

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश येमुल यांचे निधन

अहमदनगर : राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक गणेश येमुल यांचे गुरुवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सुरक्षा टीममध्येे ते प्रतिनियुतीवर होते. त्यांच्या आयटी सेलचे कामही येमुल पहात होते. सायबर तज्ञ म्हणून येमुल यांचा लौकिक होता. गुरुवारी रात्री पुण्यात त्यांचे निधन झाले. शुक्रवारी नगरमध्ये 10 वाजता अमरधाम … Read more

कोपर्डीतील बलात्कार खटला मुंबईत चालणार

अहमदनगर :जिल्ह्यातील कोपर्डी शाळकरी मुलीवर बलात्कार व हत्येचा खटला औरंगाबाद खंडपीठाकडून मुंबई उच्च न्यायालयात नुकताच वर्ग झाला असून आता हा खटला मुंबईत चालणार आहे. या बलात्कार व खूनप्रकरणात नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरच्या न्यायालयाने हा … Read more

बालिकाश्रम रोडवर राडा – जुन्या भांडणाच्या कारणावरून तलवारीने मारहाण !

अहमदनगर : जुन्या भांडणाच्या कारणाहून २० जणांच्या जमावाने कोयता, तलवार, लाकडी, दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडफेक केल्यची घटना मंगळवारी (दि.१२) रात्री ९ वा. बालिकाश्रम रोडवर घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, योगेश विठ्ठल जाधव (वय ३१, रा.जाधव मळा, बालिकाश्रम रोड) … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात चोरी

अहमदनगर : परीविक्षाधीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कुलूप कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील ६०० रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सकाळी ९ ते बुधवार (दि.१३) सायंकाळी ७ वाजेदरम्यान स्टेशनरोडवरील बकुल बंगला येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल या लग्नसमारंभाकरिता दिल्ली येथे जाण्याकरीता शिर्डी विमानतळाकडे शुक्रवार (दि.८) रोजी गेल्या. त्यावेळी त्यांनी … Read more

पारनेरमध्ये जेसीबी पळविला !

पारनेर :- तहसिलदार व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह परिसरातून वनकुटे येथील चार वाळू तस्करांनी पळवला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस अधीक्षक ईशू सिंंधू यांनी वाळूतस्करी बंद करण्याच्या सूचना प्रत्येक ठाण्याच्या अधिकाऱ्यास दिल्याने वाळूतस्करी थंडावली होती. विधानसभा निवडणुकीत पोलिस तसेच महसूल यंत्रणा व्यग्र झाल्याने अवैध … Read more

…तर बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री !

अहमदनगर :- राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी … Read more

बालिकाश्रम रोडवर दोन गटांमध्ये दगडफेक

अहमदनगर : शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलिस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली.    त्यात दोन्ही गटांतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध जीवे मारण्य़ाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगा करणे या कलमांनुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   विठ्ठल नंदू … Read more

बेकायदा गर्भपातप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा 

जामखेड – अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून स्रीगर्भ असल्याचे समजताच जामखेड येथील दुकानातून गोळ्या घेऊन गर्भपात केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणे व पाटील (पूर्ण नाव माहीत नाही), दोन महिलांसह लिंगनिदान करण्यासाठी मदत करणारा डॉक्टर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील आरोळेवस्ती येथील विवाहितेने अकलुजजवळील एका गावातील … Read more

बचत गटांसाठी 27 नोव्हेंबरला कार्यशाळा

अहमदनगर : बचत गट स्थापन करून महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किंवा असे गट स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या महिला भगिनी व शेतकरी बांधवांसाठी लोकरंग फाउंडेशन संस्थेने दि. 27 नोव्हेंबर, 2019 रोजी (बुधवार) एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.   थेट शेतमाल विक्री, ऑनलाईन मार्केटिंग व अन्नपदार्थ पॅकेजिंग उद्योगमधील … Read more

कागदावरच झाडे लावणाऱ्या अधिकाऱ्याचे नगरसेवकाने धरले पाय!

नगर – शहरात तब्बल १७ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर नगरसेवक गणेश भोसले यांनी यादी मागवली. ही झाडे कागदावरच लावल्याचे स्पष्ट झाले. उद्यान विभागाच्या या कारभारामुळे संतापलेले नगरसेवक गणेश भोसले यांनी या विभागाचे यु. जी. म्हसे यांचे पाय धरून दर्शन घेतले. या प्रकारामुळे मनपाचे प्रशासन किती निर्ढावले आहे, हे स्पष्ट झाले. मनपा स्थायी समितीची … Read more

श्रीरामपूरमध्ये दोघांना लाच घेताना पकडले !

श्रीरामपूर: पत्नीच्या नावाने काढलेला जीएसटी क्रमांक दंड न भरता बंद करण्याठी चार हजारांची लाच घेताना नगरच्या जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. येथील हरिकमल प्लाझा येथे ही कारवाई करण्यात आली.  तक्रारदार हे श्रीरामपूरमधील असून पत्नीच्या नावे व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी जीएसटी नंबर डिसेंबर २०१८ मध्ये काढला होता. काही कारणामुळे ते व्यवसाय … Read more

बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याच्या वादातून बेदम मारहाण

कोपरगाव : बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास पाच जणांनी पहार व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ६ ला संजयनगरमध्ये घडली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात राहुल सोमनाथ गायकवाड (२० वर्षे) यांनी फिर्याद दिली. बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब फिर्यादीने विचारला असता अमोल संपत रोठे, सोमनाथ संपत रोठे, … Read more

अण्णा हजारे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

पारनेर :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी अवमानकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने समर्थकांनी बुधवारी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे केली. २० नोव्हेंंबरपर्यंत कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील एका दैनिकाने रामजन्मभूमीच्या निकालानंतर हजारेंच्या तोंडी काही आक्षेपार्ह विधाने घातली. … Read more

अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय मराठा वधु-वर मेळावा

अहमदनगर – सध्या सोशल मिडीया व्हाटसअ‍ॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अ‍ॅप चे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअ‍ॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.17 नोव्हेंबर रोजी  अहमदनगर  येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेट भेट मेळावा आयोजित केला आहे शेतकर्यांची मुले व मुली साठी तसेच … Read more

वाळूतस्करीची ही नवी पद्धत एकूण तुम्हालाही धक्का बसेल !

संगमनेर : शहरापासून हाकेच्या अंतरावर व अकोले बायपासजवळ असलेल्या प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांनी अक्षरश: धिंगाणा घातला आहे. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, पाण्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांनी एक वेगळीच शक्कल लढविली आहे. ट्युबच्या सहाय्याने हे वाळू तस्कर आल्हादपणे वाळू उपसा करीत आहे. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा होत असताना देखील याकडे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे … Read more

अहमदनगर मध्ये बसवर अंदाधूंद दगडफेक

अहमदनगर :- नगर शहरातील तारकपूर बसस्टॅण्ड येथे बसमधील प्रवाशांना तसेच बसचालकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत एका ट्रकचालकासह ८ ते १० जणांनी अंदाधूंद दगडफेक करुन बसकंडक्टरसह पोलिसांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी  रात्री १० वाजता घडली.  याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाने ट्रकला कट मारल्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदारांसाठी झाला इतक्या कोटींचा खर्च

अहमदनगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य निवडणूक निवडण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगामार्फत नुकतीच संपन्न झाली. हे बारा आमदार निवडण्यासाठी जिल्ह्यापुरता विचार करता आयोगाचे तब्बल २१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. थोडक्यात एका आमदाराची निवड करण्याचे काम पावणेदोन कोटीला पडल्याचे निष्पन्न होत आहे. प्रजासत्ताक प्रणालीद्वारे देश आणि राज्याचा कारभार चालतो. संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे … Read more