अहमदनगर मध्ये ‘या’ ठिकाणी भेटतेय अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. या घोषणेची कधी अंमलबजावणी होते हे माहित नाही पण नगर शहरात संवेदनशील व्यापारी, व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी सुविधा केली आहे. नगर शहरातील प्रेमदान चौकात … Read more

कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीला लॉजवर नेवून बलात्कार

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुण विद्यार्थिनीला उंबरी बाळापूर येथे राहणारा आरोपी अमोल राजेंद्र अंजनकर याने दि. २४ रोजी आश्वी – उंबरी रस्त्यावर विश्वासात घेवून त्याच्या पल्सर दुचाकीवर बसवून अल्पवयीन विद्यार्थिनीला पुणे रस्त्याने नेले. चंदनापुरी घाटाच्या शिवारात एका लॉजवर नेवून तेथे लग्नाची अमिष दाखवून इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार … Read more

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसान भरपाई द्या : मा. आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव :- पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हे यांनी मुंबईत भेट घेतली. कोल्हे म्हणाल्या, बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील ७९ गावांना फटका बसला. ६० हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. विमा … Read more

कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या

पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले. यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात … Read more

शहर विकासासाठी सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे : आ. जगताप

अहमदनगर :- हे शहर माझे आणि आणि मी या शहराचा एक घटक आहे,असे मानले तरच आपण शहरचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शहराचा विकास साधायचा असेल तर सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नुकतीच महनगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी … Read more

माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता

राहुरी :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली राहुरी येथील विवाहित महिला व तिची दोन चिमुकली मुले राहुरी फॅक्टरी येथून गायब झाल्याने खळबळ उडाली. राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड चौकात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सोनम संजय झावरे (वय २७) असे या महिलेचे नाव असून ती आपली मुले यश (चार … Read more

पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच पेटवले सोयाबीन!

श्रीरामपूर: नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास शेतकऱ्याने आग लावली. ही घटना बेलापूर खूर्द येथे घडली. महाडीक यांच्या शेतातील सोयाबीनला मोड फुटल्याने ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, कोतवाल सुनील बाराहते हे पंचनामा करण्याकरता गेले होते. पंचनामा, फोटो, सातबारा, विमा पावती आदींची पूर्तता केल्यानंतर शासन मदत तरी किती देणार यामुळे वैतागलेल्या … Read more

कुटुंबीयांकडून होणार्या बायकोच्या छळाला कंटाळून धरणात उडी घेऊन पती पत्नीची आत्महत्या !

पाथर्डी :- तालुक्यातील शिरापूर येथील पती-पत्नीने पैठण येथील जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने शिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.  पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सचिन विठ्ठल लवांडे (वय 29) व पत्नी कीर्ती सचिन लवांडे (वय 24) हे दोघे शनिवारी भाऊबीजेनिमित गावी गेले होते, रविवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला … Read more

नगरकर नागरिकांना पोलिसांचे आवाहन, चावा घेणाऱ्या व्यक्ती बद्दल अफवा नकोत…

गेल्या तीन-चार दिवसांपासून तोफखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत वेगवेगळ्या भागात लोकांना चावणारा एक तरूण मनोरुग्ण हा फिरत असल्याबाबत अनेक फोन कॉल्स तोफखाना पोलीस स्टेशन येथे तसेच पोलीस कंट्रोल रूम येथे प्राप्त झालेले असुन त्या फोन कॉल्सचे आधारे तात्काळ पोलिसांनी मिळाले फोन कॉल्स ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांचे मदतीने खात्री केली असता असा कोणताही तरुण मनोरुग्ण मिळून आलेला … Read more

मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ.निलेश लंके

पारनेर :- सत्ता उपभोगण्यासाठी निवडून आलेलो नाही, तर सर्वसामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मला जनतेने सेवक म्हणून निवडून दिले आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. पारनेरचे नवनिर्वाचित आमदार लंके यांचा घोसपुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. योगेश … Read more

विवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

श्रीरामपूर :- दत्तनगर सूतगिरणी फाटा येथील गॅरेजजवळ कडू तात्याबा बागूल (वय ४०, दत्तनगर) या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला. रवी विखे यांना बागूल झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे यांना सांगितल्यावर त्यांनी बागूल यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायत सदस्य मोहन आव्हाड यांनी पोलिसांना कळवले. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी … Read more

आमदार शंकरराव गडाख मंत्री होणार ?

नेवासा :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी विजय मिळवला. आमदार गडाख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गडाख यांचा ४६५९ मतांच्या फरकाने पराभव झाला होता. मुरकुटे हे पंतप्रधान … Read more

६ वर्षाच्या चिमुकलीवर शेजारच्या मुलाकडून बलात्कार

राहुरी :- तालुक्यातील एका गावातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर १५ ते १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला. त्यानंतर शेजारीच राहणारा हा आरोपी मुलगा पळून गेला. याप्रकरणी आज पिडीत मुलीचे नातेवाईक लहान मुलीला घेवून पोलिसांकडून आले होते. राहुरी पोलिसांनीही घटनेची गांभिर्य लक्षात घेवून आरोपी … Read more

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघासह नगर शहर आणि श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार विजयी झाला नसून, त्याला जिल्हाप्रमुख जबाबदार आहेत. पारनेर, नगर शहर व श्रीरामपूर मतदारसंघातील तालुक्यात कार्यरत असलेल्या जिल्हाप्रमुखांची तत्काळ हकालपट्टी करावी, असा सूर पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत आळवण्यात आला. विधानसभा निवडणूकीत पारनेर – नगर मतदारसंघातून विजय … Read more

मी आमदार असलो तरी साहेब नको, दादाच म्हणा : आ.प्राजक्त तनपुरे

पाथर्डी : मी जरी आमदार झालो असलो तरी माझं वय तरुणांच्या बरोबरीच आहे,त्यामुळे कार्यकत्यांर्सह हितचिंतकांनी मला साहेब न म्हणता बंधुत्वाच्या नात्याने दादाच म्हणावे, असे आवाहन राहुरी- नगर- पाथर्डीचे नवनिर्वाचित आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पाथर्डी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला ज़ाईल, असेही आ. तनपुरे या वेळी … Read more

शेतीचे सरसकट पंचनामे करा : माजी आ.राहुल जगताप

श्रीगोंदा : सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी काल आमदार राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी द्राक्ष बागांसाह कांदा, बाजरी, मका तसेच कपाशींच्या पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी.आ.राहुल जगताप यांनी राज्य तसेच केंद्र सरकार मार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण … Read more

शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे हतबल

अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे. यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

ब्रेकिंग : शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

शिर्डी :- शिर्डीत पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे, अनैतिक कृत्यासाठी लफडेखोरांना खोल्या दिल्या जातात. एक – दोन तासासाठी २ ते ५ हजार घेतले जातात. शिर्डीत काही हॉटेल, लॉजमधून वेश्या व्यवसाय चालतो तसेच असे प्रकार नेहमी घडतात. मात्र जे उघड होतात ते समोर येतात.अशाच एका प्रकारात काल डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त … Read more