आ.नीलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आर.आर.पाटलांसारखा नवा चेहरा मिळाला !

पारनेर :- आमदार नीलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आर. आर. पाटलांसारखा नवा चेहरा मिळाला असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काढले. लंके यांनी हाती घेतलेल्या पाणीप्रश्नावर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमदार लंके यांनी रविवारी समर्थकांसह बारामती येथे जाऊन पवार यांचा आशीर्वाद घेतला. पवार यांनी लंके … Read more

पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह ७२ तासांनंतर सापडला

नेवासे :- ज्ञानेश्वर मंदिरामागील कापूरडोह येथे प्रवरानदीत गुरुवारी वाहून गेलेल्या सोमनाथ गांगुर्डे (३०, मारूतीनगर) या तरुणाचा मुतदेह ७५ तासांनी रविवारी दुपारी नदीपात्रात सापडला. मुसळधार पाऊस व मुळा धरणातून सोडलेले पाणी यामुळे आलेल्या पुरामुळे मुळा व प्रवरा नदीवरील तिन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले होते. १५ सप्टेंबरनंतर सर्व फळ्या टाकल्याने बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला होता. पुराच्या पाण्यात गुरुवारी … Read more

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार

श्रीरामपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून पक्षाची जिल्ह्यात ताकद सिद्ध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये नीलेश लंके, तर नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत शंकरराव गडाख विजयी झाले. राष्ट्रवादी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार

श्रीरामपूर :- शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील बाजूस चारचाकी वाहनात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केला व ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने २७ वर्षीय युवतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  शहरात खासगी नोकरी करणाऱ्या युवतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत तिने म्हटले आहे,  डिसेंबर २०१८ पासून ते … Read more

निकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची. केडगाव हत्याकांडात … Read more

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव !

नेवासे :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख विरोधक एकत्र येत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी केले होते. मात्र मुरकुटे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना वारेवर सोडत कोणतेही बळ न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडली. मुरकुटे यांच्या विजयात कार्यकर्ते नडले असल्याच्या चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. मुरकुटे यांनी तालुक्‍यात … Read more

पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ !

कर्जत :- दहा वर्षे कर्जत-जामखेडची आमदारकी, पाच वर्षे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, सहा खात्यांचा कारभार असे भाग्य लाभलेल्या मंत्री राम शिंदे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मंत्रिपदाचे वलय प्राप्त झाल्यानंतर कमी झालेला जनसंपर्क आणि ठरावीक लोकांनाच जवळ करण्याची प्रवृत्ती आड आली. पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची वेळ रामावर आली. जनतेच्या प्रश्नांकडे … Read more

हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका !

कर्जत :- जामखेड विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पराभव केला. गेल्या २५ वर्षपासूनचा भाजपचा बाल्लेकिल्ला ढासळा आहे त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा शोधू, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट शिंदे यांनी केली आहे. “हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले, पचवले आहेत. … Read more

जनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख

सोनई : विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीने दिलेला त्रास मी विसरलो आहे. आपली राजकीय ताकद विरोधकांची जिरविण्यासाठी अजिबात खर्ची घालणार नसून जनतेच्या हितासाठी राबविणार असल्याचा दृढ संकल्प नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. विजयी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी वरील भावना व्यक्त केली. विजयानंतर त्यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद … Read more

रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मिळाले नवे नेतृत्व !

अहमदनगर :-  राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.  मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात … Read more

अण्णांनी दिला आमदार लंकेना विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला

पारनेर :- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला. राज्यातील निकाल पाहता मतदार जागा झाल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले. विजय संपादन केल्यानंतर लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनी त्यांचे … Read more

दारूड्या नातवाकडून आजी-आजोबांना मारहाण

करंजी :- दारूड्या नातवाकडून होणाऱ्या मारहाणीला आजी व आजोबा वैतागले आहेत. मात्र, पोलिस या नातवावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. दारू पिऊन घरी येणाऱ्या नातवाकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने या जाचाला वैतागलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आजीबाई, रखमाबाई रंगनाथ अकोलकर यांनी थेट पाथर्डी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी नातू मालू रामदास अकोलकर … Read more

कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले…

कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत … Read more

विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्‍यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व … Read more

आमदार बबनराव पाचपुते भाजप सरकारमध्ये मंत्री होणार ?

अहमदनगर- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून सातव्यांदा आमदार झालेल्या बबनराव पाचपुते यांना तातडीने मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे आ. पाचपुते रात्रीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. संभाव्य मंत्रीमंडळात आ. पाचपुते यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बबनराव पाचपुते 4 हजार 523 मतांनी विजयी झाले. त्यांना 1 लाख … Read more

माजी आमदार औटींसह सुजित झावरेंवर दुसर्‍यांदा ओढवली नामुष्की !

पारनेर :- बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात विधानसभा उपाध्यक्ष ना.विजय औटी व सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अविश्वास ठराव दाखल केला होता. परंतु सभापती गायकवाड यांनी विरोधी संचालक ताब्यात घेवून खेळी केली. तसेच काही संचालक गैरहजर राहिल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे विधानसभा पाठोपाठ ना.विजय औटी व सुजित झावरे यांना हा … Read more

रोहित पवारांच्या विजयात बारामती ॲग्रोच्या टीमचा सिंहाचा वाटा !

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पवार घरातील तिसऱ्या पिढीचे रोहित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना थेट आव्हान देत या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष खेचले होते. युतीच्या मंत्रिमंडळातील बडे प्रस्थ व मुख्यमंर्त्यांच्या अत्यंत जवळचे मंत्री म्हणून ना. शिंदे ओळखले जात होते. मात्र, रोहित पवार यांनी गेल्या एक वर्षापासून अत्यंत शिस्तबद्ध व … Read more

पराजय झटकून किरण काळे लागले कामाला

कालच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. असे असले तरी काळे यांनी आजच महानगरपालिकेमध्ये दाखल होत सुरू केलेल्या कामामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीमध्ये काळे यांनी जाहीर केलेला वचननामा आणि जाहीरनामा हा चांगलाच गाजला होता. काळे हे वंचित बहुजन आघाडचे उमेदवार होते.  अल्पावधीत त्यांनी आपला प्रचार केला होता. परंतु … Read more