विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार : खा.विखे

श्रीगोंदा : जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टीक टीक बंद करू. विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार असून, श्रीगोंदे मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार हा तोडपाणी करणारा असल्याची घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. श्रीगोंद्यातून काल बबनराव पाचपुते यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांतर झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात खा.डॉ.विखे बालत होते. या मेळाव्यास पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक … Read more

अपघातात कारचालकाचा मृत्यू

राहुरी : मनमाड-नगर रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोरून पुढे जाताना ट्रक (क्र. एमएच ११ एम ५७५९) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अविचाराने हयगयीने रस्त्याच्या उजव्या लेनवरून अचानक कोणतीही इंडिकेटर न देता व पाठीमागील वाहन न पाहता अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला लेनवर घेऊन एकदम ब्रेक मारला. त्याच्यावेळी पाठीमागून येणाऱ्याने हुंदाई कार (क्र. एमएच १४ … Read more

प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण जीवाचं रान करणार – आमदार स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : कोपरगाव विधानसभेसाठी महायुतीच्या भाजप उमेदवार म्हणून आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव घोषित केल्यानंतर काल गुरुवारी (दि. ३) ११.३० वाजता आ. कोल्हे यांनी कलश लॉन्स ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या रॅलीतील भगव्या झंझावाताने विरोधकांचे अवसान गळाले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार स्नेहलता कोल्हे … Read more

गॅस टाकीचा स्फोट होवून घर जळाले

राहाता : तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथे गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गॅस टाकीचा स्पोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे शेजारील घरांचेदेखील नुकसान झाले. वाकडी येथील पूर्वेस असलेल्या चितळी रोड, शिरगिरे आखाडा भागात पाटबंधारे विभाग हद्दीत राहात असणाऱ्या हौशिराम तुकाराम पगारे यांच्या पत्नीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शिर्डी : शिर्डी शहरातील श्रीसाई निवारण आश्रम परिसरात हैदराबाद येथील एका अल्पवयीन मुलीला शिर्डी येथे तिच्या नातेवाईकाने आणले होते. यावेळी मुलीचा नातेवाईक असलेला पीजूस कांतीलाल चक्रवर्ती, रा. खरिदाबाद, हैदराबाद याने या मुलीवर अत्याचार केला. याबाबत जर कोणाला काही सांगितले तर खून करील, अशी धमकी त्याने दिली. कालपिीडित मुलीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पीजूस कांतीलाल चक्रवर्ती … Read more

मोटारसायकल ओढून नेल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

श्रीरामपूर : हप्ते भरूनही फायनान्स कंपनीच्या एजंटांनी मोटारसायकल ओढून नेल्याने निराश झालेल्या तरुणाने दोन-तीन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून तो वाचला असला, तरी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एजंटांवर व त्याची तक्रार न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे करण्यात आली आहे. अशोकनगर फाटा येथे राहात … Read more

‘मी आपली मनापासून माफी मागतो’ – आ.राहुल जगताप यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

श्रीगोंदा :- तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघात घेतल्यानंतर समर्थक, कार्यकर्त्यांची माफी मागीतली आहे. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकली आहे. भाजपाचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच, मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले. त्याआधी खुद्द आ.जगताप यांच्यासह राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडू भाजपाच्या उमेदवारीसाठी चाचपणी … Read more

आमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच !

कर्जत तालुक्यात शिवसेनेने आयोज़ित केलेल्या निर्धार मेळाव्यात आता शिवसैनिकांचही ठरलंय…पुन्हा राम शिंदे…चं ! अशा घोषणा देण्यात आल्या. येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने तसेच जनसामान्यांचे हित पाहून कर्जत-जामखेडमधील सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळत ना. शिंदे यांना साथ … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून युवा नेते रोहित पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील निवडणूक कार्यालयात दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी त्यांनी सहायक निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला. त्यांच्या अर्जावर हभप वामन खराडे गुरुजी व हभप प्रकाशमहाराज जंजिरे यांनी अनुमोदक व सुचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या वेळी जिल्हाध्यक्ष … Read more

माजी खासदार दिलीप गांधींचा अनिल राठोड यांना विरोध कायम

नगर शहरातून शिवसेना-भाजपा युतीची उमेदवारी माजी आमदार अनिल राठोड यांना पुन्हा मिळाली आहे. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. भाजप व सेना एकत्रित लढत असल्यामुळे आता सर्वांचीची मोट सेनेला बांधावी लागणार आहे. मागील काही काळात राठोड व गांधी यांच्यात सुरू असलेला … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकास अटक

नगर : पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक समद खान याला गुरुवारी पहाटे भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. खान मुकुंदनगर येथे घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. गेल्या महिन्यात मोहरम व गणेशोत्सवामुळे शहरातून तीनशेहून अधिक गुन्हेगारांना शहरबंदी करण्यात आली होती. त्यात खानचा समावेश होता. शहरबंदी असताना खान मुकुंदनगरमध्ये … Read more

फक्त जुमलेबाजी न करता काम करुन दाखवलंय – आ. संग्राम जगताप

नगर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी आयटी पार्कमधील युवक-युवती तसेच आई-वडिलांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. वडील तथा आमदार अरुण जगताप, आई पार्वतीबाई जगताप तसेच आयटीपार्कमध्ये नव्याने कार्यरत झालेले दर्शन गाडळकर, आकांक्षा भिंगारदिवे, फराह इनामदार, शुभम जोशी, अक्षय बांगर, साहिल सचदेव, सौरभ पवार, अजिंक्य आढाव, देवेंद्र वैद्य हे युवक-युवती … Read more

नगर शहराला उद्योग नगरी बनवण्याचा संकल्प करीत किरण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगर : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार किरण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेली तीस वर्ष विकासापासून वंचित असलेल्या नगर शहरामध्ये उद्योग नगरी उभा करून त्या माध्यमातून तरुणाईला रोजगाराची उपलब्धता करून देण्याचे आपले ध्येय असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक सोनवणे, सरचिटणीस सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे संघटक … Read more

ईडीने शरद पवारांवर केलेली कारवाई योग्य !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई योग्यच असून, त्यांचे पाप झाकण्याचे काम कोणी करू नये. पवार यांना पुढील दोन वर्षात जेलमध्ये घालण्याचे काम करणार असून पाटबंधारे खात्यातील त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असा घणाघात खा. सुजय विखे यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे महायुतीचे उमेदवार आ. शिवाजी कर्डिले … Read more

महागड्या घड्याळांचे शौकीन आहेत रोहित पवार,तब्बल २८ लाख रुपयांची घड्याळे !

जामखेड :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल नाईकवडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी प्रकाश महाराज जंजिरे, प्रतापराव खराडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पवार यांची आई सुनंदा, पत्नी कुंती, बहीण सई, चुलते रणजित व चुलती शुभांगी … Read more

श्रीपाद छिंदम या पक्षाकडून लढविणार निवडणूक !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही छिंदम यांनी स्पष्ट केले आहे. छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते. त्यानंतर … Read more

राष्ट्रवादीची टिक टिक बंद करू…

श्रीगोंदे :- या निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टिक टिक बंद करण्यात येईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी श्रीगोंदे येथील जाहीर सभेत सांगितले. भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संत शेख महंमद महाराज पटांगणात आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात विखे बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक विठ्ठल चाटे, भगवानराव … Read more

तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील पानोडी येथील महेश रामनाथ पवार (वय २७) या तरुणाचा बुधवारी (२ ऑक्टोबर) सकाळी येथील केटी वेअरमध्ये पाय घसरुन पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पानोडी शिवारातील बाभूळदरा येथे महेश पवार हा तरुण आपल्या आई- वडिलांसमवेत शेतात सोंगणीच्या कामासाठी गेला होता.  यावेळी एक हजार फूट अंतरावर … Read more