शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात,राष्ट्रवादीला धक्का !

अहमदनगर :- शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इछुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. अनिल राठोड हे शिवसेनेचे उमेदवार असून शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारास सुरवात

अहमदनगर :- आ. संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास मंगळवारी (दि. १) सकाळपासून सुरुवात केली आहे. शहरात प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन केले असून प्रभाग क्रमांक १२ मधील प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन व नारळ वाढवून केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार … Read more

अहमदनगर चे राजकारण : बाप शिवसेनेत मुलगा राष्ट्रवादीत !

अहमदनगर – थंडगार पडलेली शिवसेनेची बुलंद तोफ अंबादास पंधाडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अनिल राठोड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच पंधाडे त्यांच्या भेटीसाठी शिवालयात पोहोचले. पंधाडे यांचा मुलगा सारंग हे मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे खास कार्यकर्ते आहेत. नगरच्या राजकारणात ‘बाप इकडं आणि बेटा तिकडं’ असं चित्र यानिमित्ताने दिसून आलं. बाप … Read more

गॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर !

अहमदनगर :- घरगुती सिलेंडरच्या दरात आजपासून ( मंगळवार ) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर नगरमध्ये सिलेंडरच्या दरात ५९८ रुपयांवरून ६११ रुपये भाव … Read more

राधाकृष्ण विखेंना हरविण्यासाठी आ.बाळासाहेब थोरात आक्रमक

शिर्डी :- विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी थोरात गटाने व्यूहरचना आखली आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे शिर्डी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत युवा नेते सत्यजित तांबे यांनी दिल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी मंत्री विखे यांनी संगमनेर … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेचा मोठा धक्का

अहमदनगर :- संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवून मंत्री विखे यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपने मंगळवारी दुपारी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत संगमनेरचे नाव नाही. संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपकडून तगडा … Read more

सर्दी,ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथे आठवडाभरापासून सर्दी, ताप तसेच खोकल्याच्या रुग्णात वाढ झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत असल्याचे दैनंदिन चित्र दिसून येत आहे. पढेगाव परिसरात प्रत्येक घरात सर्दी, खोकला किंवा तापेचा रुग्ण आढळून येत आहे. त्यातच गावात एका मुलीस डेंग्यूसदृष्य आजाराची लागण झाल्याने नागरिक आणखीच भयभीत … Read more

बंधाऱ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

श्रीरामपूर : पाण्याने तुडुंब भरलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यात रविवारच्या सुटीचा अन् पोहणे शिकण्याचा आनंद घेत असतानाच दोन भावंडांपैकी महेश संतोष मुठे (वय १५) या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे घडली. याबाबतची सविस्तर हकिगत अशी, मुठेवाडगाव येथील बेलापूर एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, … Read more

विहिरीत मृत बिबट्या आढळला

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक शिवारातील विनायक एकनाथ जऱ्हाड यांच्या गट नं. ३२० मध्ये असलेल्या विहिरीत सोमवारी सकाळी मृत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. या मृत बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत समजलेली माहिती अशी, आश्वी बुद्रुक शिवारात विनायक जऱ्हाड यांची आश्वी-मांची रस्त्यावर गट नं. ३२० मध्ये शेतजमीन आहे. सोमवारी सकाळी काही महिला … Read more

घटस्फोटासाठी सासरच्या मंडळींना मारहाण

राहुरी :- मुलीस घटस्फोट देत नाही, या कारणावरून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामाऱ्या झाल्या. यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले आहेत. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक देशमुख (पूर्ण नाव माहीत नाही), सुनीता अशोक देशमुख, दीपक अशोक देशमुख (सर्व रा. … Read more

महिलेस खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

अहमदनगर : महिलेस तिच्या प्लॉटमध्ये येण्यास मज्जाव करून सात-आठ जणांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास प्लॉट खाली करणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील ढवणवस्ती येथे दि.३ जुलै ते २७ सप्टेंबर दरम्यान चार वेळा घडली.. याबाबतची माहिती अशी की, यमुनाबाई राधाकृष्ण सांगळे (वय … Read more

विखे व ससाणे गटाला धक्का.

श्रीरामपूर : काँग्रेसला जय महाराष्ट्र करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधत भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. आता पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोेध करणाऱ्या विखे, ससाणे गटाला धक्का बसला आहे. आता या दोन्ही गटाकडून अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. … Read more

मकरंद अनासपुरे ची स्टाईल मारताना अर्ज भरायला गेला आणि पाच हजारांचा दंड भरून आला

अहमदनगर : ‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’ या मराठी सिनेमातील मकरंद अनासपुरे यांनी साकारलेल्या ‘नारायणा’च्या भूमिकेचा नेवासा निवडणूक शाखेने सोमवारी अनुभव घेतला. देडगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून घेऊन आलेली चिल्लर त्यांच्या चांगलीच अंगाशी आली. चिल्लरसाठी आणलेली प्लास्टिकची पिशवी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरेत आली आणि त्यांना पाच हजार रुपये … Read more

भाजपची पहिली यादी जाहीर : नगर जिल्ह्यातून या आठ नेत्यांची उमेदवारी फायनल !

अहमदनगर :- भाजपाने विधानसभा निवडणूकीसाठी दिल्लीतून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 125 उमेदवारांच्या ह्या यादीत नगर जिल्ह्यातील आठ जागांचा समावेश आहे. अहमनगर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने वैभव पिचड, राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, प्रा.राम शिंदे शिवाजीराव कर्डीले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर : … Read more

आमदार मोनिका राजळे एकदा तुमचा सात-बारा तपासून बघा !

शेवगाव : भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, अशा कार्यकर्त्यांना आमदार झाल्यानंतर मोनिका राजळे यांनी खड्यासारखे वेचून बाहेर काढले व स्वत:च्या बगलबच्च्यांना महत्त्वाची लाभाची पदे दिली. भाजपचे निष्ठावान असे प्रमाणपत्र तुम्ही देण्याची गरज नाही. एकदा तुमचा सात-बारा व फेरफार तपासून बघा, म्हणजे कोण निष्ठावान हे जनताच ठरवेल, अशी टीका ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांनी … Read more

मुरकुटेंनी तालुक्याचे वाळवंट केले : गडाख

नेवासे: माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केले. आधी सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्याचे वाळवंट केल्याचा आरोप शंकररावांनी या वेळी केला. पक्षाच्या झेंड्याखाली काम करताना मर्यादा पडत असल्याने अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे सांगत मुरकुटे यांच्या … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या अडचणीत भर, वंचितकडून किरण काळे यांना उमेदवारी !

अहमदनगर :- आज वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नगर शहर विधानसभा मतदारसंघातून किरण काळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून काळे यांची उमेदवारी … Read more

सोशल मीडियावर प्रचारासाठी पूर्व परवानगी आवश्यक !

अहमदनगर :- राजकीय पक्ष आणि उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून, सोशल मीडियावर प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींना पूर्वप्रमाणन करून घ्यावे लागणार आहे. प्रसारण दिनांकाच्या ३ दिवस आधी ही जाहिरात प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नाही, असे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट … Read more