सुजय विखे म्हणतात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये !

अहमदनगर :- भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मु‌ळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो,’ असे खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. ते … Read more

ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला !

कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला. हे केवळ २०१४ ला केलेल्या … Read more

भाजपला शिवसेनालाही संपवायचेय !

पारनेर :- भाजप-सेना युती होणार नसल्याचा दावा करतानाच भाजपला शिवसेनालाही संपवायचे आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला. भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मिटकरी यांनी सरकारवर टीका केली. अध्यक्षस्थानी माजी आमदार दादा कळमकर होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, बाबासाहेब तरटे, अशोक रोहकले, सुदाम पवार, दादा शिंदे, … Read more

महापौरांच्या गाडीवर कचरा फेकणार !

अहमदनगर :- महापालिकेचा माळीवाडा येथील कचरा रॅम्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मनपाने ४५ दिवसांत हा रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्याप रॅम्पचे स्थलांतर झाले नसल्याने आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या वाहनांवर कचरा टाकला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिला. मनसेच्या वतीने १९ जुलैला माळीवाडा भागातील शाळेजवळ असलेला … Read more

बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे : मंत्री विखेंची रोहित पवारांवर टीका

जामखेड :- पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे आहे. हे काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. आम्हाला बाहेरचे उसने नको आहेत. आमचेचं आम्हाला पाहिजेत. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे. ज्यांनी दबावाचे राजकारण केले, राजकीय स्वार्थ पाहिला, जिल्ह्याचे पाणी अडवले, त्यांना लोकसभा निवडणुकीत चपराक मिळाली, अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार … Read more

छावणी बंद केल्याने शेतकऱ्यांत असंतोष

शेवगाव : तालुक्यातील नांदुर विहीरे येथे श्री शनैश्वर सामाजिक संस्था निंबेनांदुर संचलित जनावरांची चारा छावणी निंबेनांदुर येथे सुरु आहे.मात्र छावणी चालकाने प्रशासनाच्या आदेशानुसार जनावरांची छावणी बंद करण्याच्या मनस्थितीत असल्याने निंबेनांदुर येथील शेतकऱ्यांमधे असंतोष निर्माण झाला आहे. पशुपालकाने अशी मागणी केली आहे की, निंबे व नांदुर या दोन्ही महसूल सजामधे अत्यंत कमी प्रमाणात पाउस झालेला असल्याने … Read more

वाघ आल्याची चर्चा; नागरिकांमध्ये घबराट

कर्जत : तालुक्यातील कुंभेफळ, नेटकेवाडी, कोरेगाव, बजरंगवाडी येथे वाघ आल्याची जोरदार चर्चा होत असून वनविभागाने कुंभेफळ येथे पिंजरा लावल्याने परिसरात घबराट पसरली आहे. लोकाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असला तरी याबाबत महसूल, पोलीस अशा शासकीय यंत्रणाना मात्र कोणतीच माहिती नाही. याबाबत सोशल मीडियावर जोरदार पोस्ट फिरत आहेत. कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी येथे वाघ व त्याची दोन … Read more

गणपती विसर्जनाची मिरवणूक वादातून जातीवाचक शिविगाळ करत तलवारीने मारहाण

अहमदनगर : घरासमोरून गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना फटाके वाजवू नका घरातील लहान नात घाबरेल असे म्हणाल्याचा राग येवून जातीवाचक शिवीगाळ करत काठ्या, तलवार, लोखंडी पाईपने एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रंगनाथ बाबुराव बोरुडे (रा. आगडगाव, ता.नगर) यांच्या घरासमोरून … Read more

आदिवासी वाड्यावस्त्यांवरील सामाजिक प्रश्न अजूनही प्रलंबित!

अहमदनगर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली मात्र दुष्काळी पारनेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यावस्त्यांवरील सामाजिक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. शहरी भागाच्या तुलनेत तालुक्याच्या ग्रामीण भागातील अतिदुर्गम असणाऱ्या आदिवासी व दुर्लक्षित असणाऱ्या वाड्यावस्त्यांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, … Read more

गर्भवती महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती

राहुरी : तालुक्यातील कणगर येथील गर्भवती महिला गुहा ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच प्रसूत झाल्याची घटना काल (दि. १५) नऊ वाजता घडली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या समयसूचकतेमुळे गर्भवती माता व नवजात बालकाचे प्राण वाचले. असे असले तरी महिला सहाव्यांदा गर्भवती असताना कणगर ते लोणी असा प्रवास केला केला जात होता असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

पती, पत्नी व मुलास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी पती, पत्नी व मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळगाव कोंझिरा या ठिकाणी विमल बाळचंद आहेर ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. … Read more

विकासकामांचा धसका घेत विरोधकांनीच त्यांच्या पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष बदलणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असून जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. ते राष्ट्रवादीत आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जगताप यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा धसका घेत … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३६ कोटींचे अनुदान

नगर: खरीप २०१८ मध्ये दुष्काळामुळे नगर तालुक्यातील शेती पिकाच्या झालेल्या पिक नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३५ कोटी ८७ लाख ६२ हजार ६२५ इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू असून यादीतील काही लाभाथ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खाते क्रमांक दुरूस्त करून संबंधित तलाठी … Read more

विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार?

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री बंगल्यावर सेनेचे पदाधिकारी, संपर्क व विभागप्रमुख यांचे म्हणणे रविवारी जाणून घेतले. युतीची बोलणी चालू असतानाच शिवसेनेने २८८ मतदारसंघांतील परिस्थितीची रविवारी चाचपणी घेतली. जागावाटप तोडग्याच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेतून शिवसेनेने आपल्या नेत्यांना या बैठकीत सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. मातोश्री निवासस्थानी … Read more

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न … Read more

थेट नगर-पुणे रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न – खा.डॉ सुजय विखे

‘दौंड रेल्वे स्थानकाला बायपास करणारी नगर-पुणे रेल्वे लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय औद्योगिक विकासासाठी दळणवळण सुविधांचा विस्तार व आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्याला पुणे व औरंगाबाद या दोन्ही महानगरांशी रेल्वेद्वारे जोडले जाणे आवश्यक असून त्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहोत’, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू … Read more

केवळ नारळ फोडून विकास होत नाही – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- विकास काय असतो हे आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दाखवतो. केवळ नारळ फोडून विकास होत नाही, अशी खरमरीत टीका केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व पाथर्डी बाजार समितीचे संचालक  प्रताप ढाकणे यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ता डांबरीकरण, बैल बाजाराचे सुशोभीकरण व तिसगाव उपबाजार समिती येथील … Read more

‘अगस्ती’ च्या सभासदांची दिवाळी गोड – मधुकर पिचड

अकोले : अगस्तीच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. तथापि, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये, म्हणून कारखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ऊस व बाहेरून तितकाच ऊस उपलब्ध करून पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अगस्तीने केला आहे. साखरेबरोबरच आर्थिक मदत करून सर्वांची दिवाळी गोड केली जाईल, असे आश्वासन अगस्तीचे अध्यक्ष … Read more