नगर शहाराच्या विकासासाठी विधानसभेची जागा भाजपाकडे घ्या

अहमदनगर :- गेल्या २५ ते ३० वर्षांपासून नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. पाच वेळा शिवसेनेचे आमदार शहरात निवडून गेले, परंतु शहराचा कुठलाही विकास होऊ शकलेला नाही. नगर शहराच्या पाठीमागून नाशिक, औरंगाबाद, पुणे या शहरांचा झपाट्याने विकास होऊन ती शहरे महानगरे म्हणून पुढे आली आहेत, नगर शहर आजही मागासलेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी शहर विधानसभेची … Read more

…त्यांना शालिनी विखे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही

संगमनेर ;-लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबा ओहोळ यांच्यासारख्या निष्क्रिय अध्यक्षाने पक्षनिष्ठेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नये. ज्यांचा इतिहासच बंडखोरीचा आहे, त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. उलट ज्यांच्या कारकिर्दीत तालुक्यात पक्षाची वाताहत झाली त्यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी … Read more

जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

संगमनेर :- अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला घारगाव पोलिसांनी अटक केली. फारूक नानाभाई शेख (३२, रा. शेरी चिखलठाण, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च २०१९ मध्ये धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेच्या वेळी हा प्रकार घडला होता. आरोपीने साकूरजवळील मांडवे येथे जात मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत … Read more

स्वप्न भंगल्यामुळे बोराटेंचे मानसिक संतुलन बिघडले

अहमदनगर :- तुम्ही पाहिलेले महापौरपदाचे मुंगेरीलालचे स्वप्न भंगल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून तुम्ही महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर आरोप करत आहात, अशी टीका नगरसेवक रवींद्र बारस्कर, सतीश शिंदे यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात बारस्कर, शिंदे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका असताना जकात चोर नगरसेवक म्हणून प्रसिध्द होता. तुम्ही माया कशी … Read more

श्रीगोंदा पंचायत समिती सभापतिपदी अजय फटांगरे

श्रीगोंदा :- पंचायत समिती सभापतिपदाचा अतिरिक्त कार्यभार नगर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे विद्यमान सभापती अजय फटांगरे यांच्याकडे देण्यात आला आहे. पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. नव्या सभापतीची निवड होईपर्यंत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार फटांगरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींमधून चिठ्ठ्या … Read more

कोठडीचे गज कापून दोन आरोपी पळाले; पण …

संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले. पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य दारातून पलायन केले. आरोपींचा पाठलाग करत तासाभरात दोन्ही आरोपींना पकडत दिवस उजाडण्याआधीच पोलिसांनी आपली लाज राखली. यापूर्वीदेखील याच कोठडीतून पिंट्या काळे नावाच्या आरोपीने पलायन केले होते. शुक्रवारी पहाटे पावणेचार … Read more

चोरीची फिर्याद देणाराच निघाला खरा आरोपी !

पारनेर :- सुपे रस्त्यावरील कुरियर कंपनीत झालेल्या चोरीची फिर्याद देणाराच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी फिर्यादी किरण कदमसह त्याचा साथीदार प्रशांत शिंदे याला अटक करून त्यांच्याकडून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड, तसेच ८० हजारांच्या वस्तू हस्तगत केल्या. ९ जूनच्या रात्री इॅ कॉम एक्स्प्रेस या गाळयाचे शटर उचकटून लॉकरमधील १ लाख १४ हजारांची रोकड, … Read more

रेपसाठी त्याने वापरलेली मित्राची कार पोलिसांनी घेतली ताब्यात

अहमदनगर :- दिल्लीगेटच्या पार्किंगमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर रेप करण्यासाठी आरोपी शुभम सुडकेने मित्राची कार वापरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.  शहरातील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.  प्रेमसंबंध निर्माण करून गेल्या अडीच वर्षांपासून १७ वर्षांच्या मुलीला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. … Read more

नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

राहुरी ;- पहाटे नैसर्गिकविधीसाठी जात असलेल्या महिलेस एका इसमाने पाठीमागे येवून हात पकडून मी तुझ्या सोबत येवू असे म्हणत लजा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पोलिसात विनयभंग केल्याचा गुन्हा ३६ वर्षिय महिलेने दाखल करताच पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ भागात ३६ वर्षिय विवाहित महिला ही दि. १९ जून रोजी पहाटच्या दरम्यान नैसर्गिक … Read more

पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी नगरकरांचा अभूतपूर्व उत्साह जिल्ह्यातही विविध ठिकाणी योगदिन उत्साहाने साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नगरकरांनी आणि संपूर्ण जिल्हावासीयांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा संकुलातील  मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील योगदिनाचे कार्यक्रम आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 14 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे … Read more

शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न

राहुरी : – बारागाव नांदूर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा दोघांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. राहुरी पोलिसात राजमोहम्मद उमर शेख वय वर्ष ५० धंदा नोकरी उर्दू शाळा शिक्षक यांच्या फिर्यादीवरुन आज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरूवारी रोजी मुस्कान, वय (१३) ही इयत्ता ८ वी मध्ये … Read more

विवाहितेस विष पाजून खुनाचा प्रयत्न

राहुरी :- पैशांच्या कारणातून विवाहित तरुणीस विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील भुजाड़ी इस्टेट मल्हारवारी रोड मुथा कुटुंबीय वास्तव्यास आहे, विवाहित तरुणी सौ. संजना श्रीपाल मुथा, वय २९ हिला तिचा नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याला बँकेची हप्ते भरण्याचे पैसे मागितले असता तो म्हणाला की, पैसे … Read more

रेशन दुकान चालक महिलेची छेडछाड

नगर :- शहरातील एका पतसंस्थेच्या रेशन दुकानात एक ४५ वर्षाची महिला काम करत असताना तेथे येवून आरोपी राहुल रतन त्रिभुवन, रा. दिल्ली गेट, सातभाई गल्ली, नगर याने दुकानच्या काऊंटरवर रेशन कार्ड आपटून जोरजोराने आरडाओरड करत माझ्या रेशनकार्डवर शिक्का दाखवा. तुम्ही माझे जाणून बुजून रॉकेल बंद केले, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. दुकान चालक महिलेशी हुज्जत … Read more

हुंड्याचे पैसे न पोहचल्याने पिस्तुल लावून मारहाण

नगर :- तालुक्यातील घोडकवाडी, घोसपुरी भागात राहणारा तरुण शिवदास रामदास भोलसे, वय २५ याला व त्याचे वडील रामदास भोसले या दोघांना हुंड्याचे पैसे देणे बाकी असल्याने ते पैसे शिवदास भोसले याचा मेव्हणा आरोपी क्र. १ याच्याकडे दिल्याने ते पैसे सासरे यांच्याकडे पोहोच न झाल्याने वाद झाला. दोघा आरोपींनी शिवदास भोसले व त्याचे वडील रामदास भोसले … Read more

विखे परिवार भाजपवासी झाल्याने जि.प अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा

संगमनेर :- विखे परिवार भाजपवासी झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. विखे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या असल्याने जिल्हा परिषद सदस्यत्व आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. नगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाने अध्यक्षपदाची माळ भाजपचे नवे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची … Read more

अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेतून भरदिवसा अडीच लाख पळवले

नेवासा :- शहरातील स्टेट बँकेतून भर दिवसा अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी दि.20 दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ग्राहकाने जमा केलेली रक्कम कॅशीअरने भारतीय स्टेट बँक शाखेच्या काउंटरवरच ठेवल्याने दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत या रकमेवर डल्ला मारला. अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेच्या नेवासे शाखेतून अडीच लाख रुपये पळवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये … Read more

अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक

राहुरी :- अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी रात्री आडगाव (नाशिक) येथे ताब्यात घेतले. महाविद्यालयात जात असताना १७ रोजी या युवतीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय जाधव हे तपास करत होते. निरीक्षक गाडे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे फिरवण्यात आली. सहायक फौजदार जाधव, काॅन्स्टेबल महेंद्र गुंजाळ … Read more

पैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

अहमदनगर :- व्याजासह मुद्दल देऊनही पैशासाठी तगादा सुरू असल्याने वैतागलेल्या कर्जदाराने दुकानदाराच्या डोक्यात वार करत खून केला. गुरुवारी रात्री दहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील पाईपलाईन रोडकडे जाणाऱ्या चौकात ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश बाळासाहेब इथापे हे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आरोपी कृष्णा रघुनाथ गायकवाड हा स्वतःहून तोफखानाा पोलिस ठाण्यात हजर … Read more