राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडून लढू इच्छिणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. चांगले उमेदवार शोधण्यासह ज्यांना स्वतःहून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, अशांचे अर्ज संकलनही सुरू केले आहे. येत्या १ जुलैपर्यंत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात वा जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्षांकडे उमेदवारी मागणीचे अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे पक्षाचे … Read more

मंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- नगरचे पालकमंत्री तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेले प्रा.राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन गैरव्यवहार केला आहे. यामुळे त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे उपचिटणीस यांना देण्यात आले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे … Read more

अहमदनगर सीए शाखेतर्फे योग दिन साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन अहमदनगर सीए शाखा, पतंजली योग समिती व नक्षत्र प्राणायाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र लौन्स, बुरूडगाव रोड येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी ६ ते ८ ह्या वेळेत चाललेल्या योग शिबिरात प्रथम पतंजली योग समितीचे श्री अविनाश ठोकळ यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी पूरक हालचाली, सूर्य नमस्कार व प्राणायामाचे … Read more

मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणार्या नराधमास अटक

कोपरगाव : शहरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : शहरातील ४२ वर्षीय मनोरूग्ण पिडीत महिलेवर मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी विनोद बन्सीलाल लोंगाणी याने … Read more

२५ वर्षांत झाली नाही इतकी कामे राहुरीत केली- आ. कर्डिले

राहुरी :- तालुक्यात २५ वर्षांत झाली नाही इतकी कामे आपल्या काळात झाली असून आपण नेहमीच जनतेत असल्याने यावेळी राहुरीतून एक लाख मते विकास कामांच्या माध्यमातून मिळविणार असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील गुहा, वडनेर व तांदुळनेर येथे आ. कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी आ. कर्डिले बोलत … Read more

सामान्य जनतेला कांद्याच्या वांध्याचा फटका बसण्याची शक्यता

कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, येसगाव या परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे टाकळी फाटा येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला व मोठ्या प्रमाणात वाहून गेला. यामुळे कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी कांदा विक्री बंद ठेवली असल्यामुळे मंगळवार ते शनिवार असे चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

महिला पदाधिकारीने नगरसेविकेच्या पतीला फटकारले…

श्रीरामपूर : व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या बातमीच्या कारणावरून काल (दि. २४) राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांनी एका नगरसेविकेच्या पतीला चांगलेच फटकारले. पालिकेच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार सुरू असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी मध्यस्थीचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. काल (दि. २४) प्रभाग नऊच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी … Read more

चांदी घ्यायला गेले आणि मार खावून आले…

श्रीगोंदे :- दोन लाखांत चांदीची २५ हजार नाणी देण्याचे आमिष दाखवून बेदम मारहाण करत लुटण्याचा प्रकार निमगाव खलू गावच्या शिवारात सोमवारी घडला. तब्बल ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लुबाडल्याची फिर्याद दिनेश सीताराम भंवर (मंचर, जि. पुणे) यांनी दिली आहे. मंचरमधील मैत्रीपार्क (मुळेवाडी रोड) येथे राहणाऱ्या भंवर यांना २२ जून रोजी त्यांचा मित्र निकेश कुनकुले (हडपसर) … Read more

आमदार थोरातांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

संगमनेर :- नगरपालिकेच्या एका जागेसाठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात कांँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. उमेदवाराला अपेक्षित मते मिळू न शकल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. काँग्रेसच्या राजेंद्र कारभारी वाकचाैरे यांनी शिवसेनेच्या कविता तेजी यांचा पराभव केला. संगमनेर नगरपरिषदेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. याशिवाय नगराध्यक्षपदही काँग्रेसच्या ताब्यात असून पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागेत एका … Read more

नेवाश्यात पुन्हा गडाख किंग, आमदार मुरकुटेंच्या अडचणी वाढल्या

नेवासे : पंचायत समितीच्या सोनई गणाची पोटनिवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कारभारी डफळ यांनी भाजपच्या प्रकाश शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव केला. भाजपचा धुव्वा उडण्यास आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे खापर फोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणींत वाढ होणार आहे.  नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी मराठा, … Read more

पालकमंत्री प्रा.राम शिंदेना धक्का

कर्जत :- तालुक्यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मनीषा जाधव यांनी भाजपच्या शशिकला शेळके यांचा ५३९ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाके फोडून आनंद साजरा केला. जाधव यांची कर्जत व कोरेगाव येथे मिरवणूक काढण्यात आली. या निकालाने पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला.  पोटनिवडणुकीचा निकाल … Read more

आमदार कर्डिले गटाचा दारूण पराभव !

अहमदनगर :- नगर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवख्या व युवा नेतृत्वाने प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे. पारगाव भातोडी, पारेवाडी, मजले चिचोंडी या गावांमध्ये विद्यमान सरपंचांच्या हातातून सत्ता निसटली आहे. पारगाव ग्रामपंचायतीत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाचा दारूण पराभव करत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने दिमाखदार विजय मिळविला. तालुक्यातील पारगाव, पारेवाडी, मजले चिंचोली, भोयरे … Read more

खा.सुजय विखेंसह आ.संग्राम जगताप यांनी केला ‘इतका’ खर्च…

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे. यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे. शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार … Read more

अभिनेत्री दीपाली सय्यद श्रीगोंद्यातून निवडणूक लढविणार !

श्रीगोंदा :- आम आदमी पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा एकदा निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. यावेळी त्या विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असून श्रीगोंद्यातून विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तयारी सुरू केली आहे. शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या सय्यद यांनी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंबंधीचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष … Read more

बोलोरो आडवी लावून ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर / प्रतिनिधी : नगर – पुणे रोडवरील केडगाव बायपास चौफुला कांदा मार्केट जवळ रविवारी रात्री ११ च्या सुमारास ट्रकला (एम एच 14 एफ 57 ३७ ) बोलोरो( एम एच 17 व्ही ९२४६ ) आडवी लावून ट्रक चालकाला दमदाटी करून स्टील रॉडचा धाक दाखवून अंधारात घेऊन जाऊन त्याच्याकडील ७ हजार रुपये रोख रक्कम व एक … Read more

सासरवाडीला गेलेल्या जावयास मारहाण !

अकोले :- शाळा सुरू झाल्याने अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथे भावजाई व पुतण्यांना आणण्यासाठी गेलेल्या संजय भानुदास हासे (चिखली, ता. संगमनेर) यास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत संजय भानुदास हासे यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. १८ जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास मेहेंदुरी येथे संजय भानुदास हासे हे त्यांची भावजईचे माहेरी मेहेंदुरी येथून भावजाई … Read more

आ.मुरकुटे यांना विधानसभेचे तिकीट देऊ नये.नाही तर पराजय ठरलेला आहे…

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेहमी सेटलमेंटचे राजकारण केले असून निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजकीय बळी त्यांनी दिला. तालुक्याचे पाण्याअभावी वाळवंट त्यांनी जसे केले. तसेच निष्ठावान कार्यकर्ते यांचेही त्यांनी वाळवंट केले. फक्त ठरावीक पाहुण्यांसाठी आमदारकी पणाला लावली असून त्यांना यावेळी विधानसभेचे तिकीट मिळू नये यासाठी तालुक्यातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यामागे खंबीरपणे उभा राहणार आहे, असा घरचा आहेर … Read more

जे ३५ वर्षांत झाले नाही, ते काम ५ वर्षांत मी करून दाखवले – आ.राहुल जगताप

श्रीगोंदे – नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात २२.८० कोटी व जिल्हा वार्षिक योजनेत २.५ कोटी असा एकूण २५.३० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली. अनेक वर्षांपासून कामे झाली नसल्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून प्राधान्याने हे रस्ते मंजूर करून घेतले. जिल्हा वार्षिक योजनेतील काही कामांना … Read more