भर दिवसा विद्यार्थ्याला फूस लावून पळवून नेले !

संगमनेर – संगमनेर परिसरात घुलेवाडी भागात राहणारा सूरज नामदेव देवकर, वय १७ वर्ष हा विद्यार्थी मी फोटो काढून व अॅडमिशन घेवून येतो, असे म्हणून घरातून दुपारी २ च्या सुमारास गेला. त्याला कुणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेउन फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलाचे नातेवाईक अलका रामु देवकर, रा. घुलेवाडी यांनी संगमनेर शहर पोलिसांत वरीलप्रमाणे … Read more

शहर सहकारी बँकेचे अकाऊन्ट हँक करून ४५ लाखांची रक्कम परस्पर ट्रान्सपर !

अहमदनगर :- शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील अकाउंट वरून सुमारे 45 लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवर वर्ग करण्यात आले. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर शहर बँकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत शाखेमध्ये चालू खाते आहे. रविवारी बँकाना सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी शहर बँकेच्या … Read more

मी प्रत्यक्ष कामांचे उद्घाटन करतो, इतरांसारखी पोकळ आश्वासन देत नाही – आमदार राहुल जगताप

नगर :- पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, दुष्काळी परिस्थिती या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना मी केली. प्रत्यक्ष कामांचे मी उद्घाटन करतो, इतरांसारखी पोकळ आश्वासन देत नाही, असा टोला आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील साकत … Read more

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप! नव्वदी गाठलेल्या वृद्ध जोडप्याचा इहलोकीचा प्रवास

अहमदनगर : पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली! नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली! पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच पत्नीने आपला देह ठेवला! इंद्रायणी/त्रिंबक दगडू पाचारणे असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.  नेप्ती, ता. नगर येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक दगडू पाचारणे (वय … Read more

लग्नाचे आमिष दाखवत बदनामी,जिवे ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

संगमनेर :- तालुक्यातील निझर्णेश्वर भागात हंगेवाडी परिसरात राहणा-या एका तरुणीला मी तुझ्याशी लग्न करील, असे म्हणून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध रहात्या घरात शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. वेळोवेळी जर तू कोणाला काही सांगितले तर तुझी बदनामी करील, तुला जिवे ठार मारील, असे म्हणून बळजबरीने बलात्कार केला. बलात्कार पिडीत तरुण महिलेने या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत काल … Read more

माजी मंत्री अनिल राठोड यांना मंत्रिपद मिळणार ?

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते, नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांचा राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे वृत्त नगर स्वंतत्र या दैनिकाने दिले आहे. या वृत्तात सांगितले आहे कि, राठोड हे सलग चार वेळा नगर शहरातून निवडून आले आहेत. मातोश्री वरून राठोड यांच्या नावाचाही विचार सुरू झाला असून, त्यांच्या समावेशास कोणतीही अडचण … Read more

धक्कादायक : अहमदनगरमध्ये टीकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत असताना तरुणाची हत्या !

शिर्डी- शिर्डी येथे हॉटेल पवनधाममध्ये काही मुले टीकटॉकवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ करत असताना गावठी कट्यातून गोळी झाडून प्रतिक उर्फ भैय्या संतोष वाडेकर यांच्या छातीत गोळी घुसून तो जागीच ठार झाला. डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि अनिल कटके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिर्डीत नाकाबंदी करुन आरोपी सनी पोपट पवार, वय २०, रा. धूलदेव, ता. फलटण, जि. … Read more

शिर्डीत हॉटेलमध्ये १९ वर्षाच्या युवकाची गोळी झाडून हत्या

शिर्डी :- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हाॅटेल पवनधाममध्ये अज्ञात चार व्यक्तींनी १९ वर्षाच्या युवकाच्या गोळीबार करून हत्या केली. यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक संतोष वाडेकर (१९, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यातील चार संशयितांपैकी मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी … Read more

श्रीगोंद्याच्या आजी माजी आमदारांना जनतेचे देणे – घेणे नाही !

श्रीगोंदा :- तालुक्याच्या आमदारांना तुमचे काहीएक देणे नाही. अजून एक कारखाना कसा होईल, यासाठी ते काम करत आहेत. माजी आमदार तर उसाचे पैसेच देत नव्हते. मला लक्ष घालावे लागले. मग पैसे मिळाले. राधाकृष्ण विखेंना काँग्रेसने काय कमी केले, म्हणून ते मुलाला खासदार करण्यासाठी भाजपत गेले? ही मंडळी सत्ता आणि स्वार्थासाठीच काम करतात, अशी टीका आ.बच्चू … Read more

…आणि म्हणून सुजय विखेंनी ‘तो’ तालुका घेतला दत्तक !

अहमदनगर :- हक्काचा आमदार नसल्याने आजवर नगर तालुक्यातील अनेक कामे रखडली. पण मी ती उणीव आता जाणवू देणार नाही. लोक गाव दत्तक घेतात. पण मी आता नगर तालुकाच दत्तक घेत आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांना नगर तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत केले.  नगर तालुका टंचाई आढावा बैठक नक्षत्र लॉन या ठिकाणी झाली. यावेळी … Read more

नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला

राहुरी :- तालुक्यातील उंबरे येथील नवविवाहितेचा मृतदेह वांबोरी शिवारातील गडाखवस्ती येथील विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. योगिता ऋषिकेश ढोकणे असे तिचे नाव आहे. चारित्र्याचा संशय घेऊन पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची तक्रार विवाहितेचे वडील रघुनाथ केशव दरेकर (ताहराबाद, ता. राहुरी) यांनी वांबोरी दूरक्षेत्रात दिली आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास … Read more

केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु

नगर :- राजकारण स्वत:साठी नव्हे तर जनतेच्या विकास व कल्याणासाठी केले जाते. केडगाव उपनगर विकासापासून वंचित होते. येथील जनतेला सुख-सुविधा निर्माण करुन देणे हे पहिल्यापासून शिवसेनेचे स्वप्न होते. केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. येथील दादागिरी संपुष्टात येऊन, शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे. तर सर्वसामान्य नागरिक भयमुक्तीने वावरत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल … Read more

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

पारनेर – नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी होते. ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय ३०), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-२०), इरफान शयशोदोहा … Read more

दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने मजुराची गळफास घेत आत्महत्या

श्रीरामपूर | बेलापूर येथील राजेंद्र पांडुरंग नगरकर (वय ४०) यांनी रविवारी सायंकाळी बेलापूर खुर्द येथे बोरीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चांदनगर येथे राहणारे नगरकर मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने नगरकर काही दिवसांपासून विमनस्क अवस्थेत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

मुख्यमंत्री व विखेंचे प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम !

जामखेड :- शेतकरीविरोधी सरकार पुन्हा एकतर्फी कसे येते, याचा विचार सर्वसामान्य मतदारांनी करणे आवश्यक आहे; अन्यथा सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या चळवळी नष्ट होतील, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.  आमदार कडू यांची जामखेड येथील बाजारतळावर शनिवारी सकाळी सभा झाली. त्या आधी वृक्ष दिंडी काढण्यात आली.  आमदार कडू यांनी विखे कुटुंबावर सडकून टीका केली. … Read more

अनिल राठोड विधानसभेसाठी फायनल !

अहमदनगर :- शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधानसभेसाठी माजी आमदार अनिल राठोड यांच्या उमेदवारीचा एकमुखी ठराव करण्यात आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांना उमेदवारी देण्याची मागणी सेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे शहराचे भावी आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू … Read more

वऱ्हाडी मडंळींना मारहाण, लग्न समारंभात राडा

बेलापूरः चोरीच्या उद्देशाने थांबल्याचा संशय आल्याने उक्कलगाव येथील एका युवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर सदर युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वऱ्हाडी मडंळींना मारहाण केल्याची घटना बेलापूर खुर्द येथे घडली. याप्रकरणी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. नगर येथील वऱ्हाडी मंडळी बेलापूर खुर्द येथे लग्न समारंभासाठी आली होती. वरात चालू असताना उक्कलगाव येथील युवकाला धक्का … Read more

जातीयवादातून ‘प्रेम’ची हत्त्या- खा. अमर साबळे

अहमदनगर :- क्षुल्लक कारणावरून नव्हे जातीयवादातून प्रेम जगताप ची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाचे खा. अमर साबळे यांनी केला. शहरात रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या प्रेम उर्फ किरण जगताप या तरुणाचा काही समाजकंटकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खा. साबळे यांनी केली … Read more