संगमनेर – संगमनेर परिसरात घुलेवाडी भागात राहणारा सूरज नामदेव देवकर, वय १७ वर्ष हा विद्यार्थी मी फोटो काढून व अॅडमिशन घेवून येतो, असे म्हणून घरातून दुपारी २ च्या सुमारास गेला.
त्याला कुणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेउन फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलाचे नातेवाईक अलका रामु देवकर, रा. घुलेवाडी यांनी संगमनेर शहर पोलिसांत वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम १६३ प्रमाणे गरनं. ४०२ दाखल करण्यात आला असून पोना पालवे मूलाचा व आरोपीचा शोध घेत आहेत.
या घटनेने पालक वगांत खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोसई कवडे यांनी भेट दिली .नातेवाईकांनी सर्वत्र विध्यार्थ्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.
- Artificial Sweetener : कृत्रिम साखर वापरत असाल तर सावधान! आरोग्यावर होऊ शकतात वाईट परिणाम…
- Ahmednagar Crime : तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल
- अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ! वेळेपूर्वी उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी
- Soil Testing: हा कालावधी आहे माती परीक्षणासाठी महत्त्वाचा! माती परीक्षणाचे काय आहेत फायदे? कसे घ्याल मातीचे नमुने? वाचा माहिती
- आंतरजातीय लग्न केल्याने गरोदर महिलेस दमबाजी करत घरावर हल्ला