एसटी बसचालकास मारहाण

कोपरगाव :- पुणे-धुळे एसटी बस (एमएच १४ बीटी ३२९०) धुळ्याकडे जात असताना एकाने स्वीफ्ट डिझायर कार (एमएच १७ बीव्ही ९६९१) आडवी लावून माझ्या मावस बहिणीला सावळविहीर येथे का उतरवले नाही? असे म्हणत बसचालकास मारहाण व शिवीगाळ केली. नगर-मनमाड महामार्गावर तीनचारी येथे गुरूवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

संगमनेर : तालुक्यातील पेमगिरी येथील रामदास बबन जेडगुले (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी घडली. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेमगिरी याठिकाणी रामदास जेडगुले हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी त्यांनी आपल्या राहत्या घरात … Read more

पाणी भरण्याच्या वादातून बेदम मारहाण

नेवासा : नेवासा खुर्द परिसरात रहाणारे शेतकरी गोरख आजीनाथ जाधव (वय २७) या तरुणाचे दि. १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यावरून झालेल्या वादाच्या कारणातून जमाव जमवून गज व काठ्यानेबेदम मारहाण करून डोके फोडले. हातावर मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी गोरख जाधव या शेतकऱ्यांने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दामू पिराजी जाधव, … Read more

शिवीगाळ, दमदाटी करत चाकु दाखवत मारुन टाकण्याची धमकी

अहमदनगर : गंगा उद्यान परिसरातील मिस्किन मळा येथे पायी चालणाऱ्या निखिल राजेंद्र सोनवणे (वय १७, रा. चव्हाणवाडी, गेवराई, बीड) यास चार अनोळखी इसमांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारून चाकुने मारुन टाकण्याची धमकी दिली. या मारहाणीत निखिल सोनवणे गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री ११ च्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी … Read more

पोलीस बंदोबस्त असून यात्रेत गोंधळ, तलवारी घेऊन माजवली दहशत !

श्रीरामपूर :- तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत श्री महादेव यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत झाला; मात्र यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही मोठ्या प्रमाणावर भुरट्या चो‍ऱ्या झाल्या, तसेच खुलेआम तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार झाल्याने भाविक व ग्रामस्थांमधून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. सोरट, चिवचिव याची एक सामाजिक कार्यकर्ता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी मोबाइलमध्ये व्हिडिओ … Read more

धक्कादायक : दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला सप्तशृंगी गडाच्या पायाशी सोडून देत मुलगा फरार !

सप्तशृंगगड : ज्यांनी या जगात आणले,वाढविले त्या वडिलांनाच फसवल्याची हृदयद्रावक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. ‘तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे, त्यासाठी सप्तशृंगगडावर जायचे आहे’, असे सांगून राहुरी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वृद्ध पित्याला सप्तशृंगगडावर आणले आणि त्याना गडाच्या पहिल्या पायरीजवळच बसण्यास सांगून स्वत: तेथून पोबारा केला. हा धक्कादायक प्रकार मंदिर ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्यामुळे उघडकीस … Read more

आजी-माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

अहमदनगर :- शहरातील सर्जेपुरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आरिफ शेख व बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख या दोघांच्या समर्थमकांमध्ये हाणामारी झाली आहे. या परिसरातील आजी-माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. या गटातील मारामारीचे कारण किरकोळ असल्याचे समजते. पोलिसांनी या दगडफेकीची गंभीर दखल घेत सर्जेपुरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला. सायंकाळी दगडफेक झाल्यामुळे परिसरात … Read more

मुख्याध्यापिकेची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर :- नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका अलकनंदा सोनवणे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्त्येचे नेमके कारण कळले नसले तरी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन व्यक्तींचा उल्लेख केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्या दोन व्यक्तींनी छळ केला की आणखी काही त्रास दिला होता? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अलकनंदा सोनवणे या पतीशी … Read more

आनंदाची बातमी : 11 जूनला महाराष्ट्रात मान्सून धडकणार !

मुंबई :- दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत आपला अंदाज वर्तवला असून मान्सून यंदा 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण पाच दिवसांमध्ये म्हणजे 11 जूनला महाराष्ट्रात धडकणार, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने विकसित केलेल्या सांख्यिकी प्रारूपाच्या आधारावर हा अंदाज वर्तवण्यात आला … Read more

जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीवर केले चाकूने वार !

अहमदनगर : जमीन विकण्यास हरकत घेणाऱ्या पत्नीस शिवीगाळ करून तिच्या हातावर चाकुने वार करून तिला जखमी केले. ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ शनिवारी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, सुवर्णा सुभाष सानप (रा.विळदघाट, इंजिनिअरींग कॉलेजवळ) या घरी असताना त्यांचा पती सुभाष बाजीराव सानप हा त्यांना म्हणाला की, मी माझी जमीन विकणार आहे. तू … Read more

लोकसभा निवडणूकीनंतर महापालिकेत बदल होणार ?

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भेट घेतली असून या भेटीत महापालिकेत शिवसेना व भाजपची युती करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. लोकसभा निवडणूकीनंतर याबाबतच्या हालचाली गतीमान होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत सेना व भाजपच्या युतीच्या चर्चेने जोर धरला असून त्या अनुषंगानेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख दिलीप … Read more

कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित

जामखेड : साहेब रोहितदादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ असे साकडे जामखेडमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना घातले. यावर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. यावेळी गाडीत मागे बसलेल्या रोहितकडे कटाक्ष टाकत ‘तुझी मागणी झाली’ असे पवार म्हणताच कार्यकर्त्यांना कामाला लागा असाच संदेश गेला. पवारांची भेट अन् कार्यकर्त्यांच्या मागणीवर पवारांनी दिलेली … Read more

आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणास अटक

कोपरगाव :- दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ व्हॉटसअॅप ग्रूपवर अपलोड करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा व्हिडीओ आकाश नानाभाऊ खडांगळे (राहणार १०५ हनुमाननगर) याने ‘आकाशभाऊ खंडागळे युवा मंच’ या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकला. या प्रकरणी इमरान कालू कच्ची (वय २९) याने कोपरगाव शहर पोलिसांकडे तक्रार दिली. या … Read more

प्रेमीयुगुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत सापडले

शेवगाव :- तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रेमीयुगुुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला, याबाबत दोन्ही कुटुंबीयांकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांना काहीही हालचाल करता आली नाही. शवविच्छेदनही होऊ शकले नाही. हा प्रकार रविवारी रात्री विहीरमालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. सोमवारी पोलिस व ग्रामस्थांनी … Read more

टायर फुटल्याने धावती कार पलटली,प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांचा मृत्यू

अहमदनगर :- लग्नसोहळ्यास उपस्थिती देऊन मुंबई येथे जात असताना कारचे मागील टायर फुटल्याने कार पलटून झालेल्या अपघातात माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते (वय ६४) यांचा मृत्यू झाला. गाडीचे टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वासुदेव दशरथ माळी (२६) रा.आसोदा यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. … Read more

‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांची लूट !

संगमनेर :- वरिष्ठांकडून दिलेले पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावर वाहनचालकांची लूट सुरू आहे. ही लुटमार करणारे कोणी गुंड नव्हेत, तर ज्यांच्यावर या मार्गाची जबाबदारी सोपवली आहे, असे महामार्ग आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस आहेत. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर दोन्ही दिशेने पोलिसांचे हे वसुलीनाके सुरू असून येथून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांना त्यांचा सामना करताना आर्थिक … Read more

ट्रकच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

संगमनेर :- नाशिक-पुणे मार्गावरील बाह्यवळणावर शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास मालट्रकची धडक बसून मोटारसायकलीवरील बाप-लेकीचा मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ असलेल्या दोन्ही जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक सोमनाथ वाघ (वय ३५, कळस, ता. अकाेले) आणि त्यांची तीन वर्षांची चिमुरडी शकुंतला यांचा मृतात समावेश आहे. त्यांची पत्नी आशाबाई व दिलीप … Read more

श्रीगोंद्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध,पाचपुतेंच्या पराभवासाठी जगताप – नागवडे एकत्र

श्रीगोंदा :- तालुक्यातील नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत नुकतेच पत्रकार परिषदेत दिले. आमदार राहुल जगताप यांनीही नागवडे आणि आमच्यात कुठलेही मतभेद नसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र राहून बबनराव पाचपुते यांचा पुन्हा पराभव करू, असे ‘बोलताना शुक्रवारी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने … Read more