फिरायला गेलेल्या महिलेचे सोन्याचे गंठण ‘धूम स्टाईल’ लांबवले !

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सध्याच्या काळात प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव अनेकजण सकाळी व संध्याकाळी देखील फिरायला जातात. मात्र हीच संधी साधून अनेक भामटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवत आहेत. अशीच फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी चौदा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लांबवल्याची घटना पाथर्डी शहरात घडली आहे. रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाईन विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळत असेल तर गांजा लागवडीला परवानगी द्या !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- हाताला काम नाही, अल्पशा शेतीत बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. किरणा दुकानातून शेतकरी हित साध्य करण्यासाठी वाईन विकुन अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी तालुक्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील आनंदवाडी येथील सामाजिक … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  शिर्डी ते झगडेफाटा दरम्यान ब्रॅच चारीजवळ अज्ञात वाहनाने निमगाव र्को­हाळे (निमशेवडी) येथील एकनाथ जयराम डांगे या वयोवृद्धाच्या मोपेडला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते (एमएच १५ सी एक्स ४३४७) क्रमांकाच्या मोपेडवरून प्रवास करीत होते. अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर … Read more

अरेअरे… परराज्यातील महिलेवर अत्याचार आणि ते देखील ‘या’ ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत एका परराज्यातील महिलेवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर येथील वाघ वस्ती येथे रविराज जाधव याने जबरदस्तीने अत्याचार केले. व मोबाईलमध्ये याचे छायाचित्रण करून तिला वारंवार त्रास दिला. असून … Read more

अनोखे विवाह बंधन ! विधवा वहिनीसोबत दिराने थाटला संसार

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण ऐकली आणि पाहिलीही असेल. पण, एका लग्नाची संवेदनशील गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली. भावाच्या निधनानंतर वाहिनी आणि पुतणी यांची जबाबदारी लहान भावाने घेतली आहे. लहान भावाने आपल्या विधवा वाहिनी सोबत लग्न केले आहे. कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरक्षा रक्षकाने केला निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव शहरातील कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असताना एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी घनाचा वार करून निर्घृण खून केला. सदर घटना बुधवारी (ता.२) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सिंघम पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीला गजाआड केले आहे. … Read more

सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा; सहकार आयुक्तांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  ग्रामीण अर्थकारणात सहकारातून समृध्दी निर्माण करण्याचे काम सेवा सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहेत. सेवा सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. शेतकर्‍यांना पेरणी ते उत्पादन आणि मालाची साठवणूकीसाठी सेवा सोसायट्यांनी दर्जेदार वस्तू व सेवा पुरवठा केल्यास ग्रामीण अर्थ कारणास बळकटी मिळेल, असे प्रतिपादन सहकार … Read more

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सप्तपदी अभियान वरदान; असा झाला लाभ

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- सप्तपदी अभियानाच्या माध्यमातून शेतीसाठीचे 305 रस्ते तसेच अतिक्रमणामुळे बंद पडलेले 155 पाणनंद रस्ते अशा 460 रस्त्यांचा श्‍वास मोकळा करण्यात आला आहे. तुकडाबंदीचे 1100, पोटखराब्याची 1700 तर महाआवास योजनेत साडेतीन हजार घरांच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी … Read more

फॅब्रिकेटिंगच्या दुकानासमोर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी पळविला

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  फॅब्रिकेटिंगच्या दुकानासमोर उभा केलेला टाटा कंपनीचा पांढर्‍या रंगाचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना निंबळक बायपास शिवारात घडली. याप्रकरणी संजय भीमा चौधरी (वय 36 रा. निंबळक ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा फॅब्रिकेटिंगचा व्यवसाय आहे. निंबळक बायपास नजिक त्यांचे शुभम फॅब्रिकेटिंग नावाचे … Read more

मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) गुन्ह्यातील पसार असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सोमनाथ रामदास खलाटे (वय 26 रा. खलाटवाडी ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकास लुटले होते. ज्ञानेश्‍वर किसन गजरे (वय … Read more

कौतुकास्पद : कोरोनाने भावाला हिरावलं, दिराने विधवा वहिनीसोबत थाटला संसार

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  असं म्हणतात कि आपण सगळं काही करू शकतो पण नशिबापुढे कुणाचच काही चालत नाही. तसेच काही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत अकोले तालुक्यातील ढोकरी येथील शेटे कुटुंबीयांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर … Read more

साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या बंगल्यावर धाडसी दरोडा

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील ब्रांम्हणगाव भांड परीसरातील तनपुरे कारखान्याच्या माजी संचालकांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा पडला असून अंदाजे १४ तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. दरोडाा पडत असताना घरातील महिला उठली असताना चोरट्याने सत्तूर दाखवून धमकावत हि धाडसी चोरीची घटना घडलीय…… तर दुसरीकडे राहुरी शहरात देखील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासात जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चोवीस तासात जिल्ह्यात 804 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 228 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -6 अकोले-36 राहुरी – 25 नगर शहर मनपा -228 पारनेर -53 पाथर्डी -56 श्रीरामपूर-69 नगर ग्रामीण -25 नेवासा -51 कर्जत -10 राहाता … Read more

श्रीगोंद्यातील भीमा नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा पोलिसांनी भीमा नदीच्या पात्रात घारगाव शिवारात यांत्रिक फायबर बोटीच्या साहाय्याने विनापरवाना अवैध वाळूचा उपसा करणार्‍यांवर छापा टाकण्यात आला असून यात 26 लाखांच्या तीन बोटी पोलिसांनी फोडल्या आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजेश मोरे, सुशांत मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक … Read more

चालकाचा ताबा सुटला : अन् मालवाहतूक ट्रक थेट…!

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एका मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटला, अन तो ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ही घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी परिसरात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, बुधवार रात्रीच्या दरम्यान कोपरगावहून … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ नागरिकांना करावे लागते दिवसा शेतात काम व रात्री घराची राखण

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. शेवगाव तालुक्यातील व शेवगांव शहरातील जुन्या चोऱ्यांचा तपास लगत नाही तोच शेवगांव पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या घटना घडत आहेत. येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. येथील अशोक नागु धोत्रे याचे घर फोडुन उचका पाचक करत १५ हजार रुपये … Read more

अँटी करप्शन ब्युरो विभागात पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- पोलीस निरीक्षक बजरंग विश्वनाथ चौगुले यांची नुकतीच अँटी करप्शन ब्युरो विभागात डिवायएसपी म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यामुळे त्यांचे पोलीस दलाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. बजरंग चौगुले हे अहमदनगर मध्ये शहर ट्रॅफिक मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये नगर शहरामध्ये बाहेरून येणारे अवजड … Read more

`शाळांची घंटा वाजली ! पहिल्या दिवशी 33 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  महिन्यापासून बंद असलेल्या जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून शासनाच्या आदेशाचे पालन करत सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी 33 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. दरम्यान जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. जिल्ह्यातील 95 टक्के शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती … Read more