अहमदनगर ब्रेकिंग : वाईन विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळत असेल तर गांजा लागवडीला परवानगी द्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- हाताला काम नाही, अल्पशा शेतीत बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. किरणा दुकानातून शेतकरी हित साध्य करण्यासाठी वाईन विकुन अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी तालुक्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील आनंदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

“शासनाने सुपर मार्केटमध्ये व किराणा दुकानांमध्ये तसेच मार्केट बाजार मध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली त्यामुळे आता वाईन कुठेही उपलब्ध होईल.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कितपत भले होईल ही भाबडी आशा आहे. जर शासनाचे उत्पन्न वाढणार असेल तर राज्यातील शेतकऱ्यांना गांजा पिके घेण्यास परवानगी देण्यास काय हरकत आहे .

तापर्यंत या देशात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या पण त्यांच्या दुःखाची हमीभाव देऊन कोणीही त्याचे सांत्वन करू शकल नाही ना त्याची साधी चौकशी सुद्धा झाली नाही.

कारण जर उच्चस्तरीय चौकशी जर केली तर या देशातील तमाम शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारण सरकार ठरेल हे एकदम सत्य आहे.

मार्केटमध्ये वाईन सारख्या पदार्थ विक्रीतून महसूल प्राप्त होऊन तमाम नागरिकांचे भलं होत असेल तर गांजा लागवडीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल व शेतकऱ्यांच्या हातात काही थोडेफार पैसे येतील

शेतीचे आर्थिक नियोजन आणि शेतकऱ्यांची ढासळती परिस्थिती सुधारेल गांजा उत्पादनास परवानगी दिल्यास कृषिक्षेत्रात उभारी मिळून प्रोत्साहन मिळेल. तसेच शेतमालाला हमी भाव असा प्रश्न पडणार नाही व शेतकरी आत्महत्या करणार नाही.

राज्य सरकारने लवकरात लवकर या विषयावर निर्णय घ्यावा. गांजा लागवडीतुनही शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळुन शेतकर्‍यांच्या हतातही थोडे फार पैसे येतील

अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना ‘गांजा लागवड व उत्पादन’ यासाठी सरकारने परवानगी देत प्रोत्साहन दिल्यास कृषीक्षेत्रास देखील उभारी मिळेल असे मार्मिक मागणी केली आहे.