Ahilyanagar Breaking : मार्केटजवळ अग्नितांडव ! ‘त्या’ स्क्रॅप गोडावूनला भीषण आग, दोन तास आग विझवण्याचे काम

अहिल्यानगरमधून एक आग लागण्याची घटना समोर आली आहे. स्क्रॅप गोडावूनला आग लागून मोठे अग्नितांडव झाल्याचे पाहायला मिळाले. अहिल्यानगर शहराशेजारील केडगाव बायपास रोडवर स्क्रॅप गोडावून आहे. या गोडाऊनला १२ मार्च ला रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडावून मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशामक दलाचे २ बंब आणि एमआयडीसी अग्निशामक दलाचा १ … Read more

विकृती ! विहिरीत गाठोड्यात बांधलेला मृतदेह, पोलिसांची पळापळ; सत्य समोर येताच सगळेच चक्रावले..

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच ते पोलीस प्रशासनासह शासकीय रुग्णवाहिकासह घटना स्थळी दाखल झाले. पोलीसांनी विहिरीत डोकावले असता बारदाण्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसले. त्यानुसार सदर मृतदेह वर काढताच मृत अवस्थेतील वासरू असल्याचे दिसून आले. परंतु या प्रकरणाने प्रशासनाची चांगलीच धावपळ … Read more

संगमनेर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रृटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्या

शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रृटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे,शहारातील क्रीडा संकुल सर्व नागरीकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा, तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहीती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.नगरपालिकेच्या सभागृहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थिथीत आयोजित … Read more

रिक्त मंत्रीपदी आ. संग्रामभैय्या जगतापांची वर्णी लागावी अजितदादांकडे ‘अहिल्यानगर’ची मागणी

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा खाते रिक्त झाले आहे, या जागी अहिल्यानगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांची वर्णी लागावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातून अजितदादा पवाराकडे होत आहे. आमदार संग्रामभैय्या जगताप यांना अन्न नागरी पुरवठा मंत्रीपद … Read more

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उपक्रम ; बोबड्या मुलांना मिळाली स्पष्ट वाणी

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मुलांच्या ३५६ टंग टाय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोबडी बोलणारी मुले स्पष्ट बोलू लागली आहेत. याशिवाय या योजनेतून गेल्या वर्षभरात ० ते १८ वयोगटातील एकूण ८ लाख ८ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली त्यात ६० हजार ६२७ जण किरकोळ आजारी आढळले, तर २४७ जणांवर … Read more

अकोले मधील घटना : शाळेत गेलेले चिमुरडे हरवले आणि थोड्याच वेळात…

१३ मार्च २०२५ अकोले : शहराजवळ माळीझाप उंचखडक आसपासच्या ओढ्याजवळ नवनाथ मंडलिक यांच्या शेतात काम करणाऱ्या मजूर आदिवासी जोडप्याच्या चार मुलांचे अपहरण झाले आहे अशी अफवा पसरली होती पण थोड्याच वेळात त्या ठिकाणी एका वाटसरू मोटरसायकल स्वाराने या चिमुकल्या भावंडांना सुखरूप त्यांच्या आई-वडिलांच्या हवाली केले.त्यामुळे ही भावंड नेमके हरवले होते की, त्यांचा अपहरणाचा प्रयत्न झाला … Read more

तनपुरे कारखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्याचा डाव ! मर्जीतल्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी अन्य सभासदांना ठेवले वंचित : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

१३ मार्च २०२५ देवळाली प्रवरा : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे या कारखान्याचे सभासद अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यालयात चकरा मारत होते परंतु प्रशासन अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून, फोन बंद करून बसले होते.त्यामुळे प्रशासन अधिकारी ठराविक सभासदांचेच शेअर्स पूर्ण करत आहेत असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे … Read more

माघाडे यांच्या अपघाती मृत्यूला राजकारणाचा आरोप ; जातीय वळण देण्याचा प्रयत्न

१३ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगावमध्ये झालेल्या शुभम माघाडे याच्या अपघाताच्या घटनेची चौकशी नक्कीच करावी पण जाणूनबुजून कट करून गलांडे कुटुंबातील सदस्यांना हेतुपूर्वक बदनाम करू नका,अशी मागणी मराठा समाजाने केली.या प्रकरणाबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन दिले गेले आहे. हरेगावच्या रस्त्यावर शुभम माघाडे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. माघाडे हा … Read more

ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला ; राज्य निवडणूक आयोगाने केली सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : जिल्ह्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १ हजार २२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.अनुसूचित जातीसाठी (एससी) १५० जागा सरपंच पदाच्या आरक्षित. यातील ७५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) ११९ जागा सरपंच पदासाठी आरक्षित आहेत. यातील ६० जागा महिलांसाठी राखीव … Read more

अंधेरी रातो मे.. सुनसान राहो पर.. ! अपघात,लुटमारीच्या भितीने चालायचं तरी कसं ?

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : शहरातला सगळ्यात जास्त वर्दळ असलेला प्रमुख महामार्ग नगर-मनमाड रोड वर पत्रकार चौक ते एमआयडीसी पर्यंतच्या सह्याद्री चौकापर्यंत मागील चार महिन्यांपासून रस्त्यावरील खांबावरचे दिवे बंद आहेत म्हणून या रस्त्यावर अंधार असून या रस्त्यावर रात्री फक्त गाड्यांचाच उजेड दिसतो.रस्त्यावर सगळीकडे अंधार होत असल्यामुळे अपघात आणि लुटमारीची भीती वाढली आहे पण या रस्त्याचे … Read more

पाथर्डी होऊ लागलीये गुन्हेगारांचे माहेरघर ! कायदा सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा ; पोलिसालाही ब्लॅकमेल…

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : पाथर्डी शहरात सध्या गुन्हेगारी टोळ्यांकडून ताबेमारी केली जात असून नागरिकांना व व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून दहशत निर्माण केली जात आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कडक पावले उचलावीत तसेच स्थानिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करुन कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जावी,अशी मागणी प्रताप ढाकणे यांनी केली आहे. खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण याने … Read more

श्रीगोंदा तालुक्यात खळबळ; शिर आणि हात तोडलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

श्रीगोंदा, १३ मार्च २०२५: श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील एका विहिरीत बुधवारी (१२ मार्च) सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे शीर, दोन्ही हात आणि एक पाय गायब असल्याचे दिसून आले असून, त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, … Read more

जंगलात लागणारे वणवे सजीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा ; वनसंपदेचे मोठे नुकसान

अहिल्यानगर : महाराष्ट्राला नैसर्गीक वनसंपदेची मोठी देणगी लाभली आहे,परंतु येथील जंगल भागात कृत्रिम वणवे लागत असल्याने या वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दुर्मिळ वनौषधींसह जैवविविधतेची मोठी हानी या वणव्याच्या आगीमुळे होत असून वनविभागाने हे वनवे टाळण्यासाठी जन जागृती करण्याची गरज आहे. जंगलमध्ये दुर्मिळ वनसंपदे सोबतच पशु पक्षी … Read more

अखेर खासदार लंके यांच्या प्रयत्नांना यश ; जलजीवनच्या कामांची केंद्रीय समिती करणार चौकशी

अहिल्यानगर : सर्वसामान्यांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारच्या वतीने मिशन जल जीवन ही योजना राबविण्यात आली. परंतु राज्यभर या योजनेबाबत सुरुवातीपासूनच तक्रारीचा पाऊस पडला होता. मात्र त्याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र आता या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली … Read more

गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला ; जिल्ह्यातील १२२३ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर ; असा आहे कार्यक्रम

अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी झाल्यापासून विहित काळात सोडतीद्वारे सरपंच पद आरक्षण निश्चिती विहित प्रक्रियेनुसार करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे, राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने गुरुवार दि.१२ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात … Read more

अखेर मढीत ‘त्या’ व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब : १२७ विरुद्ध ३२७ मतांनी ठराव पास

अहिल्यानगर : मढीतील कानिफनाथांच्या यात्रेतबाहेरगावातील अवैध व्यवसाय करणारे व नाथांच्या रुढी व परंपरा न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय मढीच्या ग्रामसभेत बुधवारी (दि.१२) रोजी १२७ विरुद्ध ३२७ मतांनी घेण्यात आला. हिंदू-मुस्लिम युवकांमधील किरकोळ बाचाबाची वगळता पोलिसांच्या सहकार्याने ग्रामसभा शांततेत पार पडली. मढीच्या मुस्लिमांना आमचा विरोध नाही. दुसऱ्याचा बाप मेला तर तुम्ही कशाला दाढी- मिशा काढता. … Read more

ऐन उन्हाळ्यात नगरकरांच्या घशाला कोरड : महिनाभरात बारावेळा वीजपुरवठा खंडित

अहिल्यानगर : ऐन उन्हाळ्यात शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पाणी करण्यात अडथळे येत आहेत. १५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत १२ वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद पडून शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ … Read more

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरवर राहणार ‘जलदूत’चे लक्ष

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यासह राज्यभर टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून टँकरची मागणी केली जात आहे. मात्र ऑफलाइन पद्धतीने टँकर मागणीचे हे प्रवास दाखल होत असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप असतोच. या कामात कधी विलंब होतो. त्यामुळे जेथे गरज आहे त्या परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा टँकरच्या कामकाजा संदर्भात आरोप-प्रत्यारोप देखील होतात. मात्र … Read more