ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला ; राज्य निवडणूक आयोगाने केली सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा

Published on -

१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : जिल्ह्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १ हजार २२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.अनुसूचित जातीसाठी (एससी) १५० जागा सरपंच पदाच्या आरक्षित. यातील ७५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) ११९ जागा सरपंच पदासाठी आरक्षित आहेत. यातील ६० जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी ३३० जागा सरपंचपदासाठी आरक्षित आहेत. यातील १६५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गातून ६२४ जागा आहेत. यातील ३१२ महिलांसाठी राखीव आहे.

तसेच जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतींचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्यात येणार आहे.२०२५ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ६, संगमनेर २, कर्जत २, पारनेर २ आणि अकोले तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

२०२४ मध्ये मुदत संपली

तालुका  – ग्रा.पं.  – सदस्य संख्या

अकोले – ८ – ६९
संगमनेर – २  – १४
कोपरगाव  – ३ – ७
राहाता – १  – ३
श्रीरामपूर  – २  – ७
राहुरी      – ३ – ६
नेवासा  – २६  – १०
शेवगाव    – ६ –  १९
पाथर्डी     –  ४  –  ६
जामखेड   –  ३  – ५
श्रीगोंदा    –  १ – ४
कर्जत       –  ८ – ३
पारनेर      –  १  – ६
नगर      –  ७   – ६
एकूण   –   ८४   – १५५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe