कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

शिरसगाव – देणेदारांना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शिरसगाव येथील अण्णासाहेब अर्जुन दौंड या ३८ वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.  विशेष म्हणजे मुंबईला बहिणीकडे निघून राहुरीत उतरुन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे खळबळ उडाली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अण्णासाहेब दौड हे … Read more

उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन पालकमंत्री करा – जगताप

नेवासा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच नेवासा शहरात शिवसैनिकांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे … Read more

शिर्डीत रेल्वेरुळावर महिलेचा मृतदेह आढळला

शिर्डी ( प्रतिनिधी ) – शिडीं परिसरात रेल्वे रुळावर काल एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचे वय ५५ ते ६० वर्षाचे आहे.   याप्रकरणी पो.कॉ. वेताळ यांच्या खबरीवरुन शिडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  सदर महिला कोण ? तिचा मृत्यूकसा झाला? काही घातपात आहे का ? याचा पुढील तपास हे.कॉ पवार हे करीत … Read more

ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला!

संगमनेर – अकोले तालुक्यातील आंबेवंगण ग्रामपंचायत व शेणीत ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग याने तब्बल ९३ लाखाहुन जादा रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.  पहिली फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे, धंदा नोकरी, रा. श्रद्धा कॉलनी, गुंजाळवाडी, संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिल्यावरुन आरोपी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव … Read more

बाळासाहेब थोरात दोन महिन्यापूर्वी जे बोलले होते तेच खरे झाले !

अहमदनगर: राजकारणात कधी कुणाचे अच्छे दिन येतील आणि कधी कुणाची सत्ता जाईल हे सांगता येत नाही. याचाच अनुभव आता महाराष्ट्र घेतोय. फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं त्यांना पुढचा विरोधीपक्ष नेता दिसेल अशी भविष्यवाणी दोन महिन्यापूर्वी थोरातांनी केली होती. देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षात दिसत आहेत. असे ही थोरात म्हणाले होते. गेल्या महिन्याभरात राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष … Read more

सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा

संगमनेर :- जमिनीच्या हद्द मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या दौलत नामदेव डामरे यांना चार वर्षांची साधी कैद व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली या खटल्याची सुनावणी संगमनेर न्यायालयामध्ये सुरू होती.दौलत डामरे हे ऑक्टोबर २०१० मध्ये अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत होते. या वेळी एका व्यक्तीकडून जमिनीची हद्द कायम मोजणीची … Read more

…आणि निष्ठा पावली,बाळासाहेब थोरातांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद !

संगमनेर :- काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल  महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा अविस्मरणीय भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संगमनेर तालुक्यामध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली.  … Read more

चिंता मिटली,जिल्ह्यातील धरणांत आहे इतका जलसाठा !

अहमदनगर :- दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस होतो. मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र सुरुवातीला चांगला पाऊस होतो. ऑगस्टच्या मध्यात ही धरणे जवळपास भरत येतात. परंतु, यंदा परतीच्या पावसामुळे व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सध्या साठ्याची स्थिती चांगली आहे. यंदा नोव्हेंबर महिना संपत आला असला, तरी … Read more

सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो

कोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. विधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात … Read more

डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करण्याची मागणी

अकोले :- मधुकर पिचड व वैभव पिचड यांची ४० वर्षांची सत्ता उलथवणारे आमदार डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी

संगमनेर – वाळू चोरणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप जीप याचा वापर करतात, मात्र आता मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी होत असल्याचे पोलिसांनी उघड केले. काल संगमनेर तालुक्यात नाशिक – पुणे रस्त्यावर हिवरगाव पावसा शिवारात ४. १५ च्या सुमारास पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ओमनी मारुती व्हॅन एमएच ०६ एफ ९५१९ पकडली. तिच्यात पांढऱ्या रंगाच्या ३० गोण्यांमध्ये चोरीची वाळू … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले

 नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे जाणार की, पुन्हा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे अध्यक्षपद आपल्याकडेच राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सध्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे आहेत. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे.  शालिनी विखे  … Read more

चारचाकी गाडी व ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

संगमनेर- अकोले तालुक्यातील कोंभाळणे, लिंगदेव परिसरात सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सुवर्णा संतोष बांबळे ( हल्ली रा. गिरीराज कॉलनी, नवलेवाडी, अकोले)  या तरुणीस माहेरुन चारचाकी गाडी आण, ५ लाख रुपये आण, असे म्हणत तिचा शारीरिक मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करुन पैसे व गाडीची मागणी करुन घराबाहेर हाकलून दिले. या त्रासास कंटाळून सुवर्णा बांबळे … Read more

बांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी

नेवासा – शेवगाव तालुक्यातील गुंफा गावच्या शिवारात शेताच्या सामाईक बांधावरील झाडाच्या कारणावरुन तिघांना लोखंडीगज, लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून जबर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन, सत्यभामा गोरक्षनाथ नजन, व्यंकटेश गोरक्षनाथ नजन हे  जखमी झाले आहेत. याप्रकरणी,  शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अर्जुन … Read more

ट्रक चालकाकडून कार चालकास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ट्रकचालक विठ्ठलभाई सोमाभाई बावलिया (रा. राजापुरा, ता. चोटीला, जि. सुरेंद्रनगर, रा. गुजरात) याने स्विफ्ट डिझायरचे नुकसान करून तो निघून गेला. त्याला विलास तुळशीराम काळे (रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) यांनी चंदनापुरी शिवारात थांबवले. याचा राग येवून ट्रकचालक बावलिया याने काळे यांना चप्पलने मारहाण करून शिविगाळ केली. त्यानंतर … Read more

रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील महालवाडी येथे शेतजमीन व रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महालवाडी या ठिकाणी देवनाथ विठोबा मिंडे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्यांच्यात व शेजारी असलेले लक्ष्मण धोंडीबा मिंडे, बाळासाहेब लक्ष्मण मिंडे या सर्वांमध्ये शेतजमीन … Read more

१६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेत बलात्कार

अकोले :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर एकाने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पावळदरा घाट ते कोतुळ या रस्त्याने पावळदरा येथून पोखरी येथे शाळेत जात असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपी अविनाश वामन मधे , रा , म्हसोबा झाप , पारनेर याने दुचाकीवर बसवून घाटातून पळवून नेले … Read more

भाजपने बबनराव पाचपुते यांच्याकडे दिली ही जबाबदारी !

अहमदनगर :- भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे सोपवली आहे. आम्ही विधीमंडळात बहुमत सादर करू. यात मला अजिबात साशंकता वाटत नाही. ‘ऑपरेशन लोटस’बाबत गुप्तता राहू द्या, असे सूचक वक्तव्य बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी माझा चांगला संबंध आहे आणि त्यासोबत सर्व आमदारांसोबत माझा … Read more