जिल्ह्यातील ‘हे’ आमदार शरद पवार यांच्यासोबत

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.  भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे … Read more

राज्याला आता स्थिर सरकार मिळणार -कोल्हे

कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून राज्याला स्थिर सरकार देण्याचे वचन दिलेले होते. त्याप्रमाणे येथील मतदारांनी भाजपा-सेना महायुतीला कौलही दिला होता.  मात्र गेले महिनाभर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाट्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठींबा देवुन शेतकरी हितासाठी जो निर्णय घेतला त्यामुळे आता स्थिर सरकार मिळणार आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष … Read more

सरकार दिलेल्या कालावधीतच बहुमत सिध्द करेल -आ. विखे पाटील

शिर्डी : राज्यातील जनतेने भाजप सरकारला बहुमत दिल्याने भारतीय जनता पार्टीचेच सरकार सत्तारुढ होईल हे निश्चितच होते. आता राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत सरकार आपले बहुमत नक्कीच सिध्द करेल, असा विश्वास माजी गृहनिर्माण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी टिका करणाऱ्या खा. … Read more

युवकाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

राहुरी: मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत उत्तम खांडेकर असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील जांभळी येथील १५ वर्षे वयाचा प्रशांत उत्तम खांडेकर हा मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेला होता. त्याच्याबरोबर अनिल खेळणार, अंकुश बाचकर हे देखील होते. मुळा धरणाच्या … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत … Read more

नव्या सरकारबाबत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ही प्रतिक्रीया

शिर्डी :- विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेन भाजपालाच पसंती दिली होती.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार हा आत्मविश्वास आम्हाला होता, मी पुन्हा येईन असे जनतेला त्यांनी  दिलेले अभिवचन त्‍यांनी कृतीतुन खरे करुन दाखविले असल्‍याची प्रतिक्रीया माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७० व्‍या गळीत हंगामाच्‍या कार्यक्रमानंतर आ.विखे … Read more

खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा … Read more

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार शरद पवार यांच्या मागे !

अहमदनगर :- आज सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना नसल्याचे समजते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. यापैकी सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री निधन झाले नोबेल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचा अंत्यविधी  खारे खर्जुने येथे उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे. १९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार झाले होते.  शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा … Read more

तरुणीला लग्नासाठी बोलावून बेडरुममध्ये बलात्कार

लोणी  – लग्न करतो असे म्हणून लोणी ता . राहाता येथे घरी बोलावून बेडरुममध्ये नेवून ३४ वर्षाच्या तरुण महिलेवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जुलै २०१९ रोजी ११ च्या सुमारास घडला . पिडीत महिला सोलापूर परिसरातील आहे. या प्रकरणी काल पिडीत महिलेने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , … Read more

अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आजपासून जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर – जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक दिनांक २३ व २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.   नाशिक विभागात श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय पथक येत असून ते काही ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.   या … Read more

पिकांच्या नुकसानीच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काढणीस आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भूईमूग यासारख्या पिकास मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होऊन खचून गेले आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी येथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव पुंडलिक गाढवे यांचेही या पावसाने अतोनात नुकसान झाले. त्याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला. … Read more

पार्थ पवार  म्हणतात राज्यात सर्वसामान्यांचे सरकार येणार !

  शिर्डी : महाराष्ट्रात लवकरच बळीराजा व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली. पार्थ पवार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपतालुकाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश … Read more

 कांदा पोहोचला ८००० रुपयांवर !

नाशिक :- गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत माेठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभावाने उच्चांकाचे नवीन रेकाॅर्ड केले असून उन्हाळकांंद्याला देवळा बाजार समितीत आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. आशिया खंडातील सर्वात माेठी बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (दि. २१) केवळ ४०० क्विंटल कांदा आवक झाली. त्यामुळे बाजारभावाने सात हजार रुपयांचा … Read more

भरदिवसा अल्पवयीन तरुणीस पळविले

संगमनेर – संगमनेर खुर्द परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ३ महिने वयाच्या अल्पवयीन तरुणीस काल राहत्या घरातून दुपारच्या दरम्यान अज्ञात आरोपीने कायदेशीर रखवालीतून काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली … Read more

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

शिर्डी :- जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या काल घडलेल्या पोलिसावर गोळीबार प्रकरणातील  गोळीबार करणारा आरोपी सचिन लक्ष्मण ताके , वय ३२ , रा . शिरसगाव , ता . श्रीरामपूर याला रात्री ८ . ०५ वा . अटक करण्यात आली.  दरम्यान दुसरा फरार आरोपी अमित सांगळे याचा कसून शोध घेतला जात आहे . कालच्या राहाता … Read more

भारतीय स्टेट बँके शाखेच्‍या मॅनेजरकडुन जेष्ठ नागरीक व ग्राहकांना दिला जातो खाते बंद करण्याचा सल्ला

लोणी : लोणी येथे असलेली भारतीय स्टेट बँकेची शाखा ग्राहकांसाठी असुन नसल्यासारखीच आहे. अनेक जेष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांना या शाखेत रोजच अरेरावीच्या भाषेला सामोरे जावे लागत आहे. लोणी बुद्रुक परिसरात भारतीय स्टेट बँकेंची शाखा आहे. या बॅंकेत परिसरातील जेष्ट नागरीक, शालेय विद्यार्थी तसेच अन्य खातेदारांची खाती आहेत. शासनाच्‍या वृध्‍दापकाळ योजनेचे पैसे काढण्‍यासाठी तसेच अन्य व्यवहारासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा चोरट्यांनी केला पोलिसांवर गोळीबार !

अहमदनगर :- जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झाले. सोनसाखळी चोरणाऱ्या दोघा संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. बुधवारी दुपारी १.२० वाजता राहता शहरातील मध्यवस्तीत झालेल्या या घटनेत एक पोलिस जखमी … Read more