कांद्याला ५८०० रुपये भाव !

राहुरी – येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर गावरान कांद्याला ४७०० ते ५८००, तर गोल्टी कांद्याला ४००० ते ५००० रुपये क्विंटल भाव मिळाला. सोमवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर भाव कमी झाल्याचा अपवाद वगळता भावात सुधारणा झाली. रविवारी ९८५९ गोण्यांची आवक झाली. दोन नंबर कांद्याला ३३०० ते ४६९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १००० ते ३२९५ … Read more

पोलिस निरीक्षकास माहिती आयोगाची २५ हजार रुपये दंडाची नोटीस

संगमनेर :-  माहिती अधिकारांतर्गत अर्जदारास वेळेत माहिती दिली नाही, या कारणावरुन शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना माहिती आयोगाने २५ हजारांंचा दंड का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने निरीक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजिज शेख यांनी २०१५ मध्ये मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या एका दैनिकातील … Read more

पंचनामा झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

अहमदनगर :- अवकाळी पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर शेती पिके उद्ध्वस्त होताना बघावी लागत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. त्यांचे अश्रूपुसण्यासाठी पुढाऱ्यांचे निव्वळ दौरेच सुरू आहेत. प्रशासन पंचनामे करीत आहे. याद्वारे शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील हजारो एकर सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, डाळिंबासह … Read more

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून परतीच्या पाऊसाने प्रचंड हानी झाली असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.  यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, उपाध्यक्ष किसनराव लोटके, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, दिपक पवार, सरचिटणीस … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

सोनई : सोनई येथील गजबजलेल्या माधवबाबा चौकातील जुगार अड्ड्यावर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्धन सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून समजले की, माधवबाबा चौकात काहीजण तिरट नावाचा … Read more

15 जणांच्या जमावाची ५ जणांना कुऱ्­हाडीने जबर मारहाण

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर (बा.) येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाले. या वादातून पंधरा जणांच्या जमावाने कुऱ्हाड, लोखंडी दांडा, दगडाचा वापर करून ५ जणांना जबर मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तवले व मगर या दोन कुटुंबात रस्त्यावरून वाद असून याच … Read more

आता कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

कोपरगाव : गेल्या काही वर्षांच्या दुष्काळानंतर सुरूवातीपासून आवश्यक वेळी पडलेल्या पावसामुळे यावेळी खरीपाचे पिके चांगली येणार, या अपेक्षेत असतानाच लांबलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मिळणारे उत्पन्न तर गेलेच परंतु, रब्बी पिकांच्या खर्चासाठीच्या तरतुदीचीही वाताहत झाली. अशा परिस्थितीत सरकार व सर्व समाजघटकांनी या लाखोंच्या पोशिंद्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने आता कोपरगाव तालुक्यात … Read more

निकालानंतर फटाके वाजविल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

सोनई : सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा राम जन्मभूमी व बाबरी मशिद याचे अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठीकठिकाणी पोलीस पेट्रोलिंग व बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास रामजन्मभूमी व बाबरी मशिद खटल्याचा निकाल लागल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सोनवणे, मुख्य हवालदार आव्हाड, पोलीस नाईक पालवे, हवालदार बाबा वाघमोडे असे सोनई गावातून ग्रामपंचायत पेठेमधून पेट्रोलिंग करत असताना … Read more

महिला, मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

संगमनेर : शेतीच्या बांधावर गवत काढत असल्याचा राग आल्याने चौघा जणांनी महिला व तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी व गजाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीच्या अपघातात एक ठार

श्रीरामपूर : दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावर हॉटेल जय हो समोर, शिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथे दि. १६ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर जीवघेणा हल्ला

कोपरगाव : शहरातील संजयनगर भागात एका तरुणावर पाच तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात सदर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून पाचजणांविरूद्ध कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी शहरातील संजयनगर भागातील सोमनाथ संपत रोठे (वय २१) हा तरूण दि. ४ नोव्हेंबर … Read more

विखे पाटील कुटुंबियाची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करा

संगमनेर : सोशल मिडीयावरुन आ.राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची बदनामी करणारा मजकूर प्रसारीत करणाऱ्या व्यक्ति विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी विखे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस आणि आश्वी येथील पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून विखे यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्याचे मोबाईल नंबर देण्यात आले … Read more

संगमनेरात मोटारसायकली चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले!

संगमनेर : संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकली चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मंगळवारी पुन्हा चिखली शिवारातील लक्ष्मी माता मंदिरापासून वीस हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला आहे. यामुळे मोटारसायकल चोरांनाही संगमनेर शहराचा लळा लागला की काय, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. त्यामुळे मोटारसायकल स्वारांमध्ये भितीचे … Read more

येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध – आ. लंके

पारनेर –मतदारसंघातील शेतीचे व्यापक प्रश्न, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. मांडवे खुर्द येथे मोठे मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल आमदार लंके यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेेळी ते बोलत होते.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची … Read more

बळीराजापुढे दुसरे नवे संकट, कापसाचे भाव ५०० रुपयांनी घसरले

राहुरी – अचानक बाजारभाव ढासळल्याने पावसाने आधीच घायाळ झालेल्या राहुरीच्या शेतकऱ्यांपुढे दुसरे नवे संकट उभे राहिले आहे. उसाला पर्याय म्हणून राहुरी तालुक्यात कपाशीचे क्षेत्र वाढले आहे.  दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे कपाशीच्या पिकाची वाताहत झाली. पहिली वेचणी झालेल्या कपाशीला मागील आठवड्यात ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता.  … Read more

राहुरीत ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, मुळा धरणाच्या पाण्यात मारली उडी

राहुरी शहर –राहुरीतील मुळा धरणाच्या पाण्यात अज्ञात ३५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या तरुणाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मुळा धरणात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी या घटनेची खबर राहुरी पोलिसांना दिली.  … Read more

एकही शेतकरी वंचित राहाता कामा नये ! आ. तनपुरेंनी अधिकाऱ्यांना खडसावले

राहुरी – नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करताना अधिकार्यांनी निव्वळ आकडेवारीचा खेळ दाखवु नये. प्रत्यक्ष कृती करुन दाखवा. उघड्या डोळ्याने न बघता शेतकऱ्याच्या शेतात जावुन प्रत्यक्ष पंचनामे करा. नगर तालुक्यातील एकही शेतकरी वंचित ठेवू नका.  काढलेल्या पिकांचेही पंचनामे करा. एकही शेतकरी यापासुन वंचित राहाता काम नये. नगर येथिल शेतकर्यांच्या पिक नुकसान बैठकीत नगर, पाथर्डी, राहुरी मतदार … Read more

Live Update: ‘त्या’ जागी मंदिर होणारच ! मुस्लिम समाजाला दुसर्या ठिकाणी ५ एकर जागा मिळणार

या ऐतिहासिक खटल्याच्या निकालानंतर राम जन्मभूमी न्यास कार्यशाळा परिसरात कुठलंही सेलिब्रेशन होणार नाही : विश्व हिंदू परिषद अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचं स्वागत, संपूर्ण 2.77 जागा रामलल्लाचीच आयोद्धेतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा सुप्रिम कोर्टाचा निकाल. तेथे मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून … Read more