दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना पकडले

राहाता : तालुक्यातील शिंगवे येथे मोटारसायकल चोरी करताना राहात्याच्या दोन अल्पवयीन मुलांना नागरीकांनी पकडले. एक जण गाडी घेऊन पसार झाला. याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंगवे येथील शेतकरी संभांजी रंगनाथ नरोडे हे रूई रोडवरील आपल्या शेताजवळील रस्त्यावर मोटारसायकल लावून शेतात गवत कापत होते. यावेळी तिघे अल्पवयीन मुले त्याठिकाणी एका मोटारसायकलवर आले.  मोटारसायकलला … Read more

‘तुला काही कमी पडू देणार नाही’ असे म्हणत महिलेचा विनयभंग

कोपरगाव : ‘विहिरीतील चोरीस गेलेली मोटर तुला देतो. तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव. तसेच तुला काही कमी पडू देणार नाही’  असे म्हणत संतोष तुळशीराम वायसे (रा. सोनेवाडी, ता.कोपरगाव) या व्यक्तीने एका महिलेचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग केला.  दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या … Read more

कांदा सडला..आणि शेतकरी रडला,कांदा उत्पादकांनी पावसापुढे टेकले हात!

संगमनेर : कांदा सडल्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहेत. डोळयादेखत हातातोंडाशी आलेल्या सेंद्री लाल कांद्याचे पीक परतीच्या पावसामुळे शेतामध्ये पूर्णपणे सडून गेले आहे.  त्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांनी कस जगायचं? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.संगमनेर तालुक्याच्या पठार भागाकडे नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जात आहे. वर्षानुवर्षांपासून येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती … Read more

अहमदनगर बाजारभाव : अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पाऊस कमी, अधिक प्रमाणात सुरूच आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाज्यांवर विपरीत परिणाम झाला आहे.  बाहेर गावाहून नगर बाजार समितीत येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावाने विकला जात आहे. स्वाती नक्षत्राच्या सरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत बरसल्या. २४ … Read more

किरकोळ कारणावरुन मारहाण,परस्परविरोधी गुन्हे दाखल

अहमदनगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे किरकोळ कारणावरुन मारहाण झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.  सत्तार पिरमोहमंद शेख (वय ५२, रा.नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सलमान हुसेन पठाण, मासूम हुसेन पठाण, शोएब चॉंद शेख, सोहेल चॉंद शेख, साहिम चॉंद शेख, कलिम शकरुद्दीन शेख, … Read more

चाकुचा धाक दाखवून कार पळवली !

श्रीरामपूर : गाडी बंद पडली म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाडीचालकास चाकू लावून त्याच्याकडील रोकड व मोबाईलसह गाडी पळवून नेण्याचा प्रकार काल रात्री ७ वाजता वडाळा महादेवजवळ घडला. हिंद सेवा मंडळाचे मानस सचिव संजय जोशी यांच्या क्रिएटा गाडीत त्यांच्या पत्नी, मेहुणे व ड्रायव्हरसह औरंगाबादहून श्रीरामपूरकडे येत होते. सायंकाळी ७ वाजता वडाळ्याजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटला.  त्यामुळे … Read more

नगर-मनमाड राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करा – आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी : नगर-मनमाड राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग (एमएच १६०) म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च २०१३ मध्ये राजपत्रात घोषीत केल्यानंतर आजअखेर ह्या रस्त्याचे रुपांतर करण्यात आले नाही. सदर राज्य मार्गाचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.  आमदार तनपुरे पुढे म्हटले आहे की, नगर-मनमाड राज्य मार्ग … Read more

खासदार सुविधा केंद्रासाठी जागा द्या- खा.सदाशिव लोखंडे

अहमदनगर : केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांच्या पर्यंत थेट पोहोचाव्यात विविध योजनांची माहिती सुलभ रीतीने नागरिकांना मिळावी, तसेच अडचणींचे गाऱ्हाणे नागरिकांना लोकसभा सदस्याकडे मांडता यावे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळापासून प्रत्येक लोकसभा सदस्यासाठी खासदार सुविधा केंद्राची संकल्पना पुढे आली.  याच संदर्भात खासदार सुविधा केंद्राबाबत सदाशिव लोखंडे यांनी पुढाकार घेतला असून, खासदार सुविधा केंद्रासाठी प्रशासनाने … Read more

कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीला लॉजवर नेवून बलात्कार

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुण विद्यार्थिनीला उंबरी बाळापूर येथे राहणारा आरोपी अमोल राजेंद्र अंजनकर याने दि. २४ रोजी आश्वी – उंबरी रस्त्यावर विश्वासात घेवून त्याच्या पल्सर दुचाकीवर बसवून अल्पवयीन विद्यार्थिनीला पुणे रस्त्याने नेले. चंदनापुरी घाटाच्या शिवारात एका लॉजवर नेवून तेथे लग्नाची अमिष दाखवून इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार … Read more

पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच पेटवले सोयाबीन!

श्रीरामपूर: नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास शेतकऱ्याने आग लावली. ही घटना बेलापूर खूर्द येथे घडली. महाडीक यांच्या शेतातील सोयाबीनला मोड फुटल्याने ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, कोतवाल सुनील बाराहते हे पंचनामा करण्याकरता गेले होते. पंचनामा, फोटो, सातबारा, विमा पावती आदींची पूर्तता केल्यानंतर शासन मदत तरी किती देणार यामुळे वैतागलेल्या … Read more

विवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

श्रीरामपूर :- दत्तनगर सूतगिरणी फाटा येथील गॅरेजजवळ कडू तात्याबा बागूल (वय ४०, दत्तनगर) या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला. रवी विखे यांना बागूल झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे यांना सांगितल्यावर त्यांनी बागूल यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायत सदस्य मोहन आव्हाड यांनी पोलिसांना कळवले. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी … Read more

आमदार शंकरराव गडाख मंत्री होणार ?

नेवासा :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी विजय मिळवला. आमदार गडाख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गडाख यांचा ४६५९ मतांच्या फरकाने पराभव झाला होता. मुरकुटे हे पंतप्रधान … Read more

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघासह नगर शहर आणि श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार विजयी झाला नसून, त्याला जिल्हाप्रमुख जबाबदार आहेत. पारनेर, नगर शहर व श्रीरामपूर मतदारसंघातील तालुक्यात कार्यरत असलेल्या जिल्हाप्रमुखांची तत्काळ हकालपट्टी करावी, असा सूर पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत आळवण्यात आला. विधानसभा निवडणूकीत पारनेर – नगर मतदारसंघातून विजय … Read more

शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे हतबल

अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे. यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

ब्रेकिंग : शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

शिर्डी :- शिर्डीत पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे, अनैतिक कृत्यासाठी लफडेखोरांना खोल्या दिल्या जातात. एक – दोन तासासाठी २ ते ५ हजार घेतले जातात. शिर्डीत काही हॉटेल, लॉजमधून वेश्या व्यवसाय चालतो तसेच असे प्रकार नेहमी घडतात. मात्र जे उघड होतात ते समोर येतात.अशाच एका प्रकारात काल डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त … Read more

ओला दुष्काळ जाहीर करा

अकोले :- तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शेती उध्द्वस्त झाली असून हातातोंडाशी आलेली पिके सडून चालली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून तातडीने पंचनामे करून शेतक ऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी,अशी मागणी अकोले तालुका काँग्रेस पार्टीच्यावतीने कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी यांनी केली आहे. प्रशासनाला दिलेल्या … Read more

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – खासदार लोखंडे

श्रीरामपूर : तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी काल खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय कृषी अधिकारी कातोरे, प्रांताधिकारी पवार यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते. बैठकीला सर्व मंडलाधिकारी देखील उपस्थित होते. तालुक्यात परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे … Read more

पीक विमा योजनेत पेरू च्या समावेशासाठी प्रयत्न

राहाता : हवामानावर आधारित पीक विमा योजनेत पेरू फळाचा समावेश होण्यासाठी कृषी आयुक्तांशी बोलून निर्णय करण्यास सांगू, अशी ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. राहाता तालुका राज्यात पेरू पिकाचे आगार मानले जाते. मागील काही वर्षात पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे पेरूच्या बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. तालुक्यातील पेरूच्या शेतीचे अर्थकारणही मोठ्या … Read more