कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही…’

श्रीरामपूर – ‘श्रीरामपुरातील आता जसे राजकारण सुरू आहे तसेच चालू राहू द्या डिस्टर्ब करु नका.. पण श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच डिस्टर्ब झालो आहे… श्रीरामपुरात कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही… ‘अशा शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली.  त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जोरदार साथ दिल्याने सभेचा नूर बदलून … Read more

भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा -खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर – येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघाचे रस्त्याचे प्रश्न असो किंवा सर्वात महत्वाचा पाटपाण्याचा प्रश्न असो त्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकार पक्षाचे आमदार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा, असे आवाहन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले. श्रीरामपुरात काल … Read more

शिर्डी झोपडपट्टीमुक्त करणार : मंत्री विखे

शिर्डी :- सर्वधर्मीय अशी ओळख असलेल्या साईबाबांच्या शिर्डीचा गेल्या काही वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलला. हॉटेल व अन्य लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी ठोस उपाययोजना करू, अशी ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. भविष्यात शिर्डी झोपडपट्टीमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संवाद कार्यक्रमात विखे बोलत होते. नगराध्यक्ष अर्चना कोते, कैलास कोते, योगीता शेळके, अनिता … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरातून ४२ हद्दपार

श्रीरामपूर –विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४२ जणांवर तालुका बंदीची कारवाई केली. अर्जुन खुशाल दाभाडे, सागर श्रावण भोसले, नाना बाळू गुंजाळ, विजय ऊर्फ दुर्गेश कचरूलाल जैस्वाल, सचिन ऊर्फ गुड्डू राम अकबल यादव, सचिन सुभाष बाकलीवल, जिशान फारुख शेख, शोएब सत्तार शेख, प्रकाश शिवाजी रणवरे, फैयाज नासीर कुरेशी, मोहसीन रफिक शेख,  अमोल गोपाळ नानूस्कर, प्रकाश अरुण चित्ते, … Read more

आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे!

बेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.  अशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून … Read more

पुन्हा एकदा शिवसेनेकडून संग्राम जगताप टार्गेट

नगर : निवडणुकीला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी मात्र पक्ष कार्यालायात मात्र खूप धावपळ पाहायला मिळत आहे. प्रचाराचे पॉम्पलेट वितरित करणे , रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून प्रचार करणे आणि महत्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन भेटी घेणे. अहमदनगर मतदारसंघ हा आता ‘हॉट’ बनलाय.  इथे लढत होतेय शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप … Read more

कर्तव्यशून्य आमदारांना २१ तारखेला जागा दाखवून देऊ!

विरोधी पक्षाचे आमदार असताना माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळण – वळणाचा प्रश्न मार्गी लावला. मात्र २०१४ नंतर गेल्या ५ वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांनी बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला तालुक्याच्या विद्यमान आमदार साधा भराव टाकू शकल्या नाही . यावरून त्यांना विकासाची किती आवड होती हे यातूनच दिसत आहे,  … Read more

गौप्यस्फोट ! शेतकऱ्यांचे पुणतांब्यातील आंदोलन आ. कोल्हेंनीच दडपले…

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उभारलेले ऐतिहासिक आंदोलन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा या गावातून सुरू झाले.  दरम्यान शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले हि अतिशय दुर्दैवी बाब असून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून कोपरगावला गतवैभव आशुतोष काळेच प्राप्त करून देऊ शकतात.  त्यासाठी २१ … Read more

Vidhansabha 2019 – आ. मुरकुटे हसले तर गडाख कोमजले!

नेवासा – नेवासा मतदार संघात दररोज चित्र बदलत असल्याने जिल्ह्याचे इकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रारंभी येथे वरवर माजी आ. गडाखांचे पारडे जड वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा देवून मतविभाजन टाळले खरे, मात्र यातून गडाखांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.  असे असतानाही घुलेंच्या निवासस्थानी जावून गडाखांनी त्यांची घेतलेल्या भेटीमुळे आ. मुरकुटेंची झोप उडाली. मात्र, काही तासातचं जि. … Read more

गडाखांच्या बालेकिल्ल्यात आ. मुरकुटेंचे शक्तीप्रदर्शन

नेवासे –माजी आमदार शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला असलेल्या सोनईत भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सोमवारी काढलेल्या प्रचार रॅली काढली. यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा सहभागी झाले होते. मागील निवडणुकीत सोनईत मुरकुटे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. पाच वर्षांनी भाजपने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दोन महिन्यांपूर्वी सोनईमध्ये पाणीटंचाई असताना … Read more

आयशरला धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

संगमनेर –  नाशिक-पुणे मार्गावरुन पुण्याच्या दिशेने मोटारसायकलीवर जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी पुढे असलेल्या आयशरवर पाठीमागून धडकला.  आयशरला पाठीमागून धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला दुभाजकावर डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  संगमनेरनजीक साकूरफाटा येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. सुदीप मिरासे (वय २२, वसमत, जि. नांदेड) असे मृत युवकाचे नाव आहे.  तो बीएचएमसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत … Read more

कांबळेंच्या प्रचारात खा. लोखंडे सक्रीय

कोल्हार खुर्द – कोल्हार,  चिंचोली, आंबी, पिंपळगाव फुनगी येथे श्रीरामपूर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे अधिकत उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकत्यांशीसंवाद साधला. आज या सभांना शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, … Read more

श्रीरामपूर मतदार संघात विकासाचे नवे पर्व सुरु होण्यासाठी आ.कांबळे यांना विजयी करा !

श्रीरामपूर  ;- जोपर्यंत प्रवरा नदीकाठ ते राहुरी फॅक्टरी पर्यंतच्या भागातील शेती समृद्ध होती तोवर राहुरी तालुका आणि राहुरी कारखाना प्रगतीच्या वाटेवर होता. मात्र आपला भाग सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावला तशी आपल्या भागाची दुर्दशा झाली. ऊसाची शेती गेली. त्याचबरोबर समृद्धी गेली. एकेकाळचे बागायतदार शेतकर्‍यांवर जिरायतदार शेतकरी बनण्याची वेळ आली. हे चित्र पालटायचे या निर्धारानेच मी … Read more

कानडे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात

श्रीरामपूर ;- काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहु कानडे हे फक्त निवडणूकीपुरते श्रीरामपूर मधे येतात व निवडणूक संपली की गायब होतात. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्याचे व जनतेचे प्रपंच टिकवायचे असेल तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन मा. आ. भानुदास मुरकुटे यांनी खोकर येथे काल सायंकाळी पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना केले. … Read more

स्थानिक माणूसच श्रीरामपूरचे प्रश्न सोडवू शकतो – भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर :- भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या असे आवाहन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रचारादरम्यान केले. मतदार संघातील चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करंजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खु., पढेगाव, निपाणीवडगाव येथील प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते, सण १९९९ ते २००९ या दहा वर्षात … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला !

श्रीरामपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मागील सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.अशी टीका खा.इम्तीयाज जलील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.  विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर खपवून घेतले जाते. मात्र एमआयएम पक्षाची मत कापणारे म्हणत बदनामी … Read more

ना. विखेंना जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची सजावट

शिर्डी  – राहाता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची साईबाबांच्या मंदिरात सजावट करण्याचा संकल्प साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजराव कोते यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या साईनिर्माण उदयोग समुहाच्या वतीने अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा यांनी सत्कार केला. यावेळी शिडींचे प्रथम नगराध्यक्ष केलासबापु कोते, सामाजिक कार्यकर्ते नितिन उत्तमराव … Read more

आदिवासी आरक्षणाला धोका नाही – वैभव पिचड

राजूर : आदिवासी आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. राजूर येथील प्रचारसभेत आ. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपाइं नेते भाई पवार होते. यावेळी … Read more