अहमदनगरचे सुपुत्र तहसीलदार सुभाष यादव यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर  :- एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव(३१) यांचे आज सकाळी साडेदहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. सुभाष यादव हे आलापल्ली येथे पत्नी व लहानग्या मुलासह वास्तव्य करीत होते. यादव यांना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरीच अचानक ह्रदयविदाराचा झटका आला. त्यांना तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच हत्या प्रकरणातील त्या आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवारी अटक केली आहे. मंगळवार,दि. १७ डिसेंबर २०१९ रोजी दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहादेव दहिफळे याच्यासह अकरा जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न … Read more

नगरच्या उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही अद्याप याचे काम सुरु झाले नाहीय स्टेशन रस्त्यावरील तीन किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठीचे खासगी भूसंपादन रेंगाळले आहे. या पुलासाठी २१ जणांची जमीन संपादित करायची असताना आतापर्यंत अवघी पाचजणांचीच जमीन मिळाली आहे. दरम्यान, कँटोन्मेंट मालकीच्या जमिनीचा मोबदला देण्याची ग्वाही देणारे पत्र महापालिकेने दिले असल्याने ही … Read more

जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी कोणता पॅटर्न राबवायचा हे आज सांगणार नाही – खासदार सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कोणता पॅटर्न राबवायचा, हे आज सांगणार नाही. कारण, आज त्याबाबत बोललो तर ज्या गोष्टी करायच्या, त्या कशा होतील?,’ असे भाष्य करत खासदार सुजय विखे यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीबाबत सस्पेंस कायम ठेवला. राज्यातील निवडणुकीनंतरची बदलेली परिस्थिती पाहता आता नगरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, … Read more

आमदार रोहित पवार म्हणतात मी मंत्री झालो तर…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता प्रचंड ताणलेली आहे. मला जर मंत्रीपदाची  संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, अशी इच्छा आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला आहे. या निवडणकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांना 52 मते मिळाली आहेत. अमोल येवले यांना 10 मते मिळाली. पाच मते बाद झाली. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांना … Read more

वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट कडून विखे कराखान्याचा सन्मान!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी : प्रतिनिधी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास यावर्षीचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या पदाधिकार्यानी या पुरस्काराचा स्विकार केला. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने दरवर्षी सहकारी खाखर कारखान्यांनी केलेल्या … Read more

राष्ट्रीय महामार्ग 222साठी संपादित जमिनीमुळे बाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ – खा. सुजय विखे पा.

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रीय महामार्ग 222च्या यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी 2018 मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. सदर जमिनी संपादित करताना कुठलाही विचार न करता त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. यामध्ये काही क्षेत्र बागायती, काहींच्या फळबागा अशा अनेक जमिनी होत्या. या सर्व जमिनी सरसकट जिरायती दाखविण्यात आल्या. त्यामुळे अनेक त्रुटी आहेत. सदर त्रुटी शासनास … Read more

नव्या वर्षात नगरकरांसाठी खासदार सुजय विखेंचे आहे हे व्हीझन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- 2020 ह्या नव्या वर्षात पदार्पण करताना अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याचा संकल्प आहे. तो यशस्वी होईल,’ असा विश्वास नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. मंगळवारी शहरातील नीलक्रांती चौकात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या पाहणीनंतर त्यांनी खड्डेमुक्त नगरचा संकल्प व्यक्त केला. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांची … Read more

भीमा कोरेगाव दंगलीतील श्रीगोंद्याच्या संशयित आरोपीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे :- भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीत एका युवकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथील चैतन्य आल्हाट याला अटक झाली होती. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. मात्र, घरी आल्यावर तो आजारी पडला. त्याचा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये २३ … Read more

माजी आमदार विजय औटी यांनी दिलेलं ते आव्हान तिने स्वीकारले आणि बनली न्यायाधीश!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : शहरातील अ‍ॅड. गौरी घनशाम औटी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम न्यायदंडाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. गौरी औटी यांनी नगरच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबी व एलएलएमचे शिक्षण पूर्ण करून पारनेर येथील दिवाणी न्यायालयात तसेच नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून … Read more

माजी आमदार नरेंद्र घुले यांना विधान परिषदेवर आमदारकीची देण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव :- माजी आमदार नरेंद्र घुले वा त्यांचे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळण्यासाठी त्यांचे समर्थक सरसावले आहेत. दोघांनाही विधानसभेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. पक्षाचे निष्ठावान म्हणून व अनुभवी समाजकारणी, राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नगर जिल्ह्यातील सर्वांत ज्येष्ठ व पक्षाशी एकनिष्ठ तसेच अडचणीच्या काळात … Read more

सर्वसामान्यांना दिलासा : कांद्याचे भाव अखेर झाले कमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांदा लिलाव घेण्यात आला. या वेळी नवीन कांद्यास सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रती क्विंटल असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत जवळपास २६ हजार ७३२ कांदा गोण्या आवक झाली होती. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलावात आता कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. … Read more

शिर्डीतील वेश्या व्यवसाय संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा – आ.राधाकृष्ण विखे 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत जगभरातून लाखो भाविक येत असून त्यांना पॉलीसी वाल्यांकडून होणार्‍या त्रासापासून मोकळा श्वास मिळावा यासाठी दि. 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत शहरातील सर्व पॉलिसीवाले बंद करण्यात यावेत, असा निर्णय आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात … Read more

सरपंच हत्या प्रकरण वेगळ्या वळणावर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबार प्रकरणात दुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दैत्यनांदूरचे सरपंच संजय बाबासाहेब दहीफळे यांना बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याबाबत गणेश दहीफळे यांनी शहादेव दहीफळे यांच्या सह इतरांवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल … Read more

सत्ता जावूनही भाजपची हवा! तालुकाध्यक्षपदासाठी आले इतके अर्ज कि अध्यक्षच नाही निवडला …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  जिल्ह्यातील भाजपाचा संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार शनिवारी कर्जत तालुकाध्यक्षांची निवड झाली. काल रविवारी श्रीगोंद्याच्या तालुकाध्यक्षाच्या निवडीवर एकमत झाले, पण संगमनेर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेवासा तालुकाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमेटीकडे सोपविण्यात आला … Read more

नगर जिल्ह्यातील हे आमदार मंत्रीपदाच्या रेसमध्ये !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा येत्या एक-दोन दिवसांत असा विस्तार नियोजित असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याची उत्सुकता आहे. साध्या अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे सहा व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे एक असे सात आमदार या शर्यतीत आहेत. त्यापैकी कोणाची वर्णी लागते हे लवकरच समजणार … Read more

पराभूत भाजप आमदारांच्या तालुक्यातील कार्यकर्ते सैरभर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचे बिगूल वाजले असून सध्या शहराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटना निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशने खासदार गिरीश बापट यांची नगर जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या आदेशाने भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्राध्यापक भानुदास बेरड यांनी जिल्ह्याच्या १४ मतदारसंघात भाजपच्या निवडणूक … Read more